-
पुस्त्री . १ ( लोहारी ) खिळे उपसून काढावयाचा चिमटा . २ ( सोनारी ) अडकित्यासारखा दोन पायांस एका खिळ्यानें सांधुन वरच्या बाजूस वर्तुळाकार असलेला . धातूचें सुत अगर तार ओढण्याचा चिमटा .
-
न. १ वस्त्र , कापड पदबंध नागर । तेंचि रंगाथिलें अंबर ' - ज्ञा १ . ६ . २ ( समासांत ) वस्त्र परिधान , पोशाक या अर्थी , जसें :- पीतांबर , पिवळें असें जें वस्त्र ; वस्त्रानें युक्त असा , जसें ; दिंगबर = दिक् ( दिशा ) आहे वस्त्र ज्याचें ; चर्मीबर , इ० ३ आकाश , वातावरण . ' सागर शोषुनि उधवला । अंबराई ॥ ' - ज्ञा १ . ९० . ' पुष्पांजुळी मंत्रघोष जयजयकार । दुमदुमी अंबर तेणें नादें ॥ ' - तुगा ८१ . ( सं . अम्बर )
-
पु. १ एक धातु ; देशी औषधांत याचा उपयोग करतात . २ अंबरचा केलेला जिन्नस ( मणी , सळई , दागिना ), अंबरउदी पहा .
-
स्त्री. अमरवेल . ( सं .)
Site Search
Input language: