भक्ति गीत कल्पतरू - येई त्वरे गुरुनाथा । प्रा...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


चाल - रमला कुठे ग

येई त्वरे गुरुनाथा । प्राणाच्या प्राणनाथा ॥धृ०॥

मी हीन दीन हो अबला । येवुनी तारी मजला ।

काळ असे हा जवळी आला । प्राणाच्या होईल घाता । येई त्वरे० ॥१॥

भेटीची आंस असे मनीं । येई तूं आता धावुनी ।

कधी पाहीन तुज मी नयनीं । तव चरणीं ठेवीतें माथा ।येई त्वरे० ॥२॥

पाहण्याची आवड मोठी । कधी देशील येवुनी भेटी ।

प्रेमाच्या सांगुनी गोष्टी । शांत करी वारीसी आता । येई त्वरे० ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-05-06T05:18:11.8570000