|
पु. १ हिसका ; हिसडा ; आंचका . २ ( एका पदार्थाने दुसर्यावर केलेला ) आघात ; तडाखा ; प्रहार . ३ भयंकर दुःख इ० कानी हृदयाला भरणारी धडकी ; ऊर धडाडणे . मातेला धक्का बसला । लागे ती नित्य झुराया । - विक १८ . ४ संकट ; धोका ; भय . आधी गाजवावे तडाखे । तरि मग भूमंडळ धाके । ऐसे न होतां धक्के । राज्यास होती । - राजे संभाजीचरित्र ९ . ५ रस्त्याच्या कडेलोटाच्या बाजूने बांधलेली कठड्याची भिंत , वरवंडी . धक्क्याच्या भिंती सुक्या दगडाच्या बांधतात . - मॅरट ४४ . इतर अर्थी धका पहा . [ धका . ध्व . ] पु. १ एकदम , आकस्मित लागणारा हिसका ; ढका ; गचका ; हिसडा ; आंचका . ( क्रि० लागणे ; लावणे ). २ ( एका पदार्थाचा दुसर्यावर झालेला , केलेला ) प्रहार ; आघात ; तडाखा . ३ ( ल . ) ( एखादा व्यवहार , पदार्थ इ० कांत झालेली , आलेली ) अनिष्टापत्ति ; नुकसानी ; खराबी ; हानि . यंदा पाऊस चांगला न पडल्यामुळे पिकास धक्का बसला . ४ ( पाणी , वारा इ० कांचा नेट सांभाळण्यासाठी गलबत इ० किनार्यास लागण्याच्या सोयीसाठी ) नदी , समुद्र इ० कांच्या किनार्यावर बांधलेली भिंत , चौथरा , कट्टा . ५ प्रवाशांना विसाव्यासाठी , ओझी इ० खाली उतरुन ठेवण्याच्या सोयीची ( डोंगर इ० कांतील ) रस्त्याच्या , कडेलोटाच्या कडेला बांधलेली कठड्याची भिंत , वरवंडी . ८ ( एखादा पदार्थ ) विद्युतजागृत करण्याचे , वीज भरण्याचे यंत्र ( यास स्पर्श केला असतां धक्का बसतो म्हणून हे नांव ). ९ धोका ; भय ; संकट . [ सं . धाक = आधार , धीर , खांब ; सिं . धकु , धिको ; हिं . धक्का ; गु . धक्को ; का . ] ०बुक्की स्त्री. धकाबुकी पहा . [ धक्का + बुक्का ] ०धक स्त्री. १ इजा , मोडतोड , फूटतूट होण्याची भीति . २ जिकीरीचे , दगदगीचे , ओढाताणीचे काम ; खटाटोप ; खवदव ; उपद्व्याप . [ धका द्वि . ] ०धका स्त्री. ( परस्परांत होणारी ) धक्काबुकी ; रेटारेटी ; झोंबाझोंबी ; झोंटधरणी . हे धकाधकीची कामे तिक्षण बुद्धीची वर्मे । - दा १९ . ७ . १९ . राजकारणाच्या धकाधकीत नेमस्तपक्षांतल्या पुढार्यांचा कासोटा त्यांनी सोडला तरी हरकत नाही . - सुदे ५९ . [ धका द्वि . ] ०धकीचा - पु . दगदगीचा , भानगडीचा , झोंबाझोंबीचा , खटाटोपाचा व्यवहार , काम . धकाधकीचा मामला । कैसा घडे अशक्ताला । - दा १९ . १० . २२ . मामला - पु . दगदगीचा , भानगडीचा , झोंबाझोंबीचा , खटाटोपाचा व्यवहार , काम . धकाधकीचा मामला । कैसा घडे अशक्ताला । - दा १९ . १० . २२ . ०बुका बुकी , धकीबुकी स्त्री . ( कों . ) धक्के आणि बुक्क्या यांचा मार . ( क्रि० देणे ; करणे ; मारणे ). [ धका + बुका ] धकेचपेटे पुअव . १ टोले आणि ठोसे ; धक्काबुक्की ; मारहाण . व्याप आटोप करिती । धके चपेटे सोसिती । - दा १५ . ३ . ७ . २ नुकसान ; तोटा ; घस . ३ बोलाचाली ; अपमान ; निंदा . धकेचपेटे सोसावे । - दा १५ . ६ . २२ . [ धका + चपेटा ]
|