माजघरांतील गाणी - कळ नांरदाची खुटी। गमन तीन...

संसारांतील सुखदुःखांच्या जोडीलाच, एकमेकींना येत असलेलीं गाणीं सहज गंमत म्हणून एकमेंकींना सांगावयाची आणि घटकाभर मजेंत वेळ घालवावयाचा, या गाण्यांना कुणीं माजघरांतील गाणीं तर कुणीं बैठकींतील गाणीं असेंहि म्हणतात.


माजघरांतील गाणी

कळ नांरदाची खुटी। गमन तीन तळ्याच्या तळवटीं । राजांतरी पडल्या तुटी ।

कस्तुरींत पडली हिंगाची चिठी । सोन्याची बिगाडली भटी । वडील गंधारी कुंती धाकटी ।

श्रीपान हात्तींच्या शिरीं । कळ निर्माण झाली खरी । आतां गेलीया ववसुन गंधारी ॥१॥

आज ववसा अस्तानापुरं । तिथं काय नांद कैवर ( कौरव ) चातुर ।

याक आगळा बंधु शंबर शंबराची दुष्ट नदार । त्यांनीं बसुन केला विचार ।

त्यांनीं काय न्हाई पाहिलं दुरी । कळ निर्माण झाली खरी । आतां गेलीया ववसुन गंधारी ॥२॥

केला मुरताकीचा ( मातीचा ) हत्ती । त्येला चाकं बनविलीं सुती । रंग दिला काळा कुसरी ।

कळ निर्माण झाली खरी । आंता गेलीया ववसुन गंधारी ॥३॥

अंबारीच खांब सोन्यारी । सोन्या कळस चमकतो घरी । हात्ती सजीवला भवतापुरें ।

गळ्यां काय घाट सर दुहीरी । कळ निर्माण झाली खरी । आतां गेलीया ववसुन गंधारी ॥४॥

अंबारींत बसुन ह्या मातला । कैक वडती हात्तीला । हात्ती काय दोरसुद चालला ।

वान दिलं नगर नारीला । नगरीं वसवुनी हात्ती फिरविला । शस्तार धरलं कुंतीवरी ।

कळ निर्माण झाली खरी । आतां गेलीया ववसुन गंधारी ॥५॥

कुंती म्हादेव बसली हौदांत । गेली कैवाराच्या वाड्यांत । बरीच विष्णु राखिली पत ।

घ्या पूर्वीचं सुक्रीत । हात्ती दाखल इंद्राघरीं । कळ निर्माण झाली खरी । आतां गेलीया ववसुन गंधारी ॥६॥

अर्जुन म्हनी भिऊ बळी । चिखलाची गोष्ट न्हाई बरी । धाडुनि पत्र इंद्राघरीं ।

ह्या इंद्राचं जानं भाईरी । पोंचले बाण इंद्रकचेरीं । त्यांनी पाहिलं वाचुनी ।

हात्ती पाठुन द्या लवकरी । कळ निर्माण झाली खरी । आता गेलीया ववसुनी गंधारी ॥७॥

अर्जुन मंत्रासी जपला । भिऊ बाणाला निसटला । कुंतीनं वरच्यावरं झेलिला । भिऊ म्हनी लज्जा न्हाई अंतरीं ।

घ्या उस्नं आपलं लौकरी । कळ निर्माण झाली खरी । आतां गेलीया ववसुन गंधारी ॥८॥

भोळा बुरुंज समंद कवटाळी । कैक खवील्या बसवील्या तळीं ।

वाट मिळना झाली आरूळी । भूल पडली अस्तानापुरीं । कळ निर्माण झाली खरी । आतां गेलीया ववसुन गंधारी ॥९॥

आज ववसा घ्या तिळगुळ । ह्या ववशापसुन मातली कळ । तूं झुराळ मीं सागर ।

तिथं काय देत्तात्रीचं देवळ । किष्ण देव आमचं कैवारी । आतांच गेली ववसुन गंधारी ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-09-20T10:23:22.1800000