सत्याम्बा व्रतकथा - अध्याय दुसरा

श्रीसत्याम्बा म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून जगन्माता दुर्गा किंवा जगदम्बाच होय.


अध्याय दुसरा

सूत म्हणतात, 'हे ब्राह्मणांनो पूर्वी हे सत्यांबाव्रत कोणी कसे केले हे सर्व मी सांगतो, तुम्ही भक्‍तियुक्‍त अंतःकरणाने ते ऐका ॥१॥
पूर्वी कांचीपुरातील एक अगदी गरीब व भुकेने पीडलेला असा ब्राह्मण नित्य पृथ्वीवर (भिक्षेकरिता) फिरत असे. ॥२॥
सूत उवाच । एतद्‌व्रतं तु सत्यायाः पुरा येन कृतं द्विजाः । तत्सर्वं कथयिष्यामि शृणुध्वं भक्‍तिमानसाः ॥१॥
पुरा काञ्ची पुरे विप्रो निर्धनः क्षुत्प्रपीडितः । अहन्यहनि दीनोऽसौ पृथिव्यां संचचार ह ॥२॥
स एकदा बहिर्यातो भिक्षार्थं चाभ्रमन्महीम् ॥ प्रातरारभ्य माध्यान्हं यावत्प्राप्त न किञ्चन ॥३॥
तदा खिन्नमना भूत्वाऽऽगतः स्वसदनं प्रति ॥ तत्पत्‍न्या दृष्‍टिमात्रेण धिक्कृतो दूरतस्तथा ॥४॥
एकदा तो घराबाहेर पडून भिक्षेकरिता पृथ्वीवर फिरु लागला. सकाळपासून मध्यान्हापर्यंत फिरला तरी त्यास काही मिळाले नाही. ॥३॥
त्यामुळे तो खिन्न होऊन परत आपल्या घरी आला तेव्हा त्याच्या पत्‍नीने दुरुनच धिक्कारयुक्‍त मुद्रेने त्याजकडे पाहिले ॥४॥
आणि म्हणाली 'अरे मूर्खा, आज संक्रांतीचा दिवस आहे हे तुला माहित नाही काय ? मी काय करावे ? असले सौभाग्य नसले तरी चालेल ॥५॥
माझ्या बापाने जातक वगैरे चांगले विधिपूर्वक पाहिले नाही ! जा, जा ! पुन्हा
न ज्ञातं रे त्वया मूढ चाद्य संक्रमणं दिनम्‌ ॥ मया किं नु प्रकर्तव्यं सौभाग्यं मास्तु सर्वथा ॥५॥
मत्पिता जातकं स्पष्‍टं न दृष्‍टं विधिपूर्वकम्‌ ॥ गच्छ गच्छ किमायासि निर्लज्जोऽसि पुनः पुनः ॥६॥
यत्र ते प्राप्यते चान्नं तत्र याहि सुखेन वै ॥ तस्या वाक्येन विप्रोऽसौ निरगच्छद् गृहाद्वहिः ॥७॥
ग्रामाद्योजनमात्रं तु गतो दैवबलेन सः ॥ तत्रैकां वापिका द्दष्‍ट्वा विचारं कृतवांस्तदा ॥८॥
पुन्हा निर्लज्जासारखा कशाला येतोस ? ॥६॥
जिकडे तुला अन्न (भिक्षा) मिळेल तिकडे तू खुशाल जा.' असे तिचे भाषण ऐकून तो ब्राह्मण घराबाहेर पडला ॥७॥
गावापासून चार कोस तो गेला. तिथे एक विहीर पाहून (तेथे) तो विचार करु लागला की, ॥८॥
ही विहीर फार मोठी आहे व हिच्यात पाणीही खूप आहे. तर आपण प्रयत्‍न करुन हिच्यांत खरोखर जीव द्यावा ॥९॥
मी जिवंत राहून काय उपयोग अथवा फायदा आहे ? स्वतःच्या स्त्रीने देखील धिक्कार केला, त्या अर्थी मी आता जीव देतो. ॥१०॥
असा निश्चय करुन त्या ब्राह्मणाने
इयं वापी विशालाऽस्ति उदकं वर्तते बहु ॥ तस्मात्सर्वप्रयत्‍नेन प्राणांस्त्यक्ष्यामि निश्चितम् ॥९॥
कोऽर्थो म जीवितेनाद्य को लाभो जीवितेन मे ॥ स्वपत्‍न्या धिक्कृतो यस्मात्तस्मात्प्रणांस्त्यजाम्यहम् ॥१०॥
इति निश्र्ययमापन्नो महान्तमुपलं द्विजः ॥ तदा कटयांस्ववस्त्रेण बद्धा हस्तेन चौद्यतः ॥११॥
वाप्यां तु पतमानं तं सत्या तत्पार्श्वगाऽब्रवीत् ॥ रे वत्स किं करोषि त्वं किमर्थं दुःखितो
मोठया प्रयत्‍नाने एक मोठा दगड आणून तो वस्त्रात बांधून ते वस्त्र आपल्या कमरेस बांधिले ॥११॥
तो उडी टाकणार इतक्यात त्याच्या मागे श्रीसत्यांबा देवी येऊन म्हणाली, 'अरे मुला, तू हे काय करितोस ? तू का दुःखित झालास ? ॥१२॥
दुःखाचा नाश होण्यास उपाय आहे ( तेव्हा) विचार करुन धैर्य धर." असे आपल्या पाठीमागे झालेले भाषण ऐकून तो मागे पाहू लागला. ॥१३॥
पूर्ण विद्युल्लतेप्रमाणे दैदीप्यमान व श्यामवर्ण, वस्त्र व अलंकार हयांनी युक्‍त अशी देवी पाहून तो अगदी आश्चर्यचकित झाला. ॥१४॥
आणि म्हणाला- हे महामाये, योग्यांच्या अधिदेवते, देवी, तुला नमस्कार असो. तू सर्व काही जाणत
भवान् ॥१२॥
दुःखनाश उपायोऽस्ति धैर्यं कुरु विचारतः ॥ पृष्‍ठदेशे तदा वाक्यं श्रुत्वा पश्चाद्ददर्श सः ॥१३॥
यथा विद्युल्लता पूर्णा देवी श्यामाऽतिसुन्दरा ॥ वस्त्राभरणंसंयुक्‍तां तां दृष्‍ट्वाऽश्चर्यमाप्तवान् ॥१४॥
नमो देवि महामाये लते योगिन्यधीश्वरि ॥ मातस्त्वं सर्व हि वदोपायं विनिश्चितम् ॥१५॥
देव्युवाच ॥ कौण्डिन्य शृणु मे वाक्यं व्रतं चर यथाविधि ॥ सत्याराथनमात्रेण फलं स्याद् भुवि
आहेस तर मला निश्चित असा उपाय सांग. ॥१५॥
देवी म्हणाली, 'माझे भाषण ऐक व त्याप्रमाणे यथाविधि व्रत कर. सत्येचे आराधन केले असता पृथ्वीवर दुर्लभ असे फळ तुला मिळेल. ॥१६॥
आणि तुझे दुःख तत्काळ नाहीसे होईल. व पुत्र, नातु, धन इत्यादि प्राप्त होईल. कौंडिन्य म्हणाला, 'हे व्रत जर फलदायक आहे तर त्याचा निश्चित विधि सांगा.' ॥१७॥
त्याचे भाषण ऐकून मोठया आनंदाने देवीने त्यास विधि सांगितला व त्याच्याकडे कृपादृष्‍टीने पाहून नंतर ती गुप्त झाली ॥१८॥
त्यानें चोहोकडे नजर फेकली. त्यास (कोणी न दिसल्याने)
दुर्लभम् ॥१६॥
सद्यो दुःखस्य हानिः स्यात्पुत्रपौत्रधनादिकम् ॥ कौण्डिन्य उवाच ॥ फलदं चास्ति चेत्तर्हि विधिं वद सुनिश्चितम्‌ ॥१७॥
तद्वाक्यश्रवणाल्हादा विधिं चोक्‍त्वाऽतिसत्वरम् ॥ कृपादृष्‍टयाऽवलोक्यार्थ तत्रैवान्तरधीयत ॥१८॥
तदा स दृष्‍टिमात्रेण सर्वतश्चावलोकयत् ॥ तदा विनिश्चितं तेन देवीयमवदत्स्वयम् ॥१९॥
अतो व्रतं करिष्यामि दुःखनाशो भवेद् घ्‍रुवम् ॥ इति कृत्वा मतिं तत्र तदा स
वाटेल की, श्रीदेवीच हे इतके स्वतः बोलली. ॥१९॥
म्हणून मी आता हे व्रत करीन; म्हणजे खात्रीने माझे दुःख नाहीसे होईल. असा विचार करुन तो घराकडे परत जाण्यास निघाला ॥२०॥
नंतर तो ब्राह्मण गावातील धनिक लोकांच्या वस्तीच्या मार्गातून जाऊ लागला. तेव्हा दैवयोगाने त्यास पुष्कळ धन मिळाले. ॥२१॥
त्या पैशातून सर्व प्रकारचे सामान यत्‍नानें आणून मोठया हर्षाने तो आपल्या घराकडे आला. ॥२२॥
(तेव्हा) त्याच्या स्त्रीने मोठया आनंदाने
गतावान्गृहम् ॥२०॥
तदा ग्रामे प्रवेशं नु धनिवीथ्यां द्विजोऽकरोत् ॥ तदा दैवबलेनासो प्राप्तवान्विपुलं धनम् ॥२१॥
द्रव्यव्ययेन सम्भारं सर्वं संपाद्य यत्‍नतः ॥ स्वगृहे गमनं हर्षाद्विप्रोऽसौ कृतवांस्तदा ॥२२॥
तत्पत्‍न्या बहुहर्षाद्वै भारो नीतस्तदा गृहे ॥ सर्वं धनेन साध्यं स्यान्मृतस्तु धनहीनकः ॥२३॥
विचारमेवं कृत्वा स पत्‍न्यै वसनमब्रवीत् ॥ हे पत्‍नि शृणु मद्वाक्यं व्रतं कुर्वे त्वया सह ॥२४॥
ते ओझे तेव्हा घरांत नेलें. 'सर्व कांही पैशानें साध्य आहे; धनहीन हा मेलेलाच समजावा' ॥२३॥
असा विचार करुन तो स्त्रीस म्हणाला, 'अग ऐक. आज मी व तू मिळून एक व्रत करु' (असे म्हणून) ॥२४॥
त्याने धर्मवृद्धि करणारे हे सत्यांबाव्रत लगेचच आरंभिले आणि त्याने पत्‍नीस आज्ञा करुन ते चांगल्या रीतीने शेवटास नेले. ते असे :-
त्या स्त्रीने सौभाग्यवायने देऊन उत्तम प्रकारचा स्वयंपाक केला आणि मग त्याने ब्राह्मण व आप्तजन यासह व्रतास आरंभ केला. ॥२६॥
व आणलेल्या सामानाने तो पत्‍नीसह पूजा करिता झाला; नंतर कथा श्रवण करुन सर्वांनी उपाध्यायाची पूजा केली. ॥२७॥
सत्यांबाय व्रतं शीघ्‍रमाचरद्धर्मवर्द्धकम् ॥ आज्ञापिता तदा पत्‍नी सा व्रतं समपादयत ॥२५॥
सौभाग्यवायनं दत्त्वा स्वादु पाकं चकार सा ॥ ब्राह्मणैर्बन्धुवर्गैश्च व्रतारंम्भं द्विजोऽकरोत्॥२६॥
संभारेणैव तां पूजां कृतवान्भार्यया सह ॥ ततः श्रुत्वा कथां सर्वैः पुरोहितमपूजयत् ॥२७॥
तदाऽऽकाशादभूद्वाणी कल्याणं ते भविष्याति ॥ तदा प्रसादं सर्वेषामात्मने च स दत्तवान् ॥२८॥
तेव्हां आकाशवाणी झाली की, 'तुझे कल्याण होईल.' त्यानंतर सर्वांना प्रसाद देऊन त्याने स्वतःही तो ग्रहण केला. ॥२८॥
नंतर स्त्री व आप्तजन हयासह त्याने भोजन केले. या व्रताच्या प्रभावाने त्यास पुत्रपौत्रादिक सर्व प्राप्त झाले. ॥२९॥
हे सर्व त्यास प्रयत्‍नावाचून, सत्याम्बादेवीचे कृपेने प्राप्त झाले, सूत म्हणतात - ह्याप्रमाणे शंकराने षडाननास मोठया भक्तीने हे व्रत सांगितले ॥३०॥
आणि तेव्हापासून मनुष्यास सुख देणारे असे हे व्रत प्रगट झाले, आणि तेच मी तुम्हाला सांगितले. दुसरे काय
भोजनं तु तदा सर्वैः कृतवान् भार्यया सह ॥ तद्‌व्रतस्य प्रभावेण पुत्रादिकमवाप्तवान् ॥२९॥
सत्याम्बायाः प्रसादेन विना यत्‍नाद्‌द्विजोत्तमः ॥ सूत उवाच ॥ एतच्छिवेन पुत्राय व्रतमुक्तं सुभक्तितः ॥३०॥
तस्माच्च प्रकटं जातं सुखदं फलदं नृणाम् ॥ एतद्वः कथितं विप्राः किमन्यत्कथयामि वः ॥३१॥
तदापि षण्मुखेनैव कृतं प्राप्तं फलं बहु ॥ कथायाः श्रवणेनैव प्रसाद ग्रहणेन च ॥३२॥
सांगावे ? ॥३१॥
तेव्हा षण्मुखाने देखील ते व्रत केले व कथा श्रवण करुन प्रसाद घेतला त्यामुळे त्यास पुष्कळ फळ मिळाले ॥३२॥
व्रत करणार्‍यास फळ मिळते, हयात मुळीच संशय नाही; म्हणून भूलोकी फळ देणारे असे
व्रतकृत्फलमाप्नोति सत्यं सत्यं न संशयः ॥ अतो जनैः सदा कार्यं फलदं भुवि दुर्लभम् ॥३३॥
हे दुर्लभ व्रत लोकांनी नेहमी करावे ॥३३॥
॥इति श्रीभविष्योत्तरपुराणे शिवषण्मुखसंवादे सत्याम्बाव्रतकथायां द्वितीयोध्यायः ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP