सत्याम्बा व्रतकथा - अध्याय तिसरा

श्रीसत्याम्बा म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून जगन्माता दुर्गा किंवा जगदम्बाच होय.


सूत म्हणतात, 'हे श्रोत्यांमध्ये श्रेष्‍ठ, भक्तितत्पर, महाभाग्यवान् शौनका, अशाप्रकारे या मृत्युलोकी मुक्ति देणारे हे सत्यांबादेवीचे व्रत प्रगट झाले ॥१॥
ते सर्वच ऐकण्यासारखे असून भूलोकी फल देणारे आहे. आता त्याविषयी इतिहास सांगतो, श्रवण करा.
सूत उवाच ॥
भौः शौनक महाभाग श्रोतृणां भक्तितत्पर ॥ यथा व्रतं तु सत्यायाः प्रकटं भुवि मुक्तिदम् ॥११॥
तथा वदाम्यशेषेण श्राव्यं तु फलदं भुवि ॥ पुरा मागधदेशेषु सौराष्‍ट्रं नगरं त्वभूत् ॥२॥
मगधानां. राजधानी सर्वलोकेषु विश्रुता ॥ तस्या राजा सूर्यकेतुश्चासीत्तत्र सुभक्तिमान् ॥३॥
आनन्दलहरी पत्‍नी ह्यासीत्तस्य पतिव्रता ॥ देव्या भक्त्यां सदासक्तो भजने पूजने रतः ॥४॥
'पूर्वी मागध देशात सौराष्‍ट्र नांवाचे शहर होते ॥२॥
ते शहर मागध राजाची राजधानी म्हणून सर्व लोकात प्रसिद्ध होते. तेथे सूर्यकेतु नावाचा एक अत्यंत भक्तिमान् राजा होऊन गेला. ॥३॥
त्याची आनंदलहरी नावाची स्त्री अत्यंत पतिव्रता होती. तो राजा नेहमी देवीच्या भजनपूजनात तत्पर असे. ॥४॥
देवीच्या कृपेने त्यास शंभर पुत्र झाले.
त्यामुळे तो नेहमी आनंदात मग्न असून देवीच्या भक्तिविषयी तत्पर असे. ॥५॥
त्याने नगरांत एक देवालय बांधले. तेथे अनेक प्रकारचा दानधर्म करुन तो नेहमी गरिबांचे पालन करीत असे ॥६॥
त्याचा वडील मुलगा अर्ककेतु नावाचा असून
तस्या देव्याः प्रसादेन तस्य पुत्रशतं त्वभूत् ॥ आनन्दाब्धौ सदा मग्नो देवीपूजनत्परः ॥५॥
पुरे देवालयं कृत्वा तत्र दानान्यनेकशः ॥ दीनानां पालनं नित्यं करोत्येवं सदा भुवि ॥६॥
तस्य पुत्रस्त्वर्ककेतुर्ज्येष्‍ठोऽभूच्छुतपारगः ॥ यौवराज्यप्रकर्ताऽसौ पितृभक्तिपरायणः ॥७॥
पुत्रवत्पालयन् राष्‍ट्रं शत्रूणां भयदायकः ॥ आनन्दाब्धौ सदा मग्नो दुःखमेकं स चाप्तवान् ॥८॥
एकस्मिन्नेव काले तु
तो फारच बहुश्रुत होता. तोही राज्यकारभार पहात असून बापाच्या भक्तीत तत्पर असे. ॥७॥
शत्रूस भय देणारा असा तो राजा, पुत्राप्रमाणे प्रजेचे पालन करुन नेहमी आनंदात असता त्यास एक दुःख प्राप्त झाले. ॥८॥
कोणे एके वेळी ह्याच्या राज्यात परचक्र आले; त्या शत्रूने आपला एक दूत त्याच्या सभेत पाठविला. ॥९॥
त्या दूताने निर्भीडपणे येऊन राजास वंदन करुन म्हटले, 'हे राजा, मालंब देशाचा राजा गावाबाहेर बागेत येऊन उतरला आहे ॥१०॥
त्याने सांगितले आहे की, तू एक खंडणी तरी द्यावीस अगर क्षत्रियधर्माप्रमाणे
राष्‍ट्रेऽस्य परराष्‍ट्रभूः ॥ राजाऽऽगतोऽस्य दूतस्तु सभामभ्यागतस्तदा ॥९॥
राजानं स नमस्कृत्यं गतभीः समुवाच ह ॥ हे राजन्मालवो राजा बाह्योपवनमागतः ॥१०॥
करभारं च देहि त्वमथवा युद्धमेव वा ॥ कुरु त्वं राजधर्मेण भूपो वदति सांप्रतम् ॥११॥
श्वः काले युद्धकर्ताऽसौ चागतः सेनया सह ॥ किमुत्तरं भूप वाच्यं त्वया वाच्यं त्वरेण वै ॥१२॥
इति दूतवचः श्रुत्वा इतो गच्छ त्वमेव
युद्ध करण्यास तयार व्हावे ॥११॥
हे राजा, तो मालवराज सैन्यासह आला असून उद्या युद्ध करण्यास तयार आहे; तरी काय उत्तर देणे असेल ते लवकर दे.' ॥१२॥ असे दूताचे बोलणे ऐकून 'तू येथून जा' असे दूतास सांगून तो राजा रागाने मुलास म्हणाला, ॥१३॥
'अरे मुला, तू काय करितोस ? परचक्र आले आहे हे तुला माहित नाही काय ? तर आता जा, आणि किती सैन्य आले आहे हे पाहून ये.' ॥१४॥
असे राजाचे भाषण ऐकून युवराज बाहेर गेला आणि शुत्रसैन्य पाहून येऊन बापास
हि ॥ इत्थमुक्त्वा तदा दूतं क्रोधात्पुत्रमभाषत ॥१३॥
रे पुत्र किं करोषि त्वं न ज्ञातं परराष्‍ट्रकम् ॥ सांप्रतं गच्छ दुष्‍ट त्वं कति सेनां विलोकय ॥१४॥
इति रोषवचः श्रुत्वा युवराजो गतस्तदा ॥ शत्रोः सेनां विलोक्यार्थं पितरं वाक्यमब्रवीत् ॥१५॥
हे तात शृणु मे वाक्यं परराष्‍ट्रं विलोक्य च ॥ सेना दृष्‍टा मया चाद्य तुच्छा मां भाति सांप्रतम् ॥१६॥
दशलक्षं हयानां च गजानां पञ्चलक्षकम् ॥ रथानां सप्तलक्षाणि पत्तिर्विंशतिलक्षकम्॥१७॥
एवं
म्हणू लागला. ॥१५॥
'अहो बाबा, माझे भाषण ऐका. मी शत्रुसैन्य पाहून आलो. मला तर ते अगदी तुच्छ वाटते. ॥१६॥
घोडे दहा लक्ष, हत्ती पाच लक्ष, रथ सात लक्ष व पायदळ वीस लक्ष आहे. ॥१७॥
हे राजा, शत्रूचे सैन्य ह्याप्रमाणे आहे; हे मी प्रत्यक्ष पाहिले. माझे सैन्या तर अगणित आहे; मी पाहून मोजून येतो.' असे म्हणून तो राजपुत्र सैन्य पहाण्यास गेला. इकडे तो राजा अंतर्गृहात जाऊन चिंताग्रस्त होऊन बसला. ॥१९॥
'आता मी काय
सेना वर्तमाना मया दृष्टवा रिपोर्नृप ॥ मम सेनात्वसंख्याता दृष्‍ट्‌वाद्यगणयाम्यहम्॥१८॥
एवमुक्त्वा तदा पुत्रो गतः सेनाविलोकने ॥ ततश्चान्तर्गतो राजा चिन्ताग्रस्तोऽऽभवत्तदा ॥१९॥
सांप्रतं किं प्रकर्तव्यं सेनाव्यूहं न चास्ति तमे ॥ भाण्डारं विपुलं नास्ति योद्धा न च समीपगः ॥२०॥
किं कर्तव्यं मया चाद्य पुत्रो मूर्खोऽपि वर्तते ॥ गुरुराहूयतां शीघ्‍रं गच्छ दूत त्वरान्वितः ॥२१॥
ततो दूतस्त्वेरणैव
करावे ? मजजवळ सैन्य नाही. पैसाही पुष्कळसा नाही व जवळ योद्धेही नाहीत. ॥२०॥
आता मी काय करावे ? मुलगाही मूर्खच आहे.' नंतर तो दूतास म्हणाला, 'हे दूता, तू असाच जा आणि कुलगुरुस बोलावून आण' ॥२१॥
त्याप्रमाणे दूत त्वरेने गुरुकडे गेला आणि गुरुस नमस्कार करुन म्हणाला, 'हे गुरो, तुम्हास राजाने त्वरित बोलाविले आहे.' ॥२२॥
असे दूताचे बोलणे ऐकून गुरु त्वरित राजाकडे आला. त्यास पाहून राजा आदराने उठून उभा राहिला. ॥२३॥
नंतर बसण्यास आसन देऊन त्याने अर्घ्यपाद्यांनी गुरुची पूजा केली. तेव्हा भक्तिभावाने युक्त झाल्यामुळे राजाच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले.
गुरोरग्रे गतस्तदा ॥ श्रीगुरोस्तु नमस्तुभ्यं राजाऽऽह्वयति सत्वरम् ॥२२॥
दृतवाक्छ्र्वणात्सद्यश्चागतो राजसंन्निधौ ॥ देशिकं च तदा दृष्‍ट्‌वा चोत्थितस्त्वरया नृपः ॥२३॥
विष्‍टरं चार्घ्यपाद्यं च पूजनं कृतवांस्तदा ॥ भक्तिभावसमायुक्तः सरोमपुलकोऽभवत्॥२४॥
ततः सगद्गदां वाणीमुवाच गुरुमञ्जसा प्रार्थयन्प्राञ्जलिर्भूत्वा प्रणतो भूमिपालकः ॥२६॥
राजोवाच ॥ नमो नमो देशिक देव तुभ्यं भवान्भवाम्भोनिधितारको हि ॥ त्वया विना संङ्कटकं

नंतर त्या राजाने गुरुस नमस्कार करुन दोन्ही हात जोडून सद्गदित अंतःकणाने त्याची प्रार्थना केली. ॥२५॥
राजा म्हणाला, 'हे संसारुप समुद्रातून तारणार्‍या कुलगुरो, तुम्हास नमस्कार असो, तुमच्यावाचून माझे संकट कोण हरण करील ? हे गुरो, माझे दुःख नाहिसे करा ॥२६॥
कुलाचे हित करणार्‍या हे गुरो, माझे संकटापासून रक्षण करा. सध्या माझा प्राण जाऊ पाहात आहेत. तर हे दयासागरा, मी काय करावे हे सांगा.' ॥२७॥
राजा असे गुरुशी बोलत आहे तोच दूत येऊन म्हणाला, 'हे राजा, शत्रूने गावास वेढा घातला व त्याने
हरेत्कः प्रसीद दुःख हर भो गुरो मे ॥२६॥
भो गुरो संकटात्त्राहिकुलानां हितकारक ॥ प्राण गच्छन्ति मे सद्यः किं करोमि कृपा निधे ॥२७॥
एवं संवदतो राज्ञस्तदा दूत उवाच ह ॥ ग्रामं सुलुण्ठितं तेन बद्धा पुत्रं स नीतवान् ॥२८॥
भाण्डारं लुण्ठितं तेन चाश्वशाला गताऽधुना ॥ परस्य दूताः सर्वत्र गच्छन्ति राजसद्यनि ॥२९॥
दूतवाक्छ्र्वणाद्राजा चोक्तवान्गच्छ रे द्रुतम् ॥ परराष्‍ट्रभयं प्राप्तं तूर्णं
राजपुत्रास बांधून नेले ॥२८॥
त्याने द्रव्यभाण्डार (खजिना) लुटले व आपली अश्वशाळाही नेली.' शत्रूचे दूत राजवाडयात सर्व ठिकाणी पसरले आहेत ॥२९॥
दूताचे बोलणे ऐकून राजा म्हणाला, 'अरे तू आता येथून जा.' नंतर राजा गुरुस म्हणाला, 'हे गुरो, ही परचक्राची भीति लवकरच दूर करा' ॥३०॥
तेव्हा गुरु प्रसन्नचित्त (आनंदित) होऊन राजास म्हणाले. ॥३१॥
भारद्वाज गुरु म्हणतात, 'हे राजा, मी मोठया प्रयत्‍नाने आज तुझे संकट निवारण करितो. तूही प्रयत्‍न कर म्हणजे संकट आता जाईल. ॥३२॥ दुःख नाहीसे
देशिक वारय ॥३०॥
तदा प्रसन्नह्रदयो राजानं चोक्तवान्गुरुः ॥३१॥
भारद्वाज उवाच ॥ संकटं चाद्य भो राजन्हरिष्यामि सुयत्‍नतः ॥
कुरु यत्‍नमतस्त्वं हि संकटं गतमद्य ते ॥३२॥
व्रतमस्तीह फलदं दुःखहं च सुखप्रदम् ॥ तद्‌व्रताचरणेनैव ॥ दुःखं दुरे कृतं मया ॥३३॥
कुरु धैर्य मतस्त्वं हि तद्वादाम्यविशिंकया ॥ शीघ्‍रं फलानि चाद्यैव कुरु यत्‍नं त्वरान्वितः ॥३४॥
राजोवाच ॥ भो गुरो वद शीघ्रं त्वं विधिं च फलदं ॥ यतः करोमि
करुन सुख देणारे व उत्तम फळ देणारे असे (एक) व्रत आहे ते व्रत करुनच मी दुःख नाहीसे केले म्हणून समज ॥३३॥
तू धैर्य धर. मी तुला ते व्रत काही शंका न धरिता सांगतो. त्यापासून त्वरित फळे मिळतात. म्हणून तू ते लवकर कर' ॥३४॥
राजा म्हणाला, 'हे गुरो, जर ते (व्रत) फलदायक आहे, तर त्याचा विधि मला लवकर सांगा. हे गुरो, तुम्ही जे सांगाल ते सर्व मी शंका न धरिता करीन' ॥३५॥
त्यावर गुरु म्हणाले, 'हे राजा, उत्तम सिद्धि देणारे असे सत्यांबा व्रत तू लवकर कर. म्हणजे शत्‍रु गावाबाहेर पळून जाईल. ॥३६॥
नंतर वक्त्यामध्ये श्रेष्‍ठ अशा भारद्वाज गुरुने व्रताचा विधि राजास सांगितला आणि ते म्हणाले,
शंकारहितः सर्वं वाच्यं यतः प्रभो ॥३५॥
गुरुरुवाच ॥ त्वं सत्यांबाव्रतं राजन्कुरु सद्यः फलप्रदम् ॥ त्वरा कार्या प्रयत्‍नेन शत्रुर्ग्रामाद्गमिष्यति ॥३६॥
ततो व्रतविधिं यत्‍नात्प्रोवाच वदतां वरः ॥ मयोक्तं तु त्वया कार्यं फलं ग्राह्यं च सत्‍वरम्॥३७॥
गुरुणोक्तस्तदा राजा कृतवान्भक्तितत्परः ॥ पुरोधसं पुरस्कृत्य कथां श्रुत्वैकमानसः ॥३८॥
ब्राह्मणेभ्यो धनं दत्तं दीनानां भोजनं तथा ॥
'मी सांगितले ते तू लवकर कर व फळ मिळव. ॥३७॥
नंतर भक्तितत्पर राजाने गुरुने सांगितल्याप्रमाणे व्रत केले व उपध्यायाकडून एकाग्र अंतःकरणाने कथा श्रवण केली. ॥३८॥
नंतर ब्राह्मणास दक्षिणा दिली व गरिबास भोजन घातले आणि सर्वांस प्रसाद देऊन नंतर स्वतःही प्रसाद घेतला. ॥३९॥
कथा श्रवण करण्यास जे लोक आले होते, त्यांनी जगदंबेस नमस्कार करुन पौराणिक ब्राह्मणास यथाशक्ति दक्षिणा दिली. ॥४०॥
पालखी, मेणे, घोडे, हत्ती, गांवे, वस्त्रे, अलंकार, जहागीर, भूमि व असेच अनेक प्रकारचे धन
सर्वेभ्यश्च प्रसादं वै दत्‍त्वा गुहणात्स्वयं ततः ॥३९॥
श्रवणे ये गता लोकास्ते नत्वा जगदम्बिकाम् ॥ पौराणिकाय विप्राय ददुःशक्‍त्या धनं बहु ॥४०॥
शिबिकाश्वगजग्रामवस्त्राभरणमेव च । धनं बहुतरं भूमिं नियतां दत्तवान् नृपः ॥४१॥
आकाशाद्वाक्तदां जाता भो राजन्सुस्थिरो भव ॥ भक्‍त्या व्रतं कृतं यस्मात्तस्माच्छत्रुर्गमिष्यति ॥४२॥
तदा चु ब्राह्मणैः सर्वैराशीर्दत्त फलप्रदा ॥ व्रताचरण-
राजाने उपाध्यायास दिले. ॥४१॥
नंतर आकाशवाणी झाली की, 'हे राजा, अगदी स्वस्थ राहा. तू भक्तीने व्रत केलें म्हणून आता तुझे शत्रु निघून जातील.' ॥४२॥
तेव्हा सर्व ब्राह्मणांनी राजास आशीर्वाद दिला. सूत म्हणतात - 'हे, शौनकादिक ऋषींनो, नुसत्या व्रताचरणानेच राजाचे दुःख नाहिंसे झाले. ॥४३॥
तेव्हा एकाएकी शत्रूच्या छावणीत गलबला झाला. 'हे दूतांनो, धरा, बांधा, मारा, लक्ष्य द्या.' (ह्याप्रमाणे शिपाई बोलू लागला.) ॥४४॥
असे ऐकून सर्व वीर हातात शस्त्रें घेऊन उठले आणि शत्रूच्या छावणीत आले;
मात्रेण राजदुःखं गतं द्विजाः ॥४३॥
तदा कोलाहलो जातो ह्यकस्माच्छिबिरे परे ॥ घ्रियतां बघ्यतां हन्या दूता हो लक्ष्यतामिति ॥४४॥
इत्येवं श्रवणाद्वीरा उत्थिताः शस्त्रपाणयः ॥ शत्रोश्च शिबिरं प्राप्ता राज्ञः पुत्रास्तु निर्भयाः ॥४५॥
पुरा निष्कासितस्तेन बद्धा ये चावमोचनात् ॥ बन्धमुक्ताश्च ते योध्दुमुत्थिताः शस्त्रपाणयः ॥४६॥
तदा शस्त्राणि चास्त्राणि गजाश्वरथभूषणम्॥
तेव्हा बंदिवान राजपुत्राची भीति कमी झाली. ॥४५॥
सत्याम्बाव्रत करण्यापूर्वी राजाच्या छावणीतून त्या शत्रूराजाने जे योद्धे शिपाई धरुन बांधून नेले होते. ते सर्व योद्धे बंधनापासून मुक्त झाले आणि हातात शस्त्रें घेऊन त्या शत्रूरराजाच्या सैन्याबरोबर निकरानें युद्ध करावयास उठले. ॥४६॥
तेव्हा शत्रूसैन्याने असें, घोडे, रथ अलंकार वगैरे सर्व टाकून चोराप्रमाणे पळण्यास आरंभ केला. ॥४७॥
तेव्हाच मालव राजा घोडयावर बसून पळू लागला. तेव्हा ह्या राजाकडच्या योद्धयांनी त्याला मोठया प्रयत्‍नाने घोडयासुद्धा
त्यक्‍त्वैव चोरवत्सर्वे पलायनमकुर्वत ॥४७॥
तत्रैव मालवो राजा त्वश्वारुढो विनिर्गतः ॥ भटैः स च तदा दृष्‍टः साश्वो बद्धः प्रयत्‍नतः ॥४८॥
मर्कटस्तु यथा बद्धस्तथा नीतो गुणेन वै ॥ राज्ञा दृष्‍टास्तदा राजा मुच्यतामिति चाब्रवीत् ॥४९॥
कृत्वाधोवदनं राजा मालवः प्रणतिं व्यधात् ॥ तदा तं पृष्‍टवान् राजा पुत्राः कृशलास्तव
धरुन बांधिले ॥४८॥
व ज्याप्रमाणे माकडास दोरीने बांधून नेतात, त्याप्रमाणें त्यास बांधून नेऊ लागले. सूर्यकेतु राजाने ते पाहिल्यावर त्यास सोडण्यास सांगितले. ॥४९॥
मालव राजा खाली तोण्ड घालून नमस्कार करुन उभा राहिला. तेव्हा सूर्यकेतूने त्यास असे विचारले 'तुझी मुले कुशल आहेत ना ? ॥५०॥
तुझ्या देशात सांप्रत स्वस्थता आहे ना ? सांग.' मालव राजा म्हणाला, 'हे राजा, मी तुझा फार अपराधी आहे. आता मजवर दया कर. ॥५१॥
मीं माझी सुलोचना कन्या तुझ्या पुत्रास दिली (असे समज) असे म्हणून त्याने आपली मुलगी
॥५०॥ देशे हि स्वस्थता नित्यं वर्तते वद सांप्रतम्॥ मालव उवाच ॥ राजंस्ते हयापराध्यस्मि कृपा कार्या त्वयाधुना ॥५१॥
मत्कन्या वै विशालाक्षी तव पुत्राय चार्पिता ॥ इत्युक्त्वा च तदा तेन साऽऽनीता च समर्पिता ॥५२॥
कन्यादानविधानेन कृतं वैभवपूर्वकम् ॥ धनं बहुतरं दत्तं संतुष्‍टो भूमिपस्तदा ॥५३॥
भटैर्गृहीतं यद्यच्च तत्तस्मै दत्तवानसौ ॥ मालवो बहुहर्षाद्वै सैनिकैःसह जग्मिवान् ॥५४॥
राजा
आणून सूर्यकेतूचे स्वाधीन केली. ॥५२॥
आणि आपल्या वैभवाप्रमाणे कन्यादानाचा समारंभ करुन पुष्कळ धनही दिले. तेव्हा सूर्यकेतू राजा अतिशय संतुष्‍ट झाला. ॥५३॥
योद्धयांनीही जे जे घेतले होते ते ते सर्व त्या सूर्यकेतु राजास त्या मालव राजाने दिले आणि मग तो मालव राजा मोठया आनंदाने सैन्यासुद्धा निघून गेला. ॥५४॥
त्या दिवसापासून तो सूर्यकेतू राजा, इष्‍ट फळ देणारे असे हे व्रत प्रतिमासीं (दर महिन्यास) करु लागला. ॥५५॥
तद्दिनमारभ्य मासि मासि व्रतं सदा ॥ कृतवान्भक्तिभावेन सत्याम्बाऽभीष्‍टदा यतः ॥५५॥
अतः सर्वप्रयत्‍नेन एकत्कार्य हि सर्वदा ॥ एतस्य करणादुःखहानिः सौख्यं प्रजायते ॥५६॥
म्हणून हे व्रत मोठे श्रम पडले तरी नेहमी करीत जावे. यामुळे दुःख नाहीसे होऊन सुख प्राप्‍त होते ॥५६॥
॥इति श्रीभविष्योत्तरपुराणे शिवषण्मुखसंवादे श्रीसत्यांबाव्रतकथायां तृतीयो‍ऽध्यायः ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP