|
क्रि.वि. बाहेर ; बाहेरच्या बाजूस . ( समासांत ) बहि : प्रदेश ; बहिर्भाग ; बहिष्कार इ० [ सं . ] उत्कर्ष . - मुधो . ( अर .) ०करण न. चक्षुरादि दहा इंद्रियें . [ सं . ] ०प्रीति बहिर्ममता बहिर्लोभ - स्त्रीपु . वरकंरणी प्रीति , माया . [ सं . ] बहिरंग - न . बाह्य स्वरुप . - वि . परका ; अपरिचित ; दूरचा ; आपल्या कुळाच्या , अनुयायांच्या विस्तारांत नसलेला . याच्या उलट अंतरंग . [ सं . ] ०रंगपरीक्षण न. विशेष खोलांत न जातां वरवर केलेलें आलोचन . [ सं . ] रंगो पासन न . बाह्य उपासना . ही संपद्विधि , आरोपविधि , संवर्गविधि व अध्यासविधि अशी चार प्रकारची आहे .; कर्मभक्ति . [ सं . ] ०रवसा पु. बाहेरची ( भूत , पिशाचांची ) बाधा . बहिरवास , बहिर्वास , बहीरवास पु . बाहेर राहणें . ( महानु . ) बाहेरच्या उपयोगाचें नेसावयाचें वस्त्र ; उत्तरीय वस्त्र चोखट बहिरवास वेढीति । - पूजावसर . [ सं . ] ०रानीं क्रिवि . उघड्या मैदानांत ; मोकळेपणें ( भटकणें ). ०रायाम - पु . एक प्रकारचा धनुर्वात . यांत रोग्याची छाती पुढें येऊन पाठीकडे कमान होते . अंतरायाम वात पहा . [ सं . ] वात - पु . एक प्रकारचा धनुर्वात . यांत रोग्याची छाती पुढें येऊन पाठीकडे कमान होते . अंतरायाम वात पहा . [ सं . ] ०रुपद्रव बहिरवसा पहा . [ सं . ] बहिर्कोप पु . ( प्र . बहि : कोप ) वरपांगी धारण केलेला खोटा राग . [ सं . ] बहिर्गृह न . पडवी ; ओसरी ; ओटी ; ढेलच - ज ; देवडी . [ सं . ] ०र्दत पु. ओठाच्या बाहेर आलेला दांत . [ सं . ] ०र्दाह पु. शरीराची काहली ; याच्या उलट अंतर्दाह . [ सं . ] ०दिंशेस जाणें - अक्रि . शौचास जाणें . भूमीस जाणें - अक्रि . शौचास जाणें . ०र्द्वार न. व्यभिचार ; रांडबाजी . बहि : प्रकृति स्त्रीअव . राज्यकारभाराचें एक अंग . कोश , राष्ट्र , दुर्ग , बल आणि प्रजा इ० याशिवाय दुसरी अंत : प्रकृति . प्रकृति अर्थ ७ पहा . [ सं . ] ०र्भाव पु. बाह्य भाव , डौल , स्थिति , देखावा , हेतु [ सं . ] ०र्भूत वि. बाह्य ; बाहेरील . मनाची गणना कोण्हीं इंद्रियांत करितात कोणी त्याहून बहिर्भूत असें गणतात . [ सं . ] र्भूमीची व्यथा स्त्री . ( ल . ) हगवणीचा उपद्रव . ०र्मुख वि. बाहेर तोंड असलेला ; बाह्य , प्रापंचिक गोष्टींकडे कल असलेला ; विषयासक्त . याच्या उलट अंतर्मुख . [ सं . ] ०लॅंब वि. विशाल कोणाचा . ०र्लापिका कोडें ; गूढ ; ज्याच्या अर्थपूरणासाठीं बाहेरचें पद इ० घ्यावें लागतें अशी कूट कविता . अंतर्लापिकेच्या उलट . [ सं . ] ०र्वक्रपृष्ठ न. गोलाचें पृष्ठ बाहेरच्या बाजूनें पाहिलें असतां दिसणारा आकार . - सूर्य ८ . ०वर्ती वि. बाहेर राहणारा , असणारा . ( ज्यो ) श्रेष्ठ ; सूर्याभोंवती होणार्या पृथ्वी - प्रदक्षिणेच्या मंडलाबाहेर असणारा ( ग्रह ). बुध , शुक्र या शिवाय बाकीच्या ग्रहांस बहिर्वर्तीग्रह म्हणतात . [ सं . ] ०र्विकार पु. ( ल . ) उपदंश ; गर्मी . बाह्य , शारीरिक आजार [ सं . ] ०र्व्यसन न. बहिर्द्वार पहा . [ सं . ] ०र्व्यसनी वि. व्यभिचारी ; रंडीबाज . [ सं . ] बहिस्त्रिक , बहिस्त्रिककरण न . नृत्याचा एक प्रकार . बहि : स्नेह पु . दिखाऊ , खोटी प्रीति , ममता . [ सं . ]
|