|
पु. घन ; जलद . हिम . दाट धुकें पडलें असतांना हवेपासून उत्पन्न होणारा व नंतर विस्तवावर तयार केलेला एक विशिष्ट खाण्याजोगा पदार्थ . [ सं . मेघ ; प्रा . मेह ; गुज . हिं . मेह ; सिं . मेहु ] ( वाप्र . ) ०ओळणें ढग येणें ; आकाश अभ्राच्छादित होणें . असंभाव्य मेघ ओळला । एकाएकीं चहूंकडे । - ह १२ . ४५ . सामाशब्द - ०गंभीर वि. मोठा नाद करणारा ; मेघगर्जनेप्रमाणें घन व पूर्ण . [ सं . मेघ + गंभीर [ ०गर्भ पु. ( अनेक वचनी उपयोग ) गारा ; करका . [ सं . ] ०डंबर मेघाडंबर - नपु . मेघांचें अवडंबर ; आभाळ भरुन येणें ; ढगाचें छत . ( ल . ) पोकळ धमकावणी ; व्यर्थ वल्गना ; भयंकर पण निष्फळ देखावा . ०डंबर री - स्त्री . छत ; मंडपी ; उंच छत्री . भक्ति वैराग्य ज्ञान । हेंचि माहीमार्तब सूर्यपान । मेघडंबर पताका । - स्वादि ७ . ५ . ५२ . घुमट ; हत्तीवरील अंबारी . यापरी हवदे मेघडंबरी । - नव १३ . ७५ . - वि . मंडपी , छत असणारा ( देव्हारा , डोला इ० ). [ सं . ] ०तडित स्त्री. ( शाप . ) ढगांतील वीज ; ( इं . ) लाइटनिंग . [ सं . ] ०तडिद्वाहक पु. ( पदाव ) ढगांत उत्पन्न होणार्या विजेपासून संरक्षण होण्याकरितां इमारतीच्या उंच भागावर धातूच्या पट्ट्या बसवून त्या जमीनींत पुरलेल्या असतात त्या प्रत्येक . [ सं . मेघ + तडित + वाहक ] ०पटल न. ढगांचें आवरण ; छत ; ढगांनीं आकाश आच्छादित होणें . ( क्रि० येणें ; पडणें ). ०मंडल न. मेघांचा समुदाय . मेघांचा प्रदेश ; वातावरण , आकाश . [ सं . मेघ + मंडल ] ०मल्हार पु ( संगित ) एक राग . ह्या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , कोमल निषाद , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति षाडव - षाडव . वादी षड्ज . संवादी पंचम . गानसमय मध्यरात्र . वर्षाऋतूंत सार्वकालिक [ सं . ] ०मांस न. मेघ अर्थ २ पहा . [ सं ] ०माळ स्त्री. कागद कातरुन केलेली माळ ; नक्षत्रमाळ ; रंगमाळ पहा . ०माळा स्त्री. ढग ; मेघपंक्ति . मेघावर केलेला एक भविष्यसूचक ग्रंथ . रहाटगाडग्यावरील गाडग्यांची माळ . ०रंजनी पु. ( संगीत ) एक राग . ह्या रागांत षड्ज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , तीव्र निषाद हे स्वर लागतात जाति औडुव - औडुव . वादी मध्यम . संवादी षड्ज . गानसमय रात्रीचा चौथा प्रहर . क्वचित ह्या रागांत तीव्र मध्यम घेण्यांत येतो . ०वितान न. मेघडंबरी ; मेघांचा चांदवा , विस्तार . [ सं . ] ०श्याम वि. ढगासारखा काळासावळा ; घनश्याम मेघाडंबर न . मेघडंबर पहा . मेघुडा पु . प्रळयकालचा मेघ . मग मेघुडे विराले । - विउ ५ . ४९ . मेघोडा , मेघौडा , मेघौडें पुन . मेघ ; ढगांचा समुदाय . जैसे वर्षाकाळींचे मेघौडे । - ज्ञा ११ . १९४ . [ प्रा . ] मेघौनि क्रिवि . मेघापासून . देखे मेघौनि सुटती धारा । - ज्ञा ६ . ८७ . [ मेघ + हून - ऊन ]
|