योग

See also YOGA I , YOGA II
ना.  ध्यान , समाधी ;
ना.  प्रसंग , संधी ;
ना.  जुळणी , मिलाफ , संबंध .
. 7 Propriety, fitness, suitableness, congruity. 8 In arithmetic. Sum or amount.
 पु. 
जुळणी ; जोड ; मिलाफ ; संग ; संयोग ; संलग्नता ; लग्न . योग पुढें भृगुसवें तिचा घडतां - मोआदि ३ . ६ .
परस्पर संबंध ; ऋणानुबंध ; संगत . तिला नहाण यावें आणि तिचा दादला मरावा असा योग होता ( समासांत ) कालयोग ; दैवयोग ; प्रारब्धयोग इ०
आध्यात्मिक अथवा भाविक भक्ति अगर ध्यान , चिंतन करुन होणारें ब्रह्मैक्य ; ध्यानपूजा , मानसपूजा , समाधि व त्यासंबंधीं नियम व आसनें ; प्राणायामादिक साधनांनीं चित्तवृत्तीचा किंवा इंद्रियांचा निरोध करणें .
मार्ग ; साधन ; आत्मसाधन या अर्थी भक्तियोग , कर्मयोग , ज्ञानयोग इ० संक्षेपानें नुसता योग अगर कर्मनिष्ठा असें म्हणतात .
खगोलाचे २७ भाग ; ज्यावरुन चंद्र सूर्याचे अक्षांश रेखांश मोजतात ते ; ते योग असे - विष्कंभ ; प्रीति , आयुष्मान , सौभाग्य , शोभन , अतिगंड , सुकर्मा , धृति , शूल , गंड , वृद्धि , ध्रुव , व्याघात , हर्षण , वज्र , सिद्धि , व्यतीपात , वरीयान , परीघ . शिव , सिद्धि , साध्य , शुभ , शुक्ल , ब्रह्मा , ऐंद्र व वैधृति असे २७ योग आहेत . ज्योतिषी २८ योग मानतात .
संबंध ; जवळ येणें . ग्रहांचे कालांश ( वस्तुतः भोग ) सूर्याच्या इतके झाले म्हणजे त्याचा सूर्याशीं योग झाला किंवा युति झाली असें म्हणतात . - सूर्य २३ .
उपाययोजना ; वस्तूचा उपयोग , विनियोग ; कार्यार्थ साधना , प्रयत्न .
इष्टता ; योग्यता ; समत्व .
( गणित ) रक्कम ; रास ; बेरीज .
साधन ; युक्ति . एकच योग ( साधन अगर युक्ति ) आहे . - गीर ५६ .
मिठी .
कवळा .
कार्यकुशलता .
संधि . योग बरवा हा पुन्हां घडेना । - दावि २४२ .
( वैद्यक ) इलाज ; उपाय ; औषध . आमवायूवर एरंडेलाचा योग प्रशस्त आहे .
मोठा लाभ . मग योग योग ऐसा सहसा उठला वळी महा शब्द । - मोकर्ण ७ . ३५ .
जारणमरण ; जादूटोणा .
ईश्वरी संकल्प .
समाधिशास्त्र .
तत्वज्ञान .
व्युत्पत्ति ; व्युत्पत्तिमूलक अर्थ .
सूत्र ; नियम ; कायदा .
( ज्यो . ) विशिष्ट तिथि , वार , नक्षत्र यांचें सहचर्य येणें . उदा० रविवारीं हस्त आलें असतां त्यास अमृतसिद्धि योग म्हणतात . [ सं . युज = जोडणें ] सामाशब्द -
०चुत  पु. योगभ्रष्ट . - ज्ञा ६ . ४४८ .
०धर्म  पु. कर्तव्य ; सदगुण . अथवा योग्याचें विशेष कर्म ; त्यांपैकीं दहा विशेष आहेत - अहिंसा , सत्य , अस्तेय , ब्रह्मचर्या , अपरिग्रह ( हें पांच यम व ) शौच , संतोष , तप , स्वाध्याय , ईश्वरप्रणिधान ( हें पांच नियम होत ). दुसरी गणना अशी आहे - अहिंसा , सत्य , अक्रोध , त्याग , शांति , अपैशुन , दया , अलोभ , मार्दव , लज्जा . कांहीं दम , क्षम , अचापल्य , तेज , तितिक्षा , हे यांतच गणतात .
०निद्रा  स्त्री. विश्वप्रलयानंतरची व विश्वोत्त्पत्तीपूर्वीची ब्रह्मदेवाची झोंप ; ईश्वराची निद्रावस्था ; योगमाया ; सहजस्वरुपस्थिति . - ज्ञा ५ . ७८ .
०निष्ठा  स्त्री. योगपरायणता . - ज्ञा २ . ३१५ .
०पट  पु. 
श्रेष्ठ भोग .
संन्याशदीक्षेचा एक प्रकार . संन्याशानें धारण करावयाचीं विशिष्ट वस्त्रें .
( ल . ) संन्यास घेतल्यावर त्यासंबंधीं पाळावयाचे नियम वगैरे . ते योगपटाची मवणी । जीवीं अनियम चिंतवणी । - ज्ञा १६ ३३२ .
०भूमिका  स्त्री. योग्याचीं विशिष्ट अवस्था , स्थिति . द्रष्टादृश्यांचिया ग्रासीं । मध्यें उल्लेख विकासी । योगभूमिका ऐसी । अंगीं वाजे । - अमृ ७ . १८५ .
०भ्रष्ट वि.  योगसाधनांत कांहीं प्रत्यवाय घडल्यामुळें पुनर्जन्म पावलेला .
०माया  स्त्री. ईश्वराची जी मायारुप शक्ति ती ; भ्रम ; माया ; माया व ब्रह्म पहा .
०मुद्रा  स्त्री. खेचरी , भूचरी , चाचरी , अगोचरी , आलेख इ० . पांच योगमुद्रा ; यांचीं स्थानें अनुक्रमें नादबिंदु , नासिका , नेत्र , कर्ण , व आकाश हीं होत . खेचरी भूचरी चाचरी । अगोचरी आलेख यापरी । माजी समरसली खेचरी । नादबिंदूसी । - कथा ७ . ४ . ७३ .
०राज   , - पु . एक प्रकारचें रसायन ; मात्रा .
गुग्गुल   , - पु . एक प्रकारचें रसायन ; मात्रा .
०रुढ वि.  व्युत्पत्तीनें ज्यांचा प्राप्त अर्थ व रुढ अर्थ हे जुळतात असा ( शब्द ). जसे - अंगरखा ; जलधर ; पंकज ; भूधर . कांहीं शब्द यौगिक , कांहीं रुढ आणि कांहीं योगरुढ असतात .
०शास्त्र  न. चिंत्ताची एकाग्रता करण्याच्या साधनासंबंधीचें शास्त्र ; ज्यामध्यें प्राणायामादिद्वारां अंतःकरणाच्या एकाग्रतेचा उपाय सांगितला आहे असें सहा शास्त्रांतील एक शास्त्र .
०सार  पु. विचार .
०क्षेम   पुन . निर्वाह ; चरितार्थ ; उदरपोषण . यांचे योगक्षेमाबद्दल मौजे वडू तर्फ पाबल पैकीं इनाम . - शाछ १ . ३६ . योगक्षेम चालविणें एखाद्या मनुष्यास पाहिजे असेल तें मिळवून देणें ; संसाराची एकंदर व्यवस्था पाहणें ; उदरनिर्वाहाची तजवीज करणें . जे मला अनन्यभावें शरण येतात त्यांचा योगक्षेम मी चालवितों . योगानंद पु . योगाभ्यासानें होणारा आनंद ; पांच आनंदांपैकीं शेवटचा . योगाभ्यास पु . हटयोगादिकांचा अभ्यास , शिक्षण ; योगशास्त्राचा अभ्यास ; चित्तवृत्तींचा निरोध करुन ध्यानादिकांचा केलेला अभ्यास . योगायोग पु .
दैवगति ; अनपेक्षित अशी घडलेली कांहीं गोष्ट ; बनाव .
अनुकूल काळ आणि प्रतिकूळ काळ . योगायोग पाहून वागावें . योगारुढ - वि . योगी ; योगनिष्णात . तोच पुरुष योगारुढ म्हणजे पूर्ण योगी झाला . - गीता ६९४ . योगासन - न . योगाभ्यास करणार्‍या योग्याची विशेष प्रकारच्या पद्धतीनें वसण्याची रीत . योगिनी - स्त्री .
दुर्गादेवीची परिचारिका . या ६४ आहेत .
योगाभ्यासी स्त्री ; जोगीण . [ सं . ] योगी - पु .
योगसाधन करणारा ; योगमार्गास लागलेला मनुष्य . - ज्ञा ६ . ३९ .
योगसाधनांचा उपयोग जादुगिरीच्या रुपानें करुन लोकांस चमत्कार दाखविणारा मनुष्य . भारतीय वाड्मयांत योगी याचा अर्थ बडा जादूगार असा होतो . - ज्ञाको ( य ) ६५ .
( सामा . ) संन्याशी अथवा भक्त . योगेश्वर - पु .
श्रेष्ठ योगी ; सर्वांत श्रेष्ठ प्राणी ; नांवाजलेला योगी ; भक्त ; संन्यासी ; साधु .
कृष्ण .
n.  एक ऋषि, जो धर्म एवं किया के पुत्रों में से एक था [भा. ४.१.५१] । यह तपस्वी, जितेंद्रिय एवं त्रैलोक्य में सुविख्यात था [म. अनु.१५०.४५]
 m  Union. Concatenation. A means. Propriety. A term in Astronomy.
  |  
 • हठयोगप्रदीपिका
  हठयोग प्रदीपिका हठयोग से सम्बन्धित संस्कृत ग्रन्थ है। इसकी रचना गुरू गोरखनाथ के शिष्य स्वामी स्वात्माराम ने की थी।
 • हठयोगप्रदीपिका - भाग १
  हठयोग प्रदीपिका हठयोग से सम्बन्धित संस्कृत ग्रन्थ है। इसकी रचना गुरू गोरखनाथ के शिष्य स्वामी स्वात्माराम ने की थी।
 • हठयोगप्रदीपिका - भाग २
  हठयोग प्रदीपिका हठयोग से सम्बन्धित संस्कृत ग्रन्थ है। इसकी रचना गुरू गोरखनाथ के शिष्य स्वामी स्वात्माराम ने की थी।
 • हठयोगप्रदीपिका - भाग ३
  हठयोग प्रदीपिका हठयोग से सम्बन्धित संस्कृत ग्रन्थ है। इसकी रचना गुरू गोरखनाथ के शिष्य स्वामी स्वात्माराम ने की थी।
 • भोजवृत्तिः
  प्रस्तुत ग्रंथात हठ योगासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.
 • भोजवृत्तिः - समाधिपादः
  प्रस्तुत ग्रंथात हठ योगासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.
 • भोजवृत्तिः - साधनापादः
  प्रस्तुत ग्रंथात हठ योगासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.
 • भोजवृत्तिः - विभूतिपादः
  प्रस्तुत ग्रंथात हठ योगासंबंधी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.
 • घेरण्ड संहिता
  मुद्रा आणि योगासनांच्या संबंधी विस्तृत माहिती देणार ग्रंथ म्हणजे 'घेरण्ड संहिता'. हठयोगावर आधारित या ग्रंथाची रचना  महर्षि घेरण्ड यांनी केली आहे..
 • घेरण्ड संहिता - प्रथमोपदेश
  मुद्रा आणि योगासनांच्या संबंधी विस्तृत माहिती देणार ग्रंथ म्हणजे 'घेरण्ड संहिता'. हठयोगावर आधारित या ग्रंथाची रचना  महर्षि घेरण्ड यांनी केली आहे..
 • घेरण्ड संहिता - द्वितीयोपदेशः
  मुद्रा आणि योगासनांच्या संबंधी विस्तृत माहिती देणार ग्रंथ म्हणजे 'घेरण्ड संहिता'. हठयोगावर आधारित या ग्रंथाची रचना  महर्षि घेरण्ड यांनी केली आहे..
 • घेरण्ड संहिता - तृतीयोपदेशः
  मुद्रा आणि योगासनांच्या संबंधी विस्तृत माहिती देणार ग्रंथ म्हणजे 'घेरण्ड संहिता'. हठयोगावर आधारित या ग्रंथाची रचना  महर्षि घेरण्ड यांनी केली आहे..
 • घेरण्ड संहिता - चतुर्थोपदेशः
  मुद्रा आणि योगासनांच्या संबंधी विस्तृत माहिती देणार ग्रंथ म्हणजे 'घेरण्ड संहिता'. हठयोगावर आधारित या ग्रंथाची रचना  महर्षि घेरण्ड यांनी केली आहे..
 • घेरण्ड संहिता - पञ्चमोपदेशः
  मुद्रा आणि योगासनांच्या संबंधी विस्तृत माहिती देणार ग्रंथ म्हणजे 'घेरण्ड संहिता'. हठयोगावर आधारित या ग्रंथाची रचना  महर्षि घेरण्ड यांनी केली आहे..
 • घेरण्ड संहिता - षष्ठोपदेशः
  मुद्रा आणि योगासनांच्या संबंधी विस्तृत माहिती देणार ग्रंथ म्हणजे 'घेरण्ड संहिता'. हठयोगावर आधारित या ग्रंथाची रचना  महर्षि घेरण्ड यांनी केली आहे..
 • घेरण्ड संहिता - सप्तमोपदेशः
  मुद्रा आणि योगासनांच्या संबंधी विस्तृत माहिती देणार ग्रंथ म्हणजे 'घेरण्ड संहिता'. हठयोगावर आधारित या ग्रंथाची रचना  महर्षि घेरण्ड यांनी केली आहे..
 • श्रीगुरूदत्त योगः
  श्रीगुरूदत्तांनी जगाला योगशास्त्र दिले.
 • श्रीगुरूदत्त योगः - सूर्यभेदन
  श्रीगुरूदत्तांनी जगाला योगशास्त्र दिले.
 • श्रीगुरूदत्त योगः - सूर्यभेदकुम्भक:
  श्रीगुरूदत्तांनी जगाला योगशास्त्र दिले.
 • श्रीगुरूदत्त योगः - उज्जायीकुम्भक:
  श्रीगुरूदत्तांनी जगाला योगशास्त्र दिले.
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person