Dictionaries | References

निज

   { nija }
Script: Devanagari
See also:  नीज

निज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Own, proper, peculiar. 2 Used as s n f One's own affairs. v सांग, बोल &c. Pr. निजेवांचून पुजा नाहीं No one serves or honors another disinterestedly. Numerous compounds occur, esp. in poetry. The useful ones follow in order.

निज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Own, proper, peculiar.
n f  One's own affairs. Pr.
निजेवांचून पूजा नाहीं.   No one serves or honours another disinterestedly.

निज     

वि.  आत्मीय , आपले , खाजगी , निजी , स्वकीय , स्वतःचे .

निज     

न १ मन . २ निजगुज ; विश्वरुप . ३ आत्मस्वरुप ; स्वस्वरुप . पाहें पां वालभाचे नि व्याजें । तिया व्रजांगनांचीं निजें । - ज्ञा ९ . ४६५ . [ सं ]
वि.  स्वतःचे स्वकीय , आत्मीय ; आपले ; ( अत्यंत - शर ) - नस्त्री . स्वतःची कामे ( क्रि० सांगणे ; बोलणे ). म्ह ० निजेवाचून पुजा नाही = फुकट कोणी कोणाच्या उपयोगी पडत नाही . [ सं . ]
 स्त्री. झोंप . तदुक्तिस जन प्रभो जरि निजेमधे चावळे । - केका ७३ . [ सं . निद्रा ] निजगळ - वि . ( ना . ) झोंपाळू . निजतीक्रिया - स्त्री . प्रेत निजल्या स्थितीत पुरणे .- बदलापूर १७२ . निजणे - अक्रि . १ झोंप घेणे ; झोंपणे . टपकण निज . महारपोर रात्र शिळी करतील . ( लहान मुलाला लवकर निजविण्यासाठी म्हणतात . ) २ आडवे होणे ; कलणे ; लोळणे . ३ आजारी पडणे ; हांतरुणाला खिळणे . ४ ( ल . ) मरणे . ५ नाश पावणे ; बुडणे ; नाहींसा होणे . ( धंद्यातील भांडवल , धंदा , व्यापार इ० ). ६ भरभराटीस न येणे ( दैव ); मंद चालणे ( कामधंदा ); नाहींसा होणे ( हुकमत , अधिकार ); बेचिराख , उजाड होणे ( घर , गांव ). ७ संभोग करणे . निजलेला मेल्यासारखा - मृतवत निजलेला व मेलेला सारखाच . निजल्या जागी विकणे - कारवाईने आपले काम साधणे ; बोटावर नाचविणे . निजून उठणे , उठत असणे - ( पहांटेस , लवकर )- प्रातःकाळी झोंपेतून उठणे किंवा उठण्याची संवय असणे . सावकाश निजणे - शांतपणाने झोंप घेणे ; बेफिकीरपणे झोंपणे . निजविणे - सक्रि . झोंपविणे ; दुसर्‍याला झोंपू देणे आडवे पसरविणे ; निजावयास लावणे . निजसुरा - वि . अर्धवट झोंपलेला अर्धवट जागा ; असावध . जेणे देहात्मवादी निजसुरा । - यथादी १ . ३८२ . निजानीज - स्त्री . सामान्यपणे निजणे ; सर्वत्रांचे निजणे ; शांतता ; सामसूम . निजायाबसायाजोगी - वि . ( बायकी ) घरकाम करण्यास योग्य झालेली , वयांत आलेली ( स्त्री . ) निजाळू - वि . झोपाळूं ; फार , नेहमी झोंप घेणारा . निजेला - वि . निजलेला ; झोंपलेला ( माणूस ). निजल्यामधे पुछ्य ते लोळताहे । - राक १ . ३३ . त्यांतील एक कलहंस तटी निजेला । - र ९ .
०कार्य  न. १ आपले स्वतःचे काम . २ ब्रह्मज्ञान , आत्मज्ञान मिळविणे .
०खूण  स्त्री. विशिष्ट खूण , चिन्ह , लक्षण .
०गूज  न. स्वतःचे , खाजगी - गुप्त काम , गोष्ट .
०जन   स्वकीयजन अथवा भक्त . आप्त ; सोयरेधायरे . - ज्ञा १८ . १ .
०जनजित वि.  भक्ताधीन . ( ईश्वर )
०जनाखिलमंगल वि.  भक्तांचे संपूर्ण कल्याण करणारा ; भक्तांचे मंगळ करणारा . जय जय देव निर्मळ । निजजनाखिल मंगल । जन्मजरा जलद जाल प्रभंजन । - ज्ञा १८ . १ .
०ठेवा  पु. १ स्वतःची पुंजी , मुख्यत्वे स्वतःच्या पाप पुण्यास लावतात . २ ब्रह्मज्ञान . ऐसे म्हणाल तरी निजठेवा । सद्गुरुवीण नाही । - दा ५ . १ . १९ .
०ढाळ  पु. स्वाभाविक गति .
०तेज  न. स्वकीय तेज ; स्वस्वरुप .
०त्व  न. निजरुप .
०धाम  न. ( काव्य . ) स्वतःचे घर , निवासस्थान ; आत्मस्वरुप ; निजतेज . कृष्णदास जयराम । जे शांतक्षमेचे निजधाम ।
०धामास   - मरणे ; दिवंगत होणे .
जाणे   - मरणे ; दिवंगत होणे .
०निवाडा  पु. आत्मस्वरुपाचा निश्चय . निजस्वरुप भाव . - एभा २ . ३१६ .
०बोध  पु. आत्मज्ञान . जेथे भेटे निर्गुण निजबोध विष्णु स्वरुप .
०मूर्ति   रुप वि . स्वस्वरुप ; स्वतःसिद्ध .
०रुप  न. १ स्वतःचे खरे स्वरुप . निजरुप इला मी दाऊं कां । - सौभद्र अंक ५ . २ स्वस्वरुप ; चिन्मयकला ; शिवात्मा .
०लोट  पु. ( काव्य . ) प्रत्यक्ष लाट , जलकल्लोळ . जो विवेक रत्नाचा किरिट । जो सद्गुण गंगेचा निजलोट ।
०वर्म  न. स्वतःचे ( गूढ ) दोष ; रहस्य ; गुप्त गोष्ट .
०वस्तु   नस्त्री . ब्रह्म .
०वृत्ति  स्त्री. स्वधर्म . तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका प्रजाहो हे फुडे । विरंचि म्हणे । - ज्ञा ३ . १११ .
०साधन  न. १ आत्म्याचे ज्ञान मिळविणे . २ स्वतःचे हित पाहणे , स्वहिताकडे नजर देणे . ( क्रि० पाहणे ).
०सार  पु. मुख्य उद्देश ; तात्पर्य . एर्‍हवी या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडे कीर अपुरा । - ज्ञा ६ . १४० .
०सुकृत  पु. आपली स्वतःची कृत्ये ( पूर्व जन्मांतील किंवा ह्या जन्मांतील ).
०सुख  न. १ ब्रह्मसुख . २ स्वतःचे सुख .
०स्वरुप  न. निजरुप पहा .
०ज्ञानी  पु. आत्मज्ञानी . निजांगे क्रिवि . ( काव्य ) स्वतः ; जातीने . निजांगे वधोनि दशकंधर । - स्तोत्रमाला महिपति - पांडुरंगस्तोत्र . निजाचो वि . ( गो . ) स्वतःचा ; मूळचा ; नैसर्गिक . निजाची श्रीमंत वि . गर्भश्रीमंत . निजानंद , निजानंदभरित वि . स्वतःमध्ये आनंद पावणारा ( ब्रह्म ).

निज     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नि-ज  m. mf()n. (√ जन्) innate, native, of one's own party or country (with रिपुm. an enemy in one's own country, [Hit.] ; m.pl. one's own people, [Rājat.] )
ROOTS:
नि
स्व   constant, continual, [AV.] ; [Br.] ; [Mn.] ; [MBh.] &c. (in later Sanskṛt used as a reflex.possess.pron. = , my own, his own, our own &c.)

निज     

निज [nija] a.  a. [नितरां जायते निजन्-ड]
Innate, indigenous, native, inborn, congenial.
Own, one's own, relating to one-self, of one's own party or country; निजं वपुः पुन- रनयन्निजां रुचिम् [Śi.17.4;] [R.3.15;18.27;] [Ms.2.5.]
Peculiar.
Continual, perpetual. -m. (pl.) One's own people. -Comp.
-बोधः   Self-knowledge, spiritual knowledge; भिक्षुर्न चाहं निजबोधरूपः Hastāmalaka Stotra.

निज     

Shabda-Sagara | Sanskrit  English
निज  mfn.  (-जः-जा-जं)
1. Own.
2. Perpetual, eternal.
3. Peculiar.
E. नि implying continuance, and what is produced. नितरां जायते नि + जन-ड .
ROOTS:
नि नितरां जायते नि + जन-ड .

निज     

adjective  व्यक्तिसम्बन्धि।   Ex. एषः मम निजः विषयः।
MODIFIES NOUN:
वस्तुः कर्म
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
आत्मगत व्यक्तिगत
Wordnet:
asmব্যক্তিগত
benব্যক্তিগত
gujઅંગત
hinव्यक्तिगत
kanವೈಯಕ್ತಿಕ
kasذٲتی
kokवैयक्तीक
malവ്യക്തിപരമായ
mniꯂꯟꯅꯥꯏꯒꯤ꯭ꯑꯣꯏꯕ
nepवैयक्तिक
oriବ୍ୟକ୍ତିଗତ
panਨਿੱਜੀ
telవ్యక్తిగతమైన
urdذاتی , شخصی , اپنا

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP