Dictionaries | References

बे

   
Script: Devanagari
See also:  अबे

बे     

noun  आथिखाल जायगा एबा बै जायगा जेराव जों दं   Ex. बेनिफ्राय आं थोंजोङै नवाव थांगोन
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बेयाव बेहाय
Wordnet:
asmইয়াত
benএখান
kanಇಲ್ಲಿ. ಇಂದು
kasییٚتہِ
mniꯃꯐꯝꯁꯤꯗ
oriଏହିସ୍ଥାନ
panਇੱਥੋ
urdیہاں

बे     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : ऐलकोव

बे     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जातूंत मातसो व्हड कक्ष उगडता अशी ल्हान घेरिल्ली सुवात   Ex. तो बेयंत कदेलार बसला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benএলকোভ
hinऐलकोव
oriଏଲକୋବ
panਦਬਕਾ
sanकुञ्जः
urdایلکو , بے
See : दोन, दोन

बे     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bē a Two. Used only in multiplying by two, or in comp. with numbers; as बे एके बे, बे त्रिक साहा, बेवीस, बेचाळीस.
have been judged sufficient.

बे     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
A privative particle and inseparable preposition.

बे     

वि.  दोन . याचा उपयोग फक्त पाढ्यांत किंवा संख्यावाचक शब्दांना जोडून समासांत होतो . बे एके बे , बे दुणेचार . बेवीस = बावीस . [ हिं . बे , बा ; तुल० सं . द्वि , द्वा ; प्रा . बा , बि , बे ]
शअ . वांचून ; विरहित ; अभाव दाखविणारा उपसर्ग . याचा फारशी किंवा हिंदी शब्दांशीं समास होतो व हा शब्द नेहमीं पूर्वपद असतो . [ फा . बी ; तुल० सं . विना ; हिं . बिन ] ज्यांच्या पूर्वपदीं बे शब्द येतो असे अनेक सामासिक शब्द आहेत . त्यांतील कांहीं पुढें दिले आहेत . सामाशब्द -
संबोधन . अरे ! हे ! ए ! ( आज्ञार्थी किंवा बेपर्वाई दाखवितांना योजतात ). [ हिं . ]
०अकली वि.  मूर्ख ; बेवकूब . [ फा . बी + अक्ल ]
०अदब   बी - स्त्री . अपमान ; असभ्यता ; अमर्यादा ; अनादर . [ फा . बी + अदबी ]
०अदाई  स्त्री. स्वामिद्रोह ; विरोध .
०अबरु   अब्रू - स्त्री . दुलौकिक ; अपकीर्ति ; फजिती . [ फा . बी + आब्रू ]
०अबस   क्रिवि . वृथा ; व्यर्थ ; निष्फळ .
०आब  पु. अपमान ; बेअब्रू . - वि . अपमान झालेला . [ फा . बी + आब ]
०आराम वि.  अस्वस्थ ; आजारी . [ फा . बी + आराम ]
०आरामी  स्त्री. अस्वास्थ्य . [ फा . ]
०इज्जत   ती - स्त्री . अप्रतिष्ठा .
०इज्जती वि.  गैरअब्‍रुदार ; हलकट . [ फा . ]
०इतबार  पु. गैरविश्वास ; गैरभरंवसा . [ फा . ]
०इतल्ला   क्रिवि . गैरमाहीत ; बे - दखल ; बडतर्फ . त्याचे कार्कून बे - इतल्ला केले . - रा १० . ११० . [ फा . ]
०इनसाफ   इनसाफी - पुस्त्री . अन्याय ; न्यायाचा अभाव . - वि . अन्यायाचा ; अन्यायी . [ फा . ]
०इमान   इमानी बेमान - वि . कृतघ्न ; अप्रामाणिक ; बेभरंवशाचा . [ फा . बी + ईमान = अधर्मी ]
०इमानी   इमानकी - स्त्री . खोटेपणा ; अप्रामाणिकता ; कृतघ्नता ; विश्वासघातकीपणा .
०इलाज वि.  निरुपाय ; नाइलाज . [ फा . ]
०उजूर   क्रिवि .
कांहीं सबब न सांगतां ; बिनतक्रार . या दिवसांत पोटास न मिळे तेव्हां लोक चाकरी बे - उजूर कैसी करितील ? - रा १० . ५७ .
विलंबरहित ; बेधडक . [ फा . ]
०कदर   क्रिवि . निर्धास्तपणें .
०कम    कास्त - क्रिवि . कांहीं कमी न करतां ; साद्यन्त ; जसेंच्यातसें . [ फा . बी + कम + उ + कास्त ]
०करारी  स्त्री. अनिश्चिती ; तहमोड . त्याजकडून बेकरारीच्या चाली सुरु होतात . - रा ७ . १९ .
०कस वि.  नि : सत्त्व ; कमजोर ; बेचव ; शुष्क .
०कानू  स्त्री. अन्याय ; जुलूम .
०कानून   कानू - वि . बेकायदेशीर ; कायद्याचा भंग करुन केलेलें . [ फा . ]
०कायदा  पु. कायदेभंग ; कायद्यासंबंधाचा अभाव .
०कायदा   कायदेशीर - वि . नियमबाह्य ; गैरकायदेशीर ; जुलमी ; नियमांचें उल्लंघन करणारा ; नियमाला सोडून असलेला [ फा . बी + काइदा ]
०कार वि.  
निरुद्योगी ; बे - रोजगारी ; रिकामा .
( व . ) निरर्थक ; व्यर्थ ; उगाच .
( ल . ) हैराण ; निरुपयोगी . तिन्ही मोर्चे मिळोन निमे माणूस दूखणियानीं बेकार आहे . - पेद ३ . १८ . [ फा . ]
०कारचावडी  स्त्री. ( कों . ) रिकामपणाच्या , निरर्थक गप्पागोष्टी .
०कारी  स्त्री. रिकामपणा ; निरुद्योगिता ; बेरोजगारपणा . [ फा . बीकारी ]
०किलाफ  पु. मैत्री ; सख्य ; संशयनिवारण . [ अर . खिलाफ = वैर ]
०कुबी  स्त्री. मूर्खपणा ; गाढवपणा ; मौर्ख्य . [ फा . बेवकुफी ]
०कुसूर   क्रिवि . न चुकतां ; बिलाकसूर ; पूर्णपणें . [ फा . बी + कुसुर ]
०कूब वि.  मूर्ख ; वेडगळ ; वेडझंवा [ फा . बेवकुफ ]
०कैद  स्त्री. शिस्तीचा अभाव ; स्वैर वर्तन ; अव्यवस्थितपणा ; कायदा , नियम किंवा शिस्त यांचें उल्लंघन . - वि . बेशिस्त ; स्वैर ; अनियंत्रित . - क्रिवि . स्वैरपणानें ; कोणत्याहि तर्‍हेचा कायदा किंवा नियम न मानतां . [ फा . बी + कैदी ]
०कैदी वि.  स्वैर ; कायदा , नियम , नियंत्रिण इ० न पाळणारा ; बेशिस्त .
०कौली वि.  बिगर कौलाचा ; अभयपत्रविरहित .
०खत्रे   क्रिवि . नि : शंकपणें . बेखत्रे हुजूर यावें . - जोरा १०५ .
०खबर   क्रिवि . असावध ; गाफीलपणें . [ फा . बी + खबर ]
०खबर्दार वि.  गैरसावध . [ फा . ]
०खर्च   खर्ची - वि .
खर्च केल्याशिवाय झालेलें , केलेलें ; फुकटंफाकट .
खर्ची जवळ नाहीं असा ; निर्धन ; कृपण . [ फा . बी + खर्च ]
०खातरी  स्त्री. अविचार . चार कोटींची मालियत जवळ असतां कंजूषपणानें सर्दारास बेखातरीनें निरोप दिल्हा . - जोरा १०९ .
०गर्द वि.  वृक्षरहित ; झाडी नसलेलें . मुलूख अगदीं वीसपंचवीस कोसपर्यंत बे - गर्द , बेचिराख जाहला . - पाब १४ . [ फा . बगिर्द ]
०गार   गारी - बिगार , बिगारी पहा .
०गुन्हा  पु. गुन्ह्यापासून मुक्तता , सुटका . - वि . गुन्हा नसलेला ; अपराधांतून मुक्त झालेला . - क्रिवि . गुन्हा नसतांना . बक्षीस बेगुन्हा कैद केलें . - जोरा १०५ . [ फा . ]
०गुमान   नी - वि . बेपर्वा ; गर्विष्ठ ; उन्मत्त ; नि : शंक ; मुर्वत नसणारा . [ फा . बेगुमान ]
०चतुर वि.  मूर्ख .
०चरक   क्रिवि . निर्भयपणें ; धडाक्यानें ; निर्भीडपणें ; बेधडक .
०चव वि.  रुचिहीन ; कवकवीत ; नीरस ; निचव .
०चाड वि.  चाड नसलेला ; लज्जाहीन ; उद्धट .
०चिराख    - वि . दीपहीन ; ओसाड ; उध्वस्त ; वस्तीरहित ; उजाड . [ फा . बी + चिराघ = दिवा ]
०चूक वि.  बिनचूक ; बरोबर ; चुका केल्याशिवाय . [ फा . बी + हिं . चूक ]
०चैन वि.  अस्वस्थ ; कांहींहि सुचत नाहीं असा . [ फा . बी + हिं . चैन ]
०चोबा  पु. खांबाशिवाय असलेला लहान तंबू . [ फा . बीचोबा ] छूटपणा पु . आळा , बंध नसणें ; स्वैराचार ; स्वच्छंदीपणा .
०जबाब   क्रिवि . उद्धटपणानें ; बेपर्वाईनें ( बोलणें , उत्तर देणें ). [ फा . बी + जवाब ]
०जबाबदार वि.  स्वत : वरची जोखीम न ओळखणारा ; जोखीम न ओळखून स्वैर वागणारा . बेजबाबदार राज्यपद्धति स्त्री . लोकमतास जबाबदार नसलेली राज्यपद्धति .
०जबाबी वि.  
उद्धट ; उर्मट ; बेमुर्वतखोर .
तासाचे ठोके न देणारें ( घड्याळ ). [ फा . बी + जवाब = निरुत्तर ]
०जरब   क्रिवि . निर्भयपणें ; नि : शंकपणें ; बेधडक ; जोरानें ; उठाव करुन ; धाक न बाळगतां . आमच्या भले लोकांनीं बेजरब घोडीं घालून कित्तूरकरास मोडून वोढ्यापर्यंत नेऊन घातला . - ख ५ . २३८८ . [ फा . ]
०जात वि.  ( अशिष्ट ) हलक्या किंवा निराळ्या जातीचा .
०जान वि.  निर्जीव ; ठार . [ फा . ]
०जाब वि.  बेगुमान ; बेमुलाजा ; बेजबाबदार . [ फा . ]
०जाबता  पु. अन्याय ; ठरावाविरुद्ध गोष्ट ; अविचारी भाषा . आम्ही टोंचून घेणार नाहीं , असेना असे मरुन जाऊं असे बेजाबता बोलत होते . - टिळकचरित्र , खंड १ .
०ज्यहा   जा जहा - वि . फाजील ; अनाठायीं ; अनुचित ; अयोग्य ; अमर्याद ; अकालीन ; रुष्ट ; उधळपट्टीचा . [ फा . बी + जा ] बेजार - वि .
हैराण ; त्रस्त ; दमलेला ; थकलेला ( श्रम , दु : ख , कटकट यांमुळें ).
दुखण्यानें हैराण झालेला ; दुखणाईत . [ फा . बीझार ] बेजारी - स्त्री . त्रास ; हैराणी ; थकवा .
०डर  न. ड्रेडनॉट नांवाचें जंगी लढाऊ जहाज . - वि . न भिणारा ; न डरणारा . बेरड पहा . [ हिं . डर ]
०डौल वि.  कुरुप ; बेढब ; घाट किंवा आकार चांगला नसलेला .
०ढंग  पु. दुराचरण ; स्वैराचार ; बेताल वागणूक ; सोदेगिरी . [ हिं . ]
०ढंग   गी - वि . दुराचरणी ; व्यसनी ; स्वैराचारी . [ हिं . ]
०ढब वि.  बेडौल ; कुरुप ; विक्षिप्त ; ढबळशाई ; चांगला घाट , आकार नसलेला ; ओबडधोबड . [ हिं . ]
०तकबी वि.  असमर्थ ; ना - तवान . [ फा . बेतक्विया ]
०तकसीर   तकशीर बेतक्शीर बेतकसीर - स्त्री . अपराधापासून , गुन्ह्यापासून मुक्तता . - वि . निरपराधी ; नाहक ; निर्दोषी . [ फा . बी + तक्सीर ]
०तमा  स्त्री. 
निर्लोभी वृत्ति .
बेफिकीरपणा ; बेपरवा ; उदासीनपणा . - वि .
निर्लोभी ; निरिच्छ .
बेपरवा ; बेगुमान ; गर्विष्ठ ; निष्काळजी ; बेसावध ; काळजी , कळकळ न बाळगणारा . - क्रिवि . बेगुमानपणें . खांद्यावर टाकून पदर बोले बेतमा । लग्नाच्या नवर्‍याशीं बोले बेतमा । - पला . [ फा ]
०तमीज वि.  ( ना . ) उद्धट ; असभ्य . [ फा . बे + तमीज ]
०तर्तूद  स्त्री. तजविजीचा अभाव ; अव्यवस्था .
०तर्‍हा  स्त्री. असाधारणपणा ; वैलक्षण्य ; चमत्कारिकपणा . - वि . विलक्षण ; चमत्कारिक ; असाधारण ; भारी ; अतिशय . याउपर उपेक्षा करुन कालहरण केलियास नबाबाचे दौलतीस बे - तर्‍हा धक्का बसेल . - रा ५ . १६६ . [ फा . बी + तरह ]
०ताब वि.  असमर्थ ; क्षीण ; हतधैर्य . मातुश्री अहल्याबाई यांस शैत्यउपद्रव होऊन पांचसात दिवस बे - ताब होती . - मदबा १ . २१८ . [ फा . बी + ताब ]
०ताल    - वि .
गायनांत तालाला सोडून असलेलें ( गाणें - बजावणें ).
ताल सोडून गाणारा , वाजविणारा .
( ल . ) अमर्याद ; अनियंत्रित ; स्वैर ; उधळ्या . [ हिं . ]
०तालूक वि.  गैरसंबंधीं ; संबंध नसलेला ; भलता . [ फा . बे + तअल्लुक = संबंध ]
०दखल वि.  
अधिकारच्युत ; बेइतल्ला .
गैरमाहीत . [ फा . बी + दख्ल ]
०दम वि.  दम कोंडला जाईपर्यंत ; निपचीत पडेपावेतों दिलेला ( मार ); थकलेला ; दमलेला ; निपचीत . [ फा . ]
०दरद   दी दर्द दर्दी - वि .
बेफिकीर ; बेगुमान ; मागेंपुढें न पाहणारा ; भय न बाळगितां स्वच्छंदपणें वागणारा .
बारीकसारीक विचार न पाहणारा .
निर्घृण ; क्रूर ; दया नसलेला . [ फा . ]
०दस्तूर  पु. अन्याय ; नियमाविरहित गोष्ट ; गैरशिरस्ता .
०दस्‍रतूई  स्त्री. ( गो . ) उधळेपणा . [ फा . ]
०दाणा   दाना - पु .
आंत बी नाहीं असें द्राक्ष . हें लहान , गोड , गोल , बिनबियांचें असतें .
सुकविलेलें द्राक्ष ; किसमिस . [ फा . ]
०दाणा   - न . दाण्यांत बीं नसलेलें डाळिंब .
डाळिंब   - न . दाण्यांत बीं नसलेलें डाळिंब .
०दाद  स्त्री. बेंबदशाही ; अन्याय ; जुलूम . [ फा . ]
०दार   क्रिवि . जागृत ; तयार . नबाब बेदार जाले . - रा ७ . ८३ . [ फा . ]
०दावा  पु. सोडचिठ्ठी ; नामागणी ; हक्क सोडणें . दावा पत्र , फारखती नस्त्री . हक्क सोडल्याबद्दल , नसल्याबद्दल लिहून दिलेला कागद ; सोडचिठ्ठी .
०दिकत   दिक्कत - क्रिवि . बेलाशक ; बिनहरकत ; बिनतक्रार ; बेउजूर ; नि : शंकपणें . [ फा . ]
०दिल   दील - वि . उदासीन ; असंतुष्ट ; दु : खी ; कष्टी . [ फा . ]
०दील   - बिथरणें .
होणें   - बिथरणें .
०दिली  स्त्री. 
असंतुष्टता ; औदासीन्य ; निरुत्साह .
रुष्टता ; मनाचा बेबनाव .
०दुवा  स्त्री. अवकृपा ; शाप . [ अर . ]
०धडक   क्रिवि . बिनधोक ; निर्धास्तपणें ; निर्भय ; बेलाशक . [ हिं . ] धरी वि . धरबंद नसलेला ; नियंत्रण नसलेला ; मोकाट ; स्वैर . [ बे + धर ]
०नवा वि.  अधीर ; असहाय ; निर्धन ; भुकेला . पादशहा बेनवा होऊन खानास लिहीत . - मराचिथोरा ५३ . [ फा . ]
०नहाक   नाहक - क्रिवि . विनाकारण ; उगीचच्याउगीच ; कारण नसतांना ; हक्कनहक्क , हक्कनाहक्क पहा .
०निगा  स्त्री. दुर्लक्ष ; अपरक्षण . [ फा . ]
०निसबत   क्रिवि . बेलाशक ; कांहींहि विचार न करतां ; मनांत कोणातीहि शंका न बाळगतां ; बेपर्वाईनें ; एकदम . [ फा . ]
०निहायत   न्याहत - क्रिवि . नि : सीम ; अपार ; पराकाष्ठेचा . [ फा . ]
०पडदा वि.  
पडदा नसलेला ; उघडपणें ; कोणत्याहि तर्‍हेची गुप्तता न राखतां .
( ल . ) मानखंडित . क्वचित नामाप्रमाणें उपयोग करितात . - पु .
उघड गोष्ट ; स्पष्ट गोष्ट .
( ल . ) मानखंडना . [ फा . ]
०परवा   पर्वा - वि . निष्काळजी ; निर्भय ; बेगुमान . [ फा . ]
०परवाई   पर्वाई - स्त्री . निष्काळजीपणा ; बेगुमानी ; स्वैरवृत्ति . [ फा . बी + पर्वाई ; तुल० सं . द्विप्रव्राजिनी ]
०पाया वि.  गैरकायदा ; नियमाविरुद्ध .
०फंदी वि.  
व्यसनी ; दुराचारी ; स्वैर .
खट्याळ ; उच्छृंखल ; खोडकर ( मूल ).
०फाम वि.  
बेसावध ; बेशुद्ध .
निश्चिन्त ; गाफिल ; अनावर ; मस्त ; तुफान ; बेभान . शत्रू माघारा गेला म्हणून बेफाम नाहीं , सावधच आहों . - ख ७ . ३३१० . [ फा . बी + फहम ]
०फामी  स्त्री. गैरसावधपणा ; गाफिली ; निश्चिन्ती ; खातर्जमा ; दुर्लक्ष . या विश्वासावर बेफामी जाली याजमुळें दगाबाजीनें निघोन गेला . - दिमरा १ . २५२ .
०फायदा वि.  गैरफायदेशीर ; तोट्याचें ; अव्यवस्थित .
०फिकिर   फिकीर - स्त्री . निष्काळजीपणा . - वि .
निष्काळजी ; बेपर्वा ; अविचारी .
निश्चिंत ; निर्धास्त ; संतुष्ट . [ फा . बी + फिक्र ]
०फिकिरी  स्त्री. निष्काळजीपणा ; गाफिली ; नि : शंकपणा .
०बंद  पु. अराजकता ; शिस्तीचा अभाव ; गोंधळ . हुजरातीमध्यें बेबंद सर्वथा होऊं देऊं नये . - मराआ १४ . - वि . अव्यवस्थित ; मुक्त ; व्यवस्था , बंदोबस्त , कायदा , शिस्त इ० नसलेला ; बेशिस्त ; अराजक . [ फा . ]
०बंदशाई   ही बेबंदाई बंदी - स्त्री .
अव्यवस्था ; गोंधळ ; मोंगलाई ; अनायकी ; अंदाधुंदी ; अराजकता .
जुलूम . सांगुं किती दुनियेवर बेबंदी । ही मस्लत खंदी । - राला १०६ .
०बदल वि.  
बदललेला .
बंडखोर . गुलाम कादरखान पादशहासी बेबदल होऊन ... - दिमरा १ . २०० . [ फा . ]
०बनाव  पु. भांडण ; तेढ ; तंटा ; बिघाड .
०बर्कत  स्त्री. अवनति ; हलाखी ; तोटा . [ फा . ]
०बहा वि.  अमोल ; किंमत करतां येणार नाहीं असें . [ फा . ]
०बाक वि.  निर्भीड ; बेडर . [ फा . ] बाक , , बेबाकी स्त्री . अशेष फडशा ; कर्जाची पूर्ण फेड . - वि . नि : शेष ; संपूर्ण ; कांहींहि शिल्लक , बाकी न ठेवतां फेडलेलें ( कर्ज ). [ फा . ]
०बारत  स्त्री. बेइतबार ; अविश्वास .
०बुनियाद   बुन्याद - स्त्री . अन्याय ; राखरांगोळी ; नाश . आम्ही मदारुल महाम व फरांसीस तिघे मिळून इंग्रेजांची बेबुनियाद करुं . - रा १० . १९९ . [ फा . बुनियाद = पाया ] बुदी बूद - स्त्री
नाश ; खराबी ; अभाव .
नाबूद . [ फा . ]
०भरंवसा   भरोसा - पु . अविश्वास ; संशयितपणा ; खात्री नसणें . [ हिं . ]
०भरोशी वि.  खात्री किंवा भरंवसा अगर विश्वास ठेवतां येणार नाहीं असा ; फसव्या .
०मजगी  स्त्री. वितुष्ट ; अरुचि ; बेबनाव . पादशहांची व गुलामकादर यांची बेमजगी होऊन ... - दिमरा १ . १९९ . [ फा . ]
०मनसबा   मन्सबा - पु . अविचार ; खराब मसलत . [ फा . ]
०मब्लग   मब्लक मोब्लक - वि . असंख्य ; अपरिमित . [ अर . मब्लघ ]
०मरामत  स्त्री. नादुरुस्ती . आरमाराची बेमरामत जाली . - वाडसमा २ . १९५ . - वि . नादुरुस्त ; दुरुस्तीची जरुर असलेलें ; दुरुस्तीवांचून असलेलें ; अव्यवस्थित . [ फा . ]
०मर्जी  स्त्री. इतराजी ; अवकृपा ; मर्जीविरुद्ध वर्तन . [ फा . ]
०मलामत वि.  कीर्तिवान . [ अर . मलामत = दूषण ]
०मस्लत  स्त्री. अविचार . स्त्रीनायक , बालनायक आणि बेमस्लत , तीन गोष्टी येके ठिकाणीं ; चौथा अहंकार ; तेव्हां ईश्वर त्या सर्दारीची अब्रू ठेवील तर ठेवो . - खलप २ . ७० . [ फा . ]
०मान   मानी मानकी गी - बेइमान इ० पहा . मानगिरी - स्त्री . बेइमानी ; हरामखोरी .
०मार वि.  
मार किंवा हल्ला करतां न येण्यासारखा ( किल्ला ).
अतिशय ; कमालीचा ; जोरदार ; विपुल ; भरपूर , बेसुमार इ० . उदा० बेमार - पाऊस - वारा - उन्ह - धूळ - लढाई - पीक - धान्य - आंबे इ० ( पडतो - सुटला - पडतें - उडते - चालती - झालें - पिकले इ० क्रियापदांस जोडून उपयोग ).
आजारी ; दुखणाईत .
थकलेला ; दमलेला ; बिमार .
( व . ) वस्ती नसलेलें ; उपयोगांत नसलेलें ( घर , वस्तु ). [ फा . ]
०मारी  स्त्री. 
आजार ; आजारीपण ; दुखणें .
शीणभाग ; थकवा ; अशक्तता .
०मालूम वि.  माहीत न होण्याजोगें ; दिसणार नाहीं , ओळखतां येणार नाहीं , शोधतां येनार नाहीं असें ; जाणण्यास कठिण ; हुबेहुब . नवीन माहितीचा जुन्या पद्धतीशीं बेमालूम सांधा जोडणें कठिण आहे . - टि ४ . २७१ . [ हिं . ]
०मुनासीब   मुनासब - वि . अयोग्य ; गैरवाजवी ; बुद्धीला न पटणारें ; अयुक्त . [ हिं . ]
०मुन्सफी  स्त्री. अन्याय . हिंदू मुसल्मान , ईश्वराचे घरचे दोन्ही धर्म चालत असतां मुसल्मानानें हिंदूचे जाग्यास उपद्रव करावा हे बे - मुन्सफी . - पया १० . [ फा . ]
०मुरवत   मुर्वत - क्रिवि . असभ्यपणें शिष्टाचाराला सोडून ; भीड , पर्वा इ० न बाळगतां . [ फा .
०मुरवत   ती मुर्वत ती - वि . कठोर ; निर्दय ; निर्भीड ; निर्भय ; बेमुलाजा . [ फा . मुरुवत = माणुसकी ]
०मुलाजा   मुलाहिजा - क्रिवि . कांहीं न पाहतां ; दयामाया सोडून ; निष्ठुरपणें ; बेमुर्वतपणें . [ अर . मुलाहझा = पर्वा , विचार ]
०मोताद वि.  बेसुमार ; असंख्य ; अपरिमित . [ अर . मुअतद्द = संख्या , परिमित ]
०मोयींन   मोईन मोइनी मोहीन - वि .
अनियमित ; ठरावबाह्य .
अपरिमित ; असंख्य . [ फा . बी + मुअय्यन ]
०मोहर  स्त्री. बिन शिक्क्याचें ; शिक्का नसलेलें ; गैरमोहरबन्दी . कित्येक दफ्तरें सर्वमोहर व कितेक बे - मोहरेचीं . - रा , खलप २ . ९ . [ फा . ]
०मोहीम वि.  मोहीम न करणारा ; उपजीविकेकरतां किंवा धंद्या - उद्योगाकरितां खटपट न करणारा ; घरबशा ; बाहेर न जाणारा . [ फा . ]
०रंग  पु. विरस ; खराबी ; मौजेचा ( मान , कीर्ति , सौंदर्य इ० चा ) भंग ; अपमान ; फजीति . - वि . ज्याचा रंग बिघडला आहे असा . [ हिं . ]
०राजी वि.  असंतुष्ट . [ फा . ]
०रुख्सत   क्रिवि . पर्वानगीवांचून . [ अर . रुख्सत = परवानगी ]
०रुख   रोंख - पु .
दुसरीकडे तोंड फिरविणें ; दिशा बदलणें .
प्रेमाचा अभाव . - वि . अप्रसन्न ; उदासीन ; रुष्ट ; विन्मुख . [ फा . रुख = दिशा ]
०रोजगार   री - वि . निरुद्योगी ; बेकार ; रिकामा . [ फा . ]
०लगाम   मी - वि .
लगाम नसलेला .
लगामाला दाद न देणारा .
( ल . ) अनियंत्रित ; स्वैर ; मोकाट ; बेताल .
आडवळणी ; जाण्यायेण्यास सोयीचें नसलेलें ; एकीकडे असलेलें ; गैरसोयीचें ( शेत , घर ). - क्रिवि . एकीकडे ; एका बाजूला ; आडरस्त्यावर . [ फा . बी + लिगाम ]
०लगामी   -
पडणें   -
भलत्या मार्गाला लागणें ; बहकणें ; स्वैर बनणें .
हयगय होणें ; आबाळ होणें .
०लाग  पु. निरुपायाची किंवा नाइलाजाची स्थिति . माझा बेलाग झाला . - वि .
जो घेण्याला किंवा ज्यावर मारा करण्याला कठिण आहे असा ; दुस्साध्य ; अवघड ; बळकट ( किल्ला ).
दु : साध्य ; दुराराध्य ; अप्राप्य ; आचरण्यास कठिण असा ( विषय ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP