मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
ऐसा पुत्र देंई संतां । तर...

संत जनाबाई - ऐसा पुत्र देंई संतां । तर...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


ऐसा पुत्र देंई संतां । तरी त्या आवडी पंढरिनाथा ॥१॥

गीता नित्य नेमें । वाची ज्ञानेश्वरी प्रेमें ॥२॥

संतांच्या चरणा । करी मस्तक ठेंगणा ॥३॥

कन्या व्हावी भागीरथी । तुझे प्रेम जिचे चित्तीं ॥४॥

ऐसे करी संतजना । दासी जनीच्या निधाना ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP