सूर्याच्या आरत्या - नारायण चतुराक्षर वेदीं जो...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


नारायण चतुराक्षर वेदीं जो स्तविला ।

येतां उदया भास्कर रजनीस्तव सरला ॥

रविमंडळ शशिमंडळ भूमंडळ जाहला ।

त्रिकाळ संध्या अर्घ्ये सवित्याला ॥ १ ॥

जय देव जय देव दिनकर दिनबंधू ।

द्विजवरतारक हारक दुस्तरभवसिंधू ॥ धृ. ॥

सप्तमुखांचा बाजी रथ गगनी चाले ।

रविरथ सुंदर उदया सहस्त्रकर आलें ॥

त्रिभुवनिं प्रकाश पडतां दैत्य लया गेले ।

तो श्री दिनकर आत्मा तेजे जन चाले ॥ २ ॥

सर्वांत्मक तूं जे तेजा तेजो गुणराशी ।

दिनकर अघभय हारक तारक सर्वाशी ॥

गंधाक्षत आरक्त कुसुमे प्रिय ज्यासी ।

अपूप घृत पय पायस अर्पिती यज्ञासी ॥ जय. ॥ ३ ॥

त्रिभुवनि फेरे फिरतां अस्तोदय होसीं ।

रजनी दिनकर सकळां यावे उदयासी ॥

तटस्थ राहती कर्मे सुरनर उपवासी ।

तुझीयावांचुनि मुक्ति न घडे यज्ञासी ॥ ४ ॥

त्रिकाळ संध्या अर्घ्ये देती सूर्याला ।

द्विजकुळगुरु जों भास्कर आराधिती त्याला ॥

करितां भक्तीभावे द्वादश नामांला ।

दामोदर जोडुनि कर शरणागत त्याला ॥ ५ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP