वि. तिसरा - री - रे . [ सं . ]
०नेत्र पु. तिसरा डोळा ; कपाळाच्या मध्यभागी असणारा शंकराचा तिसरा डोळा .
०उघडणे ( ल . ) अतिशय संतापणे .
०पंथ पु. ( मुरारेस्तृतीय : पंथ := मुरारीचा तिसराच मार्ग ; दोहोंपैकी त्याचे मत कोणाशीच जुळत नाही . मुरारीभट्ट हा जैमिनीच्या पूर्वमीमांसेवरील एक भाष्यकार असून त्याचे मत शबरस्वामी व प्रभाकर यांहून भिन्न होते यावरुन ) तिसरा मार्ग , मत , समजूत , कल्पना , अनुमान इ० .
म्ह ० त्याने तृतीयपंथ केला = ह्याचे तिसरेच एक .
०पंथी वि. दुसर्याचे विचार खरे न मानतां आपले खरे समजणारा .
०प्रकृति लिंगी पु . षंढ ; नपुंसक .
०सवन न. ( सोमायागामध्ये शेवटच्या दिवशी सोमवल्ली कुटून तिचा रस काढतात . तो रस तीन वेळा काढतात व त्या प्रत्येक वेळेस अनुक्रमे प्रातःसवन , माध्यंदिनसवन व तृतीयसवन असे म्हणतात . या तृतीयसवनांत मंत्र म्हणणारांचा सूर चढा असतो यावरुन ) १ अतिशय उच्च स्वर , आवाज . २ तिप्पट .
०सवनाने म्हणणे अतिशय मोठ्याने ओरडून अथवा कर्कश आवाजाने बोलणे .
तृतीया स्त्री . - शुक्ल अथवा कृष्ण . पक्षाची तिसरी तिथि .
- ( व्याकरण ) एक विभक्ती ( तिसरी ) [ सं . ]
तृतीयातत्पुरुष पु . ( व्याकरण ) एक समास . दोन
शब्दांमधील जेथे तृतीयेचे लोप होतो असा समास . जसे :- कृपावलोकन = कृपेने
अथवा कृपेकरुन जे अवलोकन ते .
तृतीयाप्रकृति - स्त्री . तिसरी प्रकृति अथवा स्वभाव ; तमोगुण . - वि . १ तिसर्या प्रकृतिसंबंधी . २ ( उप . ) नपुंसक ; षंढ .
तृतीयाप्रकृति स्त्री . तिसरी प्रकृति अथवा स्वभाव ; तमोगुण .
- वि .
- तिसर्या प्रकृतिसंबंधी .
- ( उप . ) नपुंसक ; षंढ .