Dictionaries | References

लोळत पडणे

   
Script: Devanagari
See also:  लोळणे

लोळत पडणे     

अ.क्रि.  
जमीन इ० वर वरचे आंग खाली व खालचे वर होईल अशा तर्‍हेने गडबडणे .
आंथरुणावर निजलेल्या मनुष्याने निजलेल्या ठिकाणापासून अव्यवस्थितपणे कुशीवर वळून वळून दूर जाणे .
नेसलेल्या वस्त्राचे सोगे जमिनीवर फरफटणे .
उपयोगी पडण्याच्या स्थितीत असून ( पदार्थ किंवा माणूस ) कांही उपयोग न केला जात असल्याकारणाने किंवा उद्योगधंदा न मिळाल्या कारणाने रिकामा राहणे ; अव्यवस्थितपणे इतस्ततः पडणे . अनेक पदवीधर केवळ ब्राह्मण म्हणून लोळत आहेत . हा पहा तुझा चाकू येथे लोळत पडला आहे . [ सं . लोठन ; प्रा . लोलण ]
०घोलणे   सक्रि . ( मुकद्दमा , कज्जा , गोष्ट , बेत इ० चा ) सर्व बाजूंनी किंवा साधकबाधक प्रमाणे विचारांत घेऊन खल किंवा वाटाघाट करणे ; जोराने आपले विचार मांडणे . लोळविणे , लोळवणे , लोळाविणे सक्रि .
एखाद्यास लोळावयास लावणे .
( ल . ) पाडणे ; मारणे ; चीत करणे ; पराभव करणे .
लंबे करणे ; अंगावर चाल करुन आलेल्याला आपल्या आंगच्या सामर्थ्याने ढकलून देऊन किंवा चोप देऊन जमिनीवर आपटणे ; लोळावयास लावणे . चोरांनी रात्री दोन असामीस लोळविले .
लडबडविणे ; माखणे ; बुडविणे . ते देवे भक्तिरसे जाणो स्वचरणरजांत लोळविले । - मोद्रोण १० . ४० . [ लोळणे चे प्रयोजक ] लोळविणारा गीध - पु . एक पक्षी . इं . लॅमर गेयर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP