-
पु. १ वीणा इ० वाद्यांतील खर्ज स्वराची तार . ( वाद्यांतील ) खर्ज स्वर . २ झोपेंतलें घोरणें ; मृत्युसमयीं होणारा घशांतील घरघर असा आवाज . हा वेदार्थसागरू । जया निद्रिताचा घोरु । तो स्वयें सर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला । - ज्ञा १ . ७२ . आपण गाढ झाले निद्रिस्त । चलनवलन सांडूनि स्थित । कंठीं घोर वाजवी । - नव १३ . १६२ . ३ काळजी ; धासरा ; मानसिक अस्वस्थता ; खुणखूण ; चिंता . ( क्रि० करणें ; लागणें ). त्याचा नित्याचा घोर नाहींसा होऊन त्याची स्वभाववृत्ति प्रबळ झाली . - नि . ७०३ . निरउपाय झाली गोष्ट कंबर बसली घोरानें । - ऐपो ४१२ . ४ अन्य स्थळीं गेलेल्या माणसाबद्दल घेतलेली खंत ; घोकणी . ( क्रि० घेणें ; कर्माची षष्ठी ). पोरानें आईचा घोर घेतला . ५ आक्रोश ; आकांत ; रडारड ; कोलाहल . तो मरतांच पोराबाळांनीं एकच घोर केला . ६ आरडाओरड ; गलबला ; गिल्ला ; गलका ; गोंगाट ; कल्ला . हा काय मजुरदारांचा घोर पडला ७ हल्ला . केला मखीं घोर निशाचरांनीं । - आविश्वा २० . तेनी धरला सवता घोर - ऐपो ३५२ . ८ मरण्याच्या वेळची घरघर . ९ संकट . घोर हा नको । फार कष्टलों । मानापमानाचे पडिले । भ्रांतीचे घोरीं । - दावि २६० . - वि . अघोर . १ भयंकर ; भयप्रद ; भयानक ; विक्राळ ( मुद्रा , आवाज , काम , घडणार्या गोष्टी ) म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर । नव्हे सार संसार हा घोर आहे । - राम ६६ . २ गाढ ; घनघोर ( निद्रा ); त्यास घोर निद्रा लागली . ३ निबिड ; दाट ; घनदाट ; गाढ ; भयाण ( अंधार , अरण्य इ० ). मी राजाच्या सदनीं अथवा घोर रानीं शिरेन । - खरे जन्मभूमि . ४ घनघोर ; तुंबळ ; हाताघाईचें ; निकराचें ( युध्द लढाई , इ० ). कलह उत्पादी अतिघोर । - एभा १ . २०४ . ५ अचाट ; अवाढव्य ; जगडव्याळ ( इमारत ). ६ अफाट ( भरलेली नदी ) [ सं . घोर ] घोरंदर , घोरांदर - वि . ( काव्य . ) भयंकर ; घोर शब्दांतील विशेषणाचे सर्व अर्थ पहा . झोटी धरूनि पाडिती अपार । घोरंदार मांडिलें । - एरुस्व ८ . ४४ . युध्द मांडिलें घोरंदर । - मुआदि १३ . ३२ . युध्द जाहलें घोरांदर । सकळ राजे पराभविले ॥ - ह २६ . ५७ . [ सं . घोरतर ] घोरवेळ - स्त्री . ( ज्यो . ) १ अशुभ , अनिष्ट , भयसूचक वेळ . २ ( अनिष्टतेच्या ध्वनितार्थावरून ) करकरीत तिन्ही सांजा , टळटळीत मध्यान्ह . घोरासुराचें आख्यान - न . ( उप . ) डाराडूर झोंप ; घोर झोंप . घालून ठेवलेले अंथरूण पायानंच उलगडून ही अश्शी घोरासुराच्या अख्यानाला सुरवात . - फाटक नाटयछटा २ .
-
ना./वि. काळजी , चिंता , फिकीर , रुखरुख , विवंचना , हुरहूर ;
-
घोर n. हिरण्याक्ष की सेना का एक असुर । कार्तिकेय ने इसका वध किया [पद्म. सृ. ७५] ।
-
m The base (the chord or the sound) of a musical instrument. Anxiety, apprehension, inquietude, solicitude.
Site Search
Input language: