धन संपत्तीला काय उणं सख्या वो आपुल्या वो घरीं जाऊयीनी
पिवळी शेलारी यावी घेऊनी अवघ्या नगीं लव भरजरीची
घडी रुमालांत घालुनी आणावी चौकशी करूनी
एवढं वरचेवरी ऐकुनी पिवळी शेलारी यावी घेऊनी
श्रावण शुद्ध आला महिना नागर पंचीम आली साजणा
मन पूजा करीन गौरीची आवड मला पिवळ्या शेलारीची
राधा नेसुनी रूपसूंदर लोळे पतीच्या ग चरणावर