Dictionaries | References

रुप

   
Script: Devanagari

रुप     

 न. 
बाह्य स्वरुप ; देखावा .
आकार ; आकृति ; दृश्य पदार्थ .
चेहरा ; तोंडवळा ; मुद्रा ; मुखवटा .
( न्यायशास्त्र ) डोळ्यांनी दिसणारे पदार्थाचे रंग आणि आकार हे धर्म ; नेत्र ह्या इंद्रियाचा विषय .
नमुना ; विशेष मासला ; ठराविक ठेवण ; विशिष्ट घडण ; अवस्था ; स्थिति .
सौंदर्य ; शोभा ; तेज ; पाणी ; भूषण ; शोभादायक गुण ; बांधेसूदपणा . हे काम असे की मनुष्याने जीव देऊन केले तरी रुप यायचे नाही .
मूळ धर्म ; स्वभाव ; गुणधर्म ; मूळ अवस्था .
( व्याकरण ) नामाचे अगर धातूचे प्रत्यय इ० लावून सिद्ध झालेले स्वरुप , स्थिति .
( व्याकरण ) कोणताहि धातु विधि अगर निषेध या अर्थी चालविला असतां त्याचे होणारे रुपांतर . रुपे दोन आहेत - करणरुप व अकरणरुप .
तादात्म्य ; प्रतिबिंब ; सोंग ; सारखेपणा ; वेष . उदा० पितृरुप ; पिशाचरुप ; वायुरुप ; अलंकाररुप . इ०
( गणित ) एक ह्या संख्येची संज्ञा ; बीजगणितांत व्यक्त संख्या .
एक परिमाण दुसर्‍या परिमाणांत नेले असतां होणारा बदल . उदा० अडीच रुपयांचे आण्यांचे रुप चाळीस आणे .
( वैद्यक ) निदानाचा दुसरा प्रकार .
एखाद्या कामाचा श्रेयस्कर किंवा प्रशंसनीय परिणाम ; चीज ; फलद्रूपता . कृतघ्नाची नोकरी करण्याचे रुप होत नाही . - पु . चंगकांचनी गंजिफांतील सातवा रंग . [ सं . ] ( वाप्र . )
०करणे   सांगणे ; निरुपण करणे ; वर्णन करणे . जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणे । श्रीगुरुसामर्थ्या रुप करुं म्हणे । - ज्ञा १० . १४ .
०पालटणे   
आकार बदलणे ; निराळी आकृति घेणे ; वेश बदलणे ; चेहरा बदलणे .
०होणे   एखाद्या कामाचा सुपरिणाम होणे ; चीज होणे ; श्रेय मिळणे ; फलदायी होणे . जीव देऊन काम करुं द्या पण त्या कामाचे रुप व्हावयाचे नाही . रुपास येणे आकार येणे , उत्पन्न होणे ; नांवारुपास येणे ; चांगल्या स्थितीप्रत येणे ; चांगले गुण येऊं लागणे . कां इक्षुदंड गाळितां साचार । तयासि सायास लागती फार । सेवटी रुपास येतां साखर । चवी खाणार जाणती । सामाशब्द -
०कार  न. मूर्ति ; प्रतिमा ; प्रतीक . - ख्रिपु .
०बेरुप  न. चांगले किंवा वाईट रुप . [ सं . रुप + विरुप ]
०रंग  पु. बाह्य देखावा ; सामान्य स्वरुप ; आकृति आणि रंग . रंगरुप पहा . रुपरंग चातुर्यकला पाहुनि झालो खुशी ।
०रत्नपरीक्षा  स्त्री. नाणी आणि रत्ने यांची परीक्षा ; चौसष्टकलांपैकी ही एक कला आहे .
०रेखा   षा स्त्री .
बाह्य देखावा ; बाह्य मर्यादा .
घाट ; आंगलट ; घटना ; बांधा .
आराखडा ; कच्चा नकाशा .
०लावण्य  न. आकाराचे किंवा बांध्याचे सौंदर्य ; आकार , चेहरा व ठेवण यांचा मोहकपणा ; देखणेपणा . बांधेसूदपणा .
०लिपी  स्त्री. सारणी ; सूत्र . - साठे , रासायनिक परिभाषा ( इं . ) फॉर्म्युला .
०वती  स्त्री. सुंदर स्त्री ; देखणी स्त्री . [ सं . ]
०वान वि.  
सुंदर ; देखणा ; चांगल्या बांध्याचा .
रुप असलेला ; आकृति असलेला ; आकारयुक्त . [ सं . ]
०विकार  पु. एका रुपातूंन दुसर्‍या रुपांत जाणे ; रुपांतर ; अवस्थांतर . उदा० बेडूक मूळचा जलविहारी . परंतु स्थलविहारी होऊन हवेचे श्वासोच्छवसन करुं लागला . या रुपांतरास रुपविकार म्हणतात . - प्राणिमो ७६ . रुपांतर न .
अन्य रुप ; दुसरे स्वरुप ; नवे स्वरुप .
फरक ; बदल [ रुप + अंतर ] रुपाभिमान - पु . सौंदर्याचा अभिमान ; देखणेपणाबद्दलचा गर्व . [ रुप + अभिमान ] रुपावलि - ळी - स्त्री . नामे किंवा क्रियापदे यांची प्रत्यय लावल्यानंतर होणारी रुपे दिलेले पुस्तक . [ रुप + आवली ] रुपडे - न .
( काव्य ) सुंदर रुप ; गोजिरवाणे रुप ; रुप ; मूर्ति ; मोहक मुख . सांवळे रुपडे चोरटे चित्ताचे । उभे पंढरीचे विटेवरी । - तुगा २६३० .
मुखवटा ; मुखटोप ; बुरखा . रुपस - न . स्वरुप ; सौंदर्य . - वि . ( काव्य ) चांगल्या आकाराचा ; सुंदर ; रुपवान ; नीट नेटका ; सुरेख ; शोभिवंत ; देखणा . कुष्टी उपहासे रुपसा । - मुसभा १५ . २७५ . रुपी - वि . रुप घेतलेला ; त्यासारखा ; एखाद्याची आकृति धारण केलेला . समासांत पिशाचरुपी , देवरुपी , दैत्यरुपी . रुपिणी - स्त्री . रुप घेतलेली . प्रणवरुपिणी मूळप्रकृति ।

रुप     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
रुप  m. m.v.l. for रूप, [AV. xviii, 3, 40.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP