|
स्त्री. शरीरावरील केंसांचा भोंवरा किंवा झुपका . [ सं . आवर्त ] स्त्री. उद्गा . अरे ! अर - र - र ! [ ध्व . ] स्त्री. गुदस्थानांत होणारें गळूं ; अरई पहा . [ सं . अर ] स्त्री. चाकाचा तुंबा व पाटा यांच्या मधील लाकडी तुकडा . [ सं . अर ] स्त्री. ( गो . ) अर्धांगवायु ; आर मारची = अर्धांगवायूचा झटका येणें . अ. संस्कृतमधील कार ( = करणारा ) या अर्थी मराठींतील प्रत्यय , हा कारागिरांना लागतो . जसें - सोनार , सुतार , लोहार , चांभार . इ० [ सं . कृ - कार ] पु. विटीदांडूच्या खेळांतील मोजण्याचा ६ वा आंकडा ( वकट , लेंड , मुंड , नाल , ऐद , आर इ० ). [ का . आरु = ६ ] पु. अजगर ; अहार . आरें धारणु गिळिला - ज्ञा १३ . ७२४ ; - एभा १३ . १९४ . आरें गिळितांहि संकटीं । तें स्मरण करितां सोडणें ॥ - मुआदि १२ . ३९ . भोंवरा , जातें , अंकुश , काठीचा शेवट , लांकडी कणा यांची अरी किंवा अणकुचीदार लोखंडी टोंक . अरी पहा . सुस्त , आळशी माणूस ; अजगर वृत्तीचा , जड माणूस . [ सं . अजगर ; प्रा . अअअर . ] जरुर ; निकड ; तातड ; घाई ; उत्कंठा ; बोंचणी . ( क्रि० लावणें ; लागणें . ) दोरीचें बारीक टोंक किंवा शेवट . अंकुर , मोड - विशेषत : जुन्या नागवेलीस फुटणारे अंकुर , धुमारे . या धुमार्यांचा बियाण्याकरतां उपयोग करतात . म्ह० नागवेलीची आर एकदां रुजली म्हणजे वेल वाढतो . ( सामा . ) पागोरा ; तंतु ; वेलीचा ताण ; अंकुर . तेथ आरघेणें मूळाचें । तें ऐसें असें । - ज्ञा १५ . ७९ . काळजी ; टोंचणी ; आच . त्याला आतां संसाराची आर लागली आहे . ( क्रि० लावणें , लागणें ). गुरांना टोंचण्याची पराणी . जुंतिलें घाणां बांधोनी डोळे । मागें जोडी आर तेणेहि पोळे । - तुगा ७०१ . ( ओतकाम ) चरकीवर भांडें झिलई ( पॉलिश ) करतांना त्याच्या मधोमध दोन्ही बाजूनीं लावले जाणारे खिळे . ( व . ) करारीपणा ; एखाद्याचें कोणाशीं बिनसलें असतां पुन्हां त्याच्याशीं बोलणें - चालणें इ० व्यवहार किंवा संबंध न ठेवण्याची वृत्ति ; गर्व ; ताठा ; अभिमान . इतकी सुध्दां आर असूं नये तुम्हाला ? [ सं . अर , आरा . ]
|