-
पु.स्त्री.न.
- भांडण , बहिष्कार इ० च्या चौकशीसाठीं जमलेली जातीची सभा , पंचायत ; जातीचें कोर्ट ; निवाडाकचेरी .
- ( सामुदायिक ) एकत्रित झालेली जात ; सबंध जात ; गोत्रज .
- ( सामुदायिक ) नातेवाईक मंडळी ; सगेसोयरे ; भाऊबंद . सांडून सर्वहि गोत । - दा २ . १ . ९ .
- नातें .
- आलुतेबलुते .
- ( पेशवाईतील ) धार्मिक किंवा सामाजिक अपराधांच्या चौकशीसाठीं किंवा दत्तक , वांटणी , वतन इ० चा निर्णय देण्यासाठीं भरणारी गांवांतील सरकारी कामगार , वतनी अधिकारी , अलुतेबलुते व प्रतिष्ठित माणसें यांची न्यायनिवाडा करण्याची सभा ; हिनें दिलेला निवाडा सरकारहि सहसा फिरवीत नसे . [ सं . गोत्र ] ( वाप्र . )
-
०मिळणें
- एकत्र जुळणें , जथणें .
- मिसळणें ; संयोग , एकजीव होणें . ताकाचें व तेलकट भाजीचें गोत मिळत नाहीं .
- एकमत होणें ; जुळणें ( मुद्दे , गोष्टी ).
- सख्य होणें .
- पूर्वापर गोष्टींचा संबंध जुळणें .
म्ह० कुर्हाडीचा दांडा गोतास काळ = स्वकीयांशीं फितूर होणारा माणूस . सामाशब्द -
-
०घोडा पु.
- अगम्यगमन करणारा माणूस .
- अशिक्षित , अक्षरशत्रु असें मोठें मूल ; पोळ ; म्हशा .
- कुटुंबांतील शुंभ , ढ माणूस .
-
०पत, पात गोताई स्त्री.
- जातिबहिष्कृत , गुन्हेगारास शुध्द करून पुन्हां जातींत घेण्याच्या वेळचा संस्कार ; प्रायश्चित्ताचें जातजेवण .
- जातसभा ( मराठयांत ); पतितास आपल्या पंक्तीस घेऊन जात त्याला पावन करते तो विधि .
Site Search
Input language: