|
पु. १ एक मुलींचा खेळु . - मखे २३० . २ एक गवतांत आढळणारा क्रिडा . यास मुलें घोडा म्हणतात . पु. १ खूर असलेला एक चतुष्पाद प्राणिविशेष . ह्याचा उपयोग ओझें वाहण्याच्या , गाडी ओढण्याच्या व बसण्याच्या कामीं करतात . ह्याच्या जाती अनेक आहेत . अरबी घोडे जगप्रसिध्द आहेत . लहान घोडयास तट्टू व घोडयाच्या पोरास शिंगरूं म्हणतात . घोडयाच्या आकृतीवरून , गतीवरून , उपयोगावरून व लक्षणेनें हा शब्द अनेक वस्तूंस लावतात . २ बुध्दिबळाच्या खेळांतील एक मोहरा . हा सर्व बाजूंनीं दोन सरळ व एक आडवें ( अडीच ) घर जातो . या मोहर्याचा विशेष हा आहे कीं हा इतर मोहर्यांच्या डोक्यावरून उडून जातो , तशी गति इतर मोहर्यांना नसते . ३ बंदुकींतील हातोडीच्या आकाराचा अवयवविशेष . हा दाबला असतां ठिणगी उत्पन्न होते व बंदूकीचा बार उडतो ; चाप . ४ ( मुलांचे खेळ ) दोन पायांत काठी घालून ( तिला घोडा मानून ) मुलें धांवतात तो काठीचा घोडा . ५ ( उप . ) मूर्ख व ठोंब्या असा वयस्क मुलगा ; वयानें मोठा पण पोरकट मनुष्य . ६ वस्त्रें , कपडे ठेवण्यासाठीं खुंटया ठोकलेला खांब ; स्नान करणार्या माणसाचे कपडे ठेवण्यासाठीं खुंटया ठोकलेला खांब ; स्नान करणार्या माणसाचे कपडे ठेवण्याकरितां जमिनींत रोंवलेली काठी , खांब ; ( इं . ) स्टँड . ७ ( ल . ) शरीर वाहून नेतात म्हणून पायांस लक्षणेनें ( दहाबोटी ) घोडा असे संबोधितात ; तंगडया . आमचा दोन पायांचा घोडा आम्हाला हवें तेथें वाहून नेईल . ८ पाळणा टांगण्यासाठीं एका आडव्या लांकडाला चार पाय लावून करतात ती रचना ; घोडी . ९ पालखीचा दांडा ज्याला बसविलेला असतो तें दुबेळकें बेचक ; पालखीं तबेल्यांत वगैरे ठेवतांना ज्यावर ठेवतात तीं दुबेळकें असलेलीं लाकडें प्रत्येकीं . १० गाडयाच्या बैठकीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं लांब लांकडें प्रत्येकी ; गाडीच्या दांडयास आधार द्यावयाचें दुबेळकें . ११ मूल रांगावयास लागलें असतां दोन हात व दोन गुडघे जमीनीला टेकून करतें ती घोडयासारखी आकृति . ( क्रि० करणें ). १२ मृदंग ; पखवाज ठेवण्याची घडवंची ; घोडी ; ( दिवे इ० लावण्याची ) दोन बाजूस पायर्या असलेली घडवंची ; ( पिपें , पेटया ठेवण्याची ) लांकडी घडवंची . १३ नारळ सोलण्याचा , शेंडयास सुरी बसविलेला खांब ; नारळ सोलण्याचा एक प्रकारचा सांचा . १४ समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा चढ , फुगोटी , फुगारा ; लाटेचा उंच भाग ; नद्यांच्या मुखांतून वर गेलेलें समुद्राच्या भरतीचें पाणी . - सृष्टि ५७ . १५ ओबडधोबड असा आंकडा , फांसा , पकड . १६ ( ल . ) घोडेस्वार . तीन हजार घोडा पेशव्यांचे तैनातींत ठेवावा . - विवि ८ . ७ . १२९ . १७ दाराच्या दुहेरी चौकटीच्या वरच्या बाजूचे , परस्पराला जोडणारे दोन लाकडी तुकडे ( त्यांच्याच जोडीच्या खालच्या बाजूच्या तुकडयांस छिली म्हणतात ). १८ ( खाटीक इ० कांचें ) साकटणें , सकोटन ; खाटकाचा ठोकळा . १९ ( मुद्रण ) केसी व ग्याली ठेवण्यासाठीं केलेली घडवंचीवजा चौकट . २० फळा , चित्रफलक इ० उभा ठेवण्याची लाकडी उभी चौकट . २१ ( कों . ) रहाटगाडग्याचें कोळबें ज्यावर ठेवतात ती लांकडी चौकट . २२ ( पोहण्याचा ) चार भोपळयांचा तराफा . २३ ( गो . ) ( विटी दांडूचा खेळ ) विटी मारण्याचा एक प्रकार . ( क्रि० मारणें ). [ सं . घोटक ; प्रा . घोड ; गु . घोडो ; सिं . घोडो ; स्पॅनिश जि . गोरो ; अर . घोरा ] घोडी - स्त्री . १ घोडा या जातीच्या प्राण्याची मादी . २ सतार , तंबोरा इ० तंतुवाद्यांच्या भोपळयाच्या मध्यावर हस्तीदंती अगर लांकडाची पाटाच्या आकृतीची एक इंची किंवा दीड इंची पट्टीची बैठक ; तिच्यावरून तारा पुढें खुंटीस गुंडाळलेल्या असतात . ३ मुलांना शिक्षा देण्याकरितां जिला हातानें धरून शिक्षा दिलेला लोंबकळत असतो अशी आढयापासून लोंबणारी दोरी , फांसा ; मुलांस टांगण्यासाठीं उंच बांधलेली दोरी . अशी शिक्षा पूर्वी शाळांतून फार देत . ( क्रि० घेणें ; देणें ). एखाद्या मुलाशीं माझं वांकडं आलं कीं , रचलंच त्याच्यावर किटाळ आणी दिलीच त्याला पंतोजीकडून घोडी . - चंद्रग्र ८० . ४ उभें राहून पखवाज वाजविण्याकरितां पखवाज ठेवावयाची घडवंची . इतक्यांत देवळाच्या एका कोंपर्यांत मृदंग ठेवावयाची उंच घोडी सुनंदाला दिसली . - सुदे २५ . ५ गवत इ० वाहण्याकरितां खटार्यावर उभारलेला सांगाडा , चौकट . ६ फळा जमीनीपासून उंच ठेवण्याकरितां व त्याला उतार देण्याकरितां केलेली लांकडी चौकट , सांगाडा . ७ वयस्क असून पोरकटपणा करणारी , खिदडणारी मुलगी ; खिदडी ; धांगडधिंगी ; भोपळदेवता ; घोडकुदळ . ८ ( सुतारी तासावयाचें लांकूड हलूं नये म्हणून त्याला आधारभूत असें दुसरें लांकूड , चौकट इ० सोईनें बसवितात तें . ९ ( विणकामांत ) सूत उकलण्यासाठीं केलेलें लांकडी चौकटीसारखें साधन . १० ( सोनारी ) पायांत घालावयाच्या सांखळ्यांच्या कडया वांकविण्यासाठीं असलेला बोटाइतका जाड असा निमुळता मोळा . ११ ( हेट . नाविक ) पोरकें ( लहान ) शीड उभें करण्यासाठीं असलेलें कमानीसारखें लांकूड . १२ बंधार्याच्या मुखाशीं ( पाणी सोडण्याच्या ठिकाणीं ) पडद्यासारखी बांधलेली भिंत . हिच्यावरून पाणी जात असतें . १३ ( हेट . ) गलबताच्या कडेस शौच्यास बसण्याकरितां टांगलेली लांकडी चौकट १४ सांकटणें ; सकोटण . घोडा अर्थ १७ पहा . १५ तीन पायांचे दिवा ठेवण्याचें बुरडी तिकाटणें , तिवई . १६ पाटास जे दोन आडात मारितात ते प्रत्येकी . १७ हत्तीवरील चौकट ; हौदा . साहेब नौबतीकरितां हत्तींवर लांकडी घोडी घालून ... - ऐरा ९ . ५०६ . १८ उभें खुंडाळें . ( इं . ) स्टँड . तिकोनी खुंटयांची घोडी आणि रुमाल ठेवावे - स्वारीनियम ७० . १९ सामान ठेवण्याचा घोडा . घोडें - न . १ सामा ( लिंगभेद न धरतां ) घोडा या जातींतील जनावर . कृष्णाकांठचीं घोडीं सडपातळ पण चपळ असतात . २ खटार्याच्या साटीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं उभीं लाकडें ; घोडा अर्थ ९ पहा . घोडकें अर्थ १ पहा . ३ चार भोंपळे लावलेला पाण्यावर तरंगणारा तराफा . घोडा अर्थ २१ पहा . ४ ( व . ) गाडीचे दांडे - जूं ज्यावर ठेवतात तें दुबेळकें . घोडा अर्थ ९ पहा . [ सं . घोडा ] ( वाप्र . ) घोडा आडवा घालणें - ( एखाद्या कार्यात ) अडथळा , विध्न आणणें . आणि म्हणूनच तुम्ही घोडा आडवा घातलांत वाटतं ? - चंद्रग्र ६८ . ०उभा , उभा बांधणें - ( घोडा ) थोडा वेळ थांबवणें ; जरासें थांबणे ; घाई न करणें ९ घाईत व धांदलींत असणार्या मनुष्यास उद्देशून ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात . ) करणें , उभा बांधणें - ( घोडा ) थोडा वेळ थांबवणें ; जरासें थांबणे ; घाई न करणें ९ घाईत व धांदलींत असणार्या मनुष्यास उद्देशून ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात . ) ०काढणें १ ( बांधून ठेवलेला घोडा बाहेर नेणें ) घोडा हांकारणें , पिटाळणें . २ ( ल . ) ( एखाद्यानें ) पळ काढणें ; पोबारा करणें ; निसटणें . ०चालविणें ( कर . ) ( ल . ) डोकें खाजवणें ; युक्ति लढविणें . ०टाकणें घोडा फेंकणें ; उडवणें ; अंगावर घालणें . आरेरे टाकौनि घोडा । भणती यांचिआं जटैं उपडा । - शिशु १४१ . ०मैदान असणें - ( घोडा धांवण्यांत कसा काय आहे याची परीक्षा त्यास मैदानांत पळवून करतां येते यावरून ) ज्याची परीक्षा करावयाची तो पदार्थ , मनुष्य व परीक्षेस लागणारी सामग्री हीं दोन्ही जवळ असणें असा अर्थ होतो ; एखाद्या गोष्टीची निरर्थक चर्चा न करतां तिला कसोटीला लावणें , कसोटीची वेळ किंवा सामुग्री जवळ असणें ; हा सूर्य हा जयद्रथ . कोरडी बढाई कशाला पाहिजे ? घोडामैदान जवळच आहे . जवळ असणें - ( घोडा धांवण्यांत कसा काय आहे याची परीक्षा त्यास मैदानांत पळवून करतां येते यावरून ) ज्याची परीक्षा करावयाची तो पदार्थ , मनुष्य व परीक्षेस लागणारी सामग्री हीं दोन्ही जवळ असणें असा अर्थ होतो ; एखाद्या गोष्टीची निरर्थक चर्चा न करतां तिला कसोटीला लावणें , कसोटीची वेळ किंवा सामुग्री जवळ असणें ; हा सूर्य हा जयद्रथ . कोरडी बढाई कशाला पाहिजे ? घोडामैदान जवळच आहे . ०हांकणें पळून जाणें ; निघून जाणें . पोबारा करणें ; घोडा काढणें पहा . पंतोजीबुवास पाहून त्या पोरानें घोडा हांकला . घोडी काढणें , घोडी भरविणें - सक्रि . ( माण . ) घोडीस घोडा दाखविणें , देणें ; घोडी फळविणें . घोडी घेणें - ( एखाद्याशीं ) घांसणें ; कटकट करणें ; मत्सरबुध्दीनें दोष काढणे . घोडें उभें करणें - अडथळा आणणें . बाळासाहेब नातूसारख्यांनीं विशेष प्रसंगीं एखादें घोडें उभें केलें तरी त्याकडे दुर्लक्ष्य करून ज्यानें त्यानें आपला पंथ सुधारावा . - आगर ३ . १४४ . ( एखाद्याचें ) घोडें थकणें - एखाद्यानें ( प्रवास , धंदा , व्यापार , अभ्यास इ० कांत ) थकून जाणें ; हतबल होणें ; पुढें रेटण्याची शक्ति न उरणें . ( एखाद्यानें आपलें ) घोडें पुढें दामटणें , घोडें ढकलणें , घोडें हांकणें , घोडें घालणें - १ इतरांच्या पूर्वी आपला कार्यभाग साधून घेण्याचा घाईनें प्रयत्न करणें . या शर्यतींत जो तो आपलें घोडें पुढें दामटायला पहात आहे . - नि . ब्रिटिश वसाहतीनीं आपल्या हक्कांचें घोडें पुढें दामटलें . - सासं २ . ४४६ . २ लुब्रेपणानें दुसर्यांच्या संभाषणांत तोंड घालून त्यांच्यावर आपले विचार लादणें . ( एखाद्याचें ) घोडें मारणें - एखाद्याचें नुकसान करून त्याला राग आणणें ( पूर्वी प्रवासाचें मुख्य साधन घोडें असे . प्रवासाचें घोडें ठार केल्यास त्याचा प्रवास थांबत असे व त्यामुळें त्याचें फार नुकसान होई यावरून ) एखाद्याचें फार नुकसान करणें . मी काय तुझें घोडें मारलें आहे ? ( आपलें ) घोडें पुढें ढकलणें - आपलें काम प्रथम करूं लागणें ; आपल्या कामाला महत्व देणें . गांडी खालचें घोडें - संसारादि निर्वाहक मालमत्ता , वाडी इ० आधारभूत मुख्य साधन . म्ह० आपले गांडीखालचें घोडें गेलें , मग त्यावर महार बसो कीं चांभार बसो . घोडीं घालणें , घोडयांच्या अनीना उचलणें - घोडदळांतील सर्व स्वारांनीं ईर्षेनें शत्रूवर एकदम तुटून पडणें . - होकै ३ . घोडयाच्या , हत्तीच्या पायांनीं येणें व मुंगीच्या पायांनीं जाणें - ( आजार , संकट , अडचण इ० च्या संबंधांत हा वाक्प्रचार योजतात ) जलदीनें येणें व धिमेधिमे जाणें ; आजार इ० जलदीनें येतात पण अतिशय हळू हळू नाहींसे होतात यावरून वरील वाक्प्रचार रूढ आहे . ( एखाद्याच्या ) घोडयानें पेण खाणें , घोडयानें पेंड खाणें - या वाक्प्रचारांत पेण = प्रवासांतील टप्पा , मुक्कामाची जागा या ऐवजीं चुकीनें पेंड हा शब्द उपयोगांत आणतात . लांबच्या प्रवासांत निरनिरळया टप्प्यांच्या ठिकाणीं घोडीं उभीं रहात . त्यामुळें टप्प्याचें ठिकाण आलें कीं घोडें तेथें अडे , पुढें जात नसे . यावरून वरील वाक्प्रचार एखादें कार्य करतांना कोणी अडून बसल्यास त्यास . तुझें घोडें कुठें पेण खातें असें विचारतांना उपयोगांत आणतात . घोडयापुढें धावणें - जिकीरीचें , दगदगीचें ; कष्टाचें काम करणें . ( एखाद्याच्या ) घोडयापुढें धावणें - एखाद्याची कष्टाची सेवा , चाकरी करणें ; ( उप . ) एखाद्याची ओंगळ खुशामत करणें ; एखाद्याची थुंकी झेलणें . घोडयावर घोडा घालणें - ( लिलांव इ० कांत ) चढाओढ करणें ; एखाद्यानें केलेल्या किंमतीपेक्षां अधिक किंमत पुकारणें ; उडीवर उडी घालणें . घोडयावर बसणें - दारू पिऊन झिंगणें ; ताठयांत असणें . घोडयावर बसून येणें - घाईनें येणें ; आपलें काम तांतडीनें करण्यास दुसर्यास घाई करणें . सर घोडया पाणी खोल किंवा पाणी पी - ( घोडया मागे हट , पाणी खोल आहे . तेथूनच पाणी पी ) गोष्ट मोठी कठिण आहे , मागें परततां येणें शक्य आहे तोंच परतावें याअर्थी . म्ह० १ घोडा आपल्या गुणानें दाणा खातो = चांगला घोडा खूप काम करून आपल्याला खाद्यहि जास्त मिळवतो . त्याला जास्त देण्यास मालक असंतुष्ट नसतो . यावरून चांगला चाकर आपल्या गुणानें व मेहनतीनें मालकाकडून पगार वाढवून घेतो . २ घोडा स्वार ( मांड ) ओळखतो = बसणारा कच्चा कीं पक्का आहे हें घोडा ओळखूं शकतो . ( यावरून ), आपला मालक कडक कीं नरम आहे हें हाताखालचीं माणसे ओळखू शकतात . ३ ( व . ) जाय रे घोडया खाय रे हरळी = घोडयाला हरळी खावयास मोकाट सोडल्यास ( घोडयाला ) तें चांगलेच होईल , पथ्यावरच पडेल . म्ह० १ घोडी मरे भारें शिंगरूं मरे येरझारें = घोडी ओझें किंवा माणूस वाहून नेत असतां तिचें शिंगरूंहि तिच्याबरोबर शिंगरूंहि हेलपाटा खातें . यावरून प्रत्यक्ष काम करणारास श्रम होतातच पण त्याच्या सहवासांत असणारांना सुध्दां जवळ जवळ तितकेच श्रम होतात . २ वरातीमागून घोडें = लग्नाच्या वरातीच्या मिरवणुकींत सर्वांच्या पुढें श्रृंगारलेलें कोतवाली घोडें चालवण्याची चाल आहे . यावरून वरात निघून गेल्यावर मागाहून श्रृंगारलेलें घोडें नेणें व्यर्थ होय . २ माझें घोडें आणि जाऊं दे पुढें = इतरांचें कांहींहि होवो , माझें काम आधीं झालें पाहिजे . स्वार्थी माणसाची निंदा करतांना या म्हणीचा उपयोग करतात . समासांत घोडा शब्द पूर्वपदीं आल्यास त्याचीं घोड किंवा कधीं कधीं घोडे अथवा घोड व घोडे , अशीं दोन्ही रूपें होतात . उ० घोडचूक ; घोडेखोत ; घोड ( डे ) चिलट इ० सामाशब्द - घोडकट , घोडकें - न . ( घोडयाला तिरस्काराने लावावयाचा शब्द ) रोडकें , अशक्त व थिल्लर घोडें ; भटाचा तट्टू . घोडकुदळ - पु . १ ( उप . ) मुंजीचें वय झालेलें असून मुंज न झालेला मुलगा ; घोडमुंज्या . २ - स्त्री . ( उप . ) उपवर असून लग्न न झालेली दांडगट नाचरी मुलगी ; घोडी ; घोडगी ; भोपळ - देवता ; घोडनवरी ; घोडी पहा . घोडकूल - न . १ ( गो . ) लहान घोडें ; तट्टू २ ( खा . ) ओटयाच्या खांबावर तिरपा टेंकू ( कर्ण ) देऊन त्यावर कोरलेली घोडयाची आकृति . घोडकें , घोडका - नपु . १ ज्याच्या भरीला करळया व तरसे घालून गाडयाची तक्तपोशी , बैठक तयार करतात अशीं चौकटींतील दोन बाजूचीं दोन उभीं लांब लांकडें . २ तेल्याच्या घाण्याच्या कातरीला खिळलेलें व जुंवाचा दोर बांधावायाचें लांकूड . घोडके - ढोरांचा गुरु . - गांगा २६ . घोडकेळ - न . ( क्क . ) एक हलक्या जातीचें भसाडें केळें . [ घोडा + केळें ] घोडक्या , घोडका - पु . १ घोडयाचा खिजमतगार ; मोतद्दार . घोडयास शिपाई काय करिल घोडका । - ऐपो ३७२ . २ चाबुकस्वार ; अश्वशिक्षक ; घोडा अर्थ ९ मधील शेवटचा अर्थ पहा . घोडकोस - पु . ( गो . ) तीन मैलांचा कोस . घोडगा , घोडगी - पुस्त्री . ( उप . ) वयानें प्रौढ पण पोरकटपणा , नाचरेपणा अंगीं असलेला मुलगा , मुलगी ; घोडा अर्थ ५ पहा . घोडी अर्थ ७ पहा . घोडगांठ , घोडेगांठ - स्त्री . ( बुध्दिबळांचा खेळ ). एकमेकांच्या जोरांत असलेली घोडयांची दुक्कल . घोडचवड - स्त्री . घोडदौड ; घोडा चौफेर उडविणें ; चवडचाल . घोडचवडीखालीं नाना पुण्याला आला . - ऐपो १६२ . [ घोडा + चवड = विशिष्ट चाल ] घोडचाल - स्त्री . घोडयाची चाल . ( ल . ) जलद चाल . [ घोडा + चाल ] घोडचिलट , घोडेचिलट - न . मोठें चिलट ; डांस ; मच्छर . घोडचूक - स्त्री . मोठी व अक्षम्य चूक . घोडचोटया - वि . १ ( मनुष्य ). ( अश्लील ) घोडयाच्या चोटासारखा मोठा चोट ज्याचा आहे असा २ ( निंदार्थी ) मुंज न झालेला , वाढलेला मुलगा ; घोडकुदळ ; घोडमुंज्या . घोडजांवई - पु . ( उप . ) मोठया वयाचा नवरामुलगा ; घोडनवरा . घोडजाळी - स्त्री . ( भोंवर्यांचा खेळ ) विरुध्द पक्षाच्या भोंवर्याला खोंचा देऊन आपला भोंवरा दूर जाऊन फिरत राहील अशा रीतीनें भोंवरा फेकण्याचा प्रकार . [ घोडा + जाळी = दोरी ] घोडतोंडया - वि . घोडयाच्या तोंडासारखा लांबट चेहरा असलेला ; कुरूप ; लांबट , ओबडधोबड तोंडवळयाचा . [ घोड + तोंड = चेहरा ] घोडदळ - न . १ घोडेस्वारांचें सैन्य ; फौज . २ सैन्यांतील घोडेस्वारांचें पथक , तुकडी . [ घोडा + दळ = सैन्य ] घोडदौड - स्त्री . घोडयासारखें पळणें ; घोडयाची दौड ; जलद जाणें . [ घोडा + दौड = पळणें ] घोडनट - न . ज्याचें एक तोंड आढयावर व एक लगीवर येऊन दरम्यान तिरपें राहतें असें लांकूड ठोकतात तें . घोडनवरा - पु . ( उप . ) प्रौढवयाचा नवरामुलगा ; घोडजांवई . घोडनवरी , घोडेनवरी - स्त्री . ( उप . ) मोठया वयाची नवरी मुलगी , वधू ; योग्य व सामान्य वयोमर्यादेबाहेर अविवाहित राहिलेली मुलगी . हे मोठमोठया घोडनवर्या घरांत बाळगल्याचे परिणाम बरं ! - झांमू . घोडपाळणा , घोडेपाळणा - पु . घोडयाला ( लांकडी चौकटीला ) टांगलेला पाळणा ; हलग्याना न टांगतां जमीनीवर घोडयास अडकविलेला पाळण्याचा एक प्रकार , घोडा ८ अर्थ पहा . घोड पिंपळी - स्त्री . पिंपळीची मोठी जात ; हिच्या उलट लवंगी पिंपळी . घोडपुत्र - पु . घोडयाला ( विशेषत : बुध्दिबळांतील घोडयाला ) प्रेमाने किंवा प्रतिष्ठेनें संबोधण्याचा शब्द . [ घोडा + पुत्र = मुलगा ] घोडपेटें - न . १ दोन भोपळे पुढें व दोन मागें बांधून केलेला तराफा ; घोडा अर्थ २१ पहा . २ भोंपळयावर दोन्ही बाजूस पाय टाकून घोडयासारखें बसून पाण्यावर तरणें , तरंगणें . घोडबच्य - न . दुबळा घोडा पुष्ट होण्यास एक औषध . घोडबच्य पावशेर , राई पावशेर भाजलेलीं काळी मिरें पावशेर ... मिश्रणापैकीं आतपाव दररोज देत जावें . - अश्वप १ . १७५ . घोडबांव - स्त्री . ( कु . ) घोडयांना पाणी पितां येईल अशा तर्हेनें बांधलेली विहीर . [ घोड + बांव = विहीर ] घोडबाही - स्त्री . १ दाराच्या दुहेरी चौकटीच्या आंतल्या चौकटींतील दोन्ही बाजूचे खांब . २ खटार्याच्या बैठकीच्या चौकटीच्या दोन बाजूंच्या लांब लांकडांपैकीं प्रत्येक ; घोडकें , घोडें पहा ; [ घोडा + बाही = बाजू ] घोडबाळ - वि . ( उप . ) पोरचाळे करणारा प्रौढ पुरुष , स्त्री ; पोरकट माणूस . [ घोडा + बाळ ] घोडब्रह्मचारी - पु . ( उप . ) लग्नाचें वय कधींच झालें असूनहि अविवाहित राहिलेला मुलगा ; घोडनवरा . [ घोडा + ब्रह्मचारी ] घोडमल्ली - स्त्री . ( बुध्दिबळांचा खेळ ) घोडयानें मात करण्याचा प्रकार . प्रतिपक्षाचें घोडें व राजा आणि आपलें घोडें , राजा व एकच प्यादें राखून प्यादेमात करणें ; घोडमात . घोडमात , घोडेमात - स्त्री . ( बुध्दिबळांचा खेळ ) घोडयानें राजाला दिलेली मात ; घोडमल्ली पहा . [ घोडा + फा . मात = कोंडणें ] घोडमाशी - स्त्री . १ मोठया आकाराची हिरवी , काळसर माशी . २ ( सामा . ) मोठी माशी . घोडमासा - पु . एक प्रकारचा मासा ; सागराश्व . ह्याचें तोंड कांहींसें घोडयासारखें दिसतें . यास लांब शेपूट असतें . हा नेहमी उभा पोहतो . घोडमुख , घोडमुख्या - पु . १ घोडयाचें तोंड असलेला किन्नर नांवाच्या देवयोनींतील पुरुष . याचें वर्णन पुराणांतरीं सांपडतें . २ ( ल . ) अगदीं कुरूप . घोडतोंडया माणूस . एक मीरवलें भुरळें पींगळें । घोडमुखें । - दाव २८५ . घोडमुंगळा - पु . मोठा व काळा मुंगळा . घोडमुंगी - स्त्री . मोठी , काळया जातीची मुंगी . घोडमुंज्या , घोडेमुंज्या - पु . उप . १ मुंज होण्याचें वय झालें असून मुंज न झालेला मुलगा . २ लग्न न झालेला प्रौढ मुंज्या . [ घोडा + मुंज्या ] घोडला - पु . मूल रांगत असतांना त्याची होणारी घोडयासारखी आकृति . घोडा अर्थ १० पहा . घोडली - स्त्री . ( कों . हेट . ) ( नाविक ) शौचास बसण्याकरितां वर्यास एक चौकट चार दोर्यांनी अडकवितात ती . [ घोडा ] घोडवळ - स्त्री . १ बांधलेल्या घोडयांची ओळ , रांग . २ घोडयांचा तबेला ; घोडशाळा ; घोडसाळ ; यावरून ( सामा . ) तबेला ; रोडोला हत्ती घोडवळींतून जाणार नाहीं . ३ लांबचलांब , ठेंगणें व बेढब घर ; मागरघर ; दांडसाळ ; केवळ तबेल्यासारखें असलेलें घर ; कोठडी . ४ ( उप . ) घोडनवरी . ५ न झोडपलेल्या , झोडपून दाणे न काढलेल्या धान्याच्या पेंढयांची रास , गंजी . [ घोडा + ओळ ] घोडवाट , घोडेवाट - स्त्री . घोडयांकरितां केलेली , फक्त घोडयाला जातां येईल अशी वाट , रस्ता ( विशेषत : डोंगर इ० याच्यावरून ); उलट गाडीवाट . [ घोडा + वाट ] घोडविवाह - पु . विषमविवाह . आपली नात शोभेल अशा दहा वर्षाच्या पोरीशीं लग्न लावण्यास तयार असतात व असा घोडविवाह करूनहि फिरून समाजांत हिंडण्यास ... त्यांस दिक्कत वाटत नाहीं - टि ४ . ९६ . [ घोडा + विवाह ] घोडवेल - स्त्री . ( सांकेतिक ) घोडयाची लीद ; ( औषधांत घोडयाच्या लिदीचा उपयोग करावयाचा असल्यास तिचा निर्देश ह्या शब्दानें करतात ). घोडशह - पु . ( बुध्दिबळांचा खेळ ) घोडयानें दिलेला शह . [ घोडा + शह ] घोडशाळा , घोडसाळ - स्त्री . १ घोडयांचा तबेला ; घोडवळ अर्थ २ पहा . [ घोडा + शाळा = घर ] घोडशिष्य - पु . ( निंदार्थी ) विद्यार्जन करूं पाहणारा मोठया वयाचा विद्यार्थी , मोठेपणीं शिकावयास लागाणारा मनुष्य . घोडशीर - स्त्री . १ पायाच्या टांचेच्या वरच्या बाजूस असलेली शीर , नाडी ; दवणशीर ; घोंडशीर पहा . २ ( क्क . ) पायाचा किंवा हाताचा स्नायु . घोडसटवी - स्त्री . १ उग्र स्वरूप धारण केलेली देवी . ( क्रि० लागणें ). २ घोडी व्याल्यापासून सहाव्या दिवशीं करावयाची सटवीची पूजा . ( एखादीला ) ०लागणें १ घोडसटवीप्रमाणें उग्र व विक्राळ दिसणें . २ घोटसटवीची बाधा होणें . घोडेखाद - स्त्री . १ घोडयांचे चरणें ; हरळी खाणें . या घोडे खादीमुळें माळावर एक काडी राहिली नाहीं . २ फक्त घोडयांना चरतां , खातां येईल इतक्या वाढीचें गवत . ह्या माळावर मोठें गवत नाहीं , घोडेखाद कोठें कोठें आहे . [ घोडा + खाद = खाणें ] घोडेखोत - पु . घोडे भाडयानें देण्याचा धंदा करणारा ; भाडयाच्या घोडयांचा नाईक . [ घोडा + खोत = मक्तेदार ] घोडेघाटी - स्त्री . एक प्रकारचें रेशमी कापड . घोडेघास - न . १ विलायती गवत ; लसूनघास . २ घोडकुसळी पहा . [ घोडा + पाऊल ] घोडेपाऊल - न . एक वनस्पतिविशेष . [ घोडा + पाऊल ] घोडेराऊत , घोडेस्वार - पु . घोडयावरील शिपाई घोडयाएवढी चूक - स्त्री . फार मोठीचूक ; ढोबळ चूक ; घोडचूक पहा . घोडया गोंवर - पु . एक प्रकारचा गोंवराचा आजार ; याच्या पुटकुळया मोठया असतात . [ घोडा = मोठा + गोवर ] घोडयाचा - पु . ( निंदार्थी ) घोडयावर बसलेला मनुष्य ; घोडेस्वार . ते पहा घोडयाचे चालले . मागून स्वारी येतीसें वाटतें . घोडयाचा दाणा - पु . १ ( उप . ) हरभरा . २ ( ल . ) बुंदीच्या लाडवास तिरस्कारानें म्हणतात . घोडयाचा पूत , घोडयाचा लेंक - पु . ( उप . ) मूर्ख ; गाढव ; गध्दा . घोडयाची चाकरी - स्त्री . घोडयांना दररोज चोळणें , खरारा करणें इ० काम . घोडयाची जीभ - स्त्री . ( राजा . ) एक वनस्पति विशेष . घोडयाची मुंज , घोडयाचें बारसें - स्त्रीन . एखादा कोठें जावयास निघाला असतां एखाद्या अधिक प्रसंगी व फाजिल चौकशी करणार्या माणसानें त्यास कां , कुठें जातां असें विचारलें असतां म्हणतात . घोडयांचें नाटक - न . ( ना . ) सर्कस . घोडयाचें मूत - न . १ कुतर्याचें मूत ; अळंबें ; भुईछत्री . २ कुजलेल्या लांकडांतून फुटलेलें अळंबें . घोडयाच्या पाठीवर क्रिवि . भरधाव ; झरकन ; त्वरेनें . ( क्रि० जाणें ; करणें ). घोडयाच्या पाठीवरचा कोस - पु . कंटाळवाणा व लांबणीचा कोस ; घोडयावरून गेल्यासच कोसाएवढें व कंटाळवाणें न वाटणारें अंतर .
|