-
अ.क्रि. १ मोडणे ; छकले , तुकडे पडणे . म्ह ०नखाने तुटेल त्यास कुर्हाड कशास पाहिजे ! २ घटणे ; कमी होणे ; उतरणे ; न्यून होणे ; कमती येणे . ओला चारा नाहीसा होतांच गाईचे दूध तुटले . त्या मापाने मोजून आणलेले ह्या मापाने दोन शेर तुटले . ३ मोडणे ; तुकडे तुकडे होणे ; विस्कळीत होणे ; फुटणे ( एकत्र जमलेला समुदाय , संघ , मंडळ , समाईक धंदा ). ४ सुटणे ; नाहीशी होणे ( मैत्री , संबंध ). ५ वेगळे होणे ; निरनिराळे होणे , परस्पर भिन्न होणे ( एकत्र - सहकार्याने काम करणारे लोक , मित्रभावाने असणारे ). ६ तुटून पडणे ; एखाद्यावर चवताळणे ; अंगावर येणे ; ताशेर झाडणे . ७ अतिक्रमण , उल्लंघन होणे ( जमीनीच अथवा अंतराचे ); ओलांडणे , आक्रमणे , चालून जाणे ( वाट , अंतर ). ८ दिवाळे वाजणे . ९ अशक्त , क्षीण होणे ; खालावणे ( शरीर , प्रकृति इ० ). १० मोडणे ; अनासक्त , विमुख होणे ( मन , मर्जी इ० ). ११ संपणे ; मिटणे ; तोड होणे , निघणे ( भांडण , कलह भेद यांत ). १२ कमी होणे ; छाटला जाणे ( पगार , सैन्य , कोणतीहि ठरीव रक्कम ). १३ ( मूल ) अंगावरुन सुटणे ; स्तनपान करण्याचे बंद करणे . [ सं . त्रुट - त्रुटण ; प्रा . तुट्टण ] ( वाप्र . ) तुटून पडणे - ( कामावर ) निश्चयाने आणि जोराने लागणे ; ( मनुष्याच्या ) अंगावर चवताळून जाणे , चालून जाणे ; शिव्या देत सुटणे ; अतिशय रागावून बोलणे . म्ह ० फुटले मोती तुटले मन सांधू न शके विधाता . सामाशब्द - तुटपुटा - ट्ठा - पु . घोड्याच्या तोंडावरील दोन तीन जागी तुटलेला पांढरा पट्टा . - अश्वप १ . ९५ . [ तुटणे + पट्टा ] तुटपाऊस - पु . कधी पडतो कधी पडत नाही असा पाऊस ; एकसारखा न पडणारा पाऊस ; तुटकपाऊस पहा . [ तुटक + पाऊस ] तुटपाणी - पु . ( को . ) नुकत्याच उगवून वर आलेल्या लहान पिकास जीव जगण्या इतकेच दिलेले पाणी . [ तुटक + पाणी ] तुटपुंजा - वि . १ थोड्क्या भांडवलावर धंदा , सावकारी इ० करणारा ( मनुष्य ). २ अपूर्ण ; अपुरा ; अल्प ( पदार्थ , काम ). [ तुट + पुंजी ] तुटमिती ( व्याज ) - न . मुदलांतून वसूल झालेली रक्कम उणे करुन बाकी राहिलेल्या रकमेवर आकारलेले व्याज ; असे व्याज आकारण्याची पद्धत ; कटमिति .
-
क्रि. अलग होणे , छकले पडणे , तुकडे पडणे , फुटणे , मोडणे ;
-
verb तुकडे पडणे
Ex. हातातून निसटल्याने मूर्ती तुटली
-
क्रि. तोड निघने , मिटणे , संपणे ( भांडण ).
Site Search
Input language: