मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सप्तशती गुरूचरित्र|

श्रीसप्‍तशतीगुरुचरित्र - अध्याय १६

श्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.


तो महात्मा लोटुनी शिष्यां । स्वयें कोठें राहोनियां । काय करी असे तया । विप्रें पुसतां सिद्ध सांगे ॥

सवें जितात्मा मी एक । वैजनाथीं गुरुनायक । असतां विप्र आला एक । सांगे दुःख गुरुनें दिल्हें ॥२॥

गुरु तया धिक्कारुन । म्हणती तूं रे जा यथोन । येरु धरुनियां चरण । गुरुसेवन सांगा म्हणे ॥३॥

गुरु संतोषें बोलती । ब्रह्माविष्णूशिवमूर्ति । गुरु ब्रह्म साक्षात्‌ म्हणती । भक्तां देती ते सर्वार्थ ज्ञ ॥४॥

सेवा गहन वाटे तरी । गुरु आपुल्या शिष्या तारी । कथा झाली हे द्वापारीं । अवधारी मी सांगतो ।

धौम्य दोषज्ञ गुरु भला । तिघे शिष्य होते त्याला । कठिण सेवा सांगे त्याला । न वेदांसी सांगे पूर्वी ॥

विशेषार्थ न सांगती । हृच्छुघ्यर्थ सेवा घेती । वळखूनी प्रसन्न होती । रहाटी ऐसी गुरुची हे ॥७॥

धौम्य अशा रीती शिष्या । अरुणा म्हणे शेतीं तोया । न्हेयी म्हणतां तो न्हे तोया । तें न जाय शेताकडे ॥

मनीं ध्यायी गुरुपद । जलामध्यें पडे सानंद । जळ क्षेत्रीं ये स्वच्छंद । गुरु प्रसाद करी तेव्हां ॥९॥

अध्यात्म ज्ञानी तो झाला । तया गेहा पाठविला । धौम्य सांगे बैदाला । ह्या शेताला यत्‍नें राखीं ॥१०॥

राखोनि तो मळी धान । गुरुला ते दे सांगून । गाडा रेडा एक देऊन । म्हणे आण धान्य घरीं॥११॥

गाडा त्या धान्ये भरुन । आणिता पंकी तो गढून । गेला तव गुरु येवून । त्या काढून प्रसन्न हो ॥१२॥

सर्व विद्या आल्या त्याला । तया गेहीं पाठविला । गुरु म्हणे उपमन्यूला । तूं धेनूला वनी चारीं ॥१३॥

नेवोनि तो गुरें रानीं । चरवी तेथें भिक्षा करुनी । गुरु मागे तें जाणुनी । भिक्षा आणुनि दे ती मला ॥१४॥

द्विरावृत्ती भिक्षा करी । शिश्य एक देई घरीं । तें जाणुनी गुरु दुसरी । भिक्षा घरीं देई म्हणे ॥१५॥

दुश्चित्त तो नच होई । दोनी भिक्षा घरीं देई । वस्तोच्छिष्टपय घेई । गुरुमायी वारी तया ॥१६॥

तो अर्‌काचें क्षीर पीतां । होई अंध कूपी पडतां । कृपा आली गुरुनाथा । दृष्टी देता झाला मंत्रें ॥१७॥

सत्कामाः फलंतु ते । असें म्हणुनि धाडी त्यातें । तो हो कृतार्थ कीर्तीते । तच्छिष्यें मिरविली ॥१८॥

जगद्वंद्य शिष्य झाला । सतक्षकेंद्र पाडिला । गुरुतोषाची ही कला । जा तूं गुरुला पुनः सेवीं ॥१९॥

तो तद्वैरें अनुतापाला । मग तारिती गुरु त्याला । आले भिल्लवाडीला । वास केला चार मास ॥२०॥

इति श्री०प०प०वा०गु० सारे शिष्यत्रयाख्यानं नाम षोडशो०

N/A

References : N/A
Last Updated : March 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP