सूर्याच्या आरत्या - जय जय जगतमहरणा दिनकर सुखक...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


जय जय जगतमहरणा दिनकर सुखकिरणा ।

उदयाचाल जगभासव दिनमणि शुभस्मरणा ॥

पद्मासन सुखमूर्ती सुहाय्य वर वदना ।

पद्मकरा वदप्रभ भास्वत सुखसदना ॥ १ ॥

जय देव जय देव जय भास्कर सूर्या ।

विधिहरिशंकररूपा जय सुरवरर्या ॥ धृ. ॥

कनकाकृतिरथ एकचक्रांकित तरणीं ।

सप्ताननाश्व भूषित रथिं त्या बैसोनी योजनसहस्त्र द्वे द्वे शतयोजन दोनी ॥

निमिषार्धे जग क्रमिसी अदभूत तव करण ॥ जय. ॥ २ ॥

जगदुद्‍भवस्थितिप्रलय करणाद्य रुपा ।

ब्रह्मापरात्पर पूर्ण तूं अद्वय तद्रूपा ॥

तत्वंपदव्यति रिक्ता अखंडमुखरुपा ॥

अनन्य तव पद मौनी वंदित चिद्रूपा ॥ ३ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP