-
न. १ खरेपणा ; सचोटी ; प्रामाणिकपणा ; नेकी ; इमान . विपत्तींतहि सत्पुरुष आपलें सत्य सोडीत नाहींत . २ वास्तविकता ; वस्तुस्थिति ; अस्तिभाव . ३ प्रतिज्ञा ; शपथ ; दिव्य . ४ चार युगांतील पहिलें युग . याची वर्षसंख्या १७२८००० वर्षे आहे . ५ अस्तिपक्षीं , होकारार्थी , उद्गार ( खरोखर , खरेंच , अवश्य , होय याप्रमाणें ). - वि . १ खरें ; वास्तविक ; ऋत ; अनृत , खोटें नव्हे तें ; काल्पनिक ताकिंक नव्हे असें . २ प्रत्यक्ष ; हयात ; जिवंत ; अस्तित्व , चेतना असलेलें . ३ अस्सल ; मूळ ; नकली नव्हे तें . ४ खरा ; खरें बोलणारा . ५ सचोटीचा ; प्रामाणिक ; कपटी , लबाड नव्हे असा ; विश्वासु ; नेकीचा . सत्य उपाय - वि . सत्यसंध ; नेकीनें चालणारा . परम गहन , अति सुशील , सत्यउपाय , सत्य अंतरीं । - ऐपो ३१९ . सत्यंकार - पु . १ सत्यप्रस्थापन ; खरें करणें ; स्वीकार ; मान्यता ; रुजू करणें . २ सचकार ; विसार . - शर . सत्यजय - सतंजय पहा . सत्यत्वग्रह - पु . खरेंपणानें घेणें ; खरें मानणें ; विश्वास ठेवणें . याचे उलट मिथ्यात्वग्रह . सत्यदर्शी - पु . ब्रह्मज्ञान झालेला ; ब्रह्मतत्त्व स्वात्मत्वें अवलोकन करणारा .
-
०धूत वि. सत्यांनें पवित्र झालेलें . सत्यधूत बोलिजे । देखावें तें देखिजे । - ज्ञा ६ . ४४५ .
-
०नारायण पु. एक देवता ; या देवतेस नवस केला असतां तो फेडण्याकरितां या देवतेचें करावयाचें पूजन .
-
०नाश नास - पु . सर्वनाश ; सर्वस्वी हानि ; उच्छेद ; समूळ नाश ; विनाश ; प्रलय ; निःपात ; निधन .
Site Search
Input language: