-
स्त्री. १ ( संगीत ) रागाचा आरोह व अवरोह ह्या मधील स्वरसंख्येवरून रागाचे जे प्रकार होतात ते प्रत्येकीं . त्यांची संख्या ९ आहे . त्यांचीं नांवें - संपूर्ण - संपूर्ण , संपूर्ण - षाडव , संपूर्ण - औडुव , षाडव , औडुव - औडुव २ ( संगीत ) न्यास , अंश , ग्रह , इत्यादि स्वर , तसेंच ताल , कला , मार्ग हे ठराविक असून अमुक एक रस उत्पन्न व्हावा अशी योजना ज्या एखाद्या नियमबध्द स्वररचनेंत असते ती . हिचे प्रकार दोन - शुध्द जाति व विकृत जाति . ३ ( संगीत ) मात्रानियमावरून तालांचे झालेले प्रकार प्रत्येकीं . ह्या जाती पांच आहेत :- चतुरस्त्र , त्र्यस्त्र , खंड , मिश्र व संकीर्ण . [ सं . जाति ]
-
स्त्री. १ जात ; प्रकार ; वर्ग . २ वंश ; कुळ ; बीज . ३ वर्ण . जात पहा . ४ ( गणित ) अंश व छेद यांचें एकीकरण . उदा० विशेष - शेष जाति . ५ ( साहित्य ) एक अलंकार . संस्कृत आणि प्राकृत या दोहोंतहि सारखेच वाचले जातील अशी अक्षरांची रचना . ६ छंदांचा एक वर्ग . हा मात्रासंख्याक असून , षण्मात्रिक तालाचा व अष्टमात्रिक तालाचा असे याचे दोन प्रकार आहेत . [ सं . ]
-
जातीचे लेकरूं
-
(ल.) लबाड मनुष्य
Site Search
Input language: