Dictionaries | References

जरब

   
Script: Devanagari

जरब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Terribleness, dreadfulness, awfulness: also imperativeness, authoritativeness, commanding influence. 2 Intimidating, overawing. v दे, दाखव. Ex. त्याला ज0 देतांच तो गर्रकन लवला. 3 Terror, dread, awe. v खा, धर, घे, पाव. Ex. पंतोजीची हाक ऐकतांच पोरांला ज0 बसली; हा दांडगा कोण्हाची ज0 खाणार नाहीं. ज0 खाणें To take fright. ज0 पिणें To lose or get over the awe of.
Extraordinarily large or heavy--a measure or weight: exorbitant--a price or rate: sore, grievous, oppressive, difficult--a service, a business: enormous, excessive, overpowering--a load. These words, like जबर q. v., are applied in general to objects of disproportionate ponderousness or bulk, or are assumed to express some laboring conception of excess and extravagance.

जरब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Terribleness, dreadfulness: also imperativeness, commanding influence. Intimidating, overawing. Terror, dread, awe.
  खा, धर घे, बस.
  Extraordinarily large or heavy -a measure or weight: exorbitant -a price: sore, oppressive, difficult, -a service, a business: enormous, excessive, overpowering-a load.

जरब     

ना.  द्पटशा , दरादा , दहशत , धाक , धास्ती , भीती , वचक .

जरब     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : धाक, भीती

जरब     

 स्त्री. १ धाक ; भयोत्पादक तेज ; वजन ; छाप . त्या राजाची अशी जरब होती कीं , नांव ऐकतांच शत्रू थरथरा कांपत असत . २ दरारा ; दटावणी . ( क्रि० देणें ; दाखविणें ). त्याला जरब देतांच तो करकन लवला . ३ भीति ; धास्ती ; वचक . ( क्रि० खाणें ; धरणें ; पावणें ; घेणें ). चाबूकस्वारावांचून घोडा जरब खाणार नाहीं पंतोजीची हाक ऐकतांच पोरांला जरब बसली . ४ तोफ . मोठमोठया पल्ल्याच्या जरबा । - ऐपो २१६ . शिंदेही बाणांचे रोख पाहून जरबा सुरू करितात . - ख ११ . ५६६१ . ५ शिक्षा ; मार . ज्यांनीं मग्रूरी केली त्यांचे प्रांतांस व त्यांस जरब दिली . - मराचिथोशा ४७ . ६ नाणें पाडणें ; छाप ; शिक्का . अलीगोहराचा शिक्का दिल्लींत पडला ... पातशहाची जरब मोडून याचें नांवें करणें . - रा १ . ३६३ . [ अर . झर्ब ] ( वाप्र . )
०खाणें   भीति बाळगणें . हा दांडगा कोणाची जरब खाणार नाहीं .
०पिणें   भीति घेणें . जरबणें - भिणें ; भय पावणें ; धास्ती घेणें ; धाकांत असणें . सामाशब्द - जरब , जरबदार - वि . १ अतिशय मोठें , प्रचंड ( ओझें , माप ). त्या मापापेक्षां हें माप जरब आहे . २ फार जड , भारी ; जबर . ( किंमत , दर ). या लुगडयास आठ रुपये किंमत जरब . ३ त्रासदायक ; जुलमी ; कठिण ( नोकरी , धंदा ). ४ थकवा आणणारें ; फार जड ; भारी ; राक्षसी ( ओझें ). ( अतिशयपणा , विस्तृतपणा , भारीपणा किंवा त्रासदायकपणा दाखविण्यासाठीं या शब्दाचा उपयोग करितात ).
०वान वि.  १ दरार्‍याचा . २ कर्तृत्ववान . जरबवान पुरुष आहे , त्याचे तोंडांत दौलत आहे . - हौके १०९ . जरबी - वि . १ अरेरावी ; वचक , धास्ती बसविणारा . २ भयंकर ; जुलमी ; त्रासदायक ; भयोत्पादक . ३ तीक्ष्ण ; प्रखर ( शस्त्र , पशु ). [ जरब ]

जरब     

जरब खाणें
भीति वाटणें, बाळगणें
धास्‍ती घेणें
भय बाळगणें
धाक वाटणें
दरारा वाटणें. ‘हा दांडगा कोणाची जरब खाणार नाही.’ ‘चाबुकस्‍वारावांचून घोडा जरब खाणार नाही.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP