॥ श्री जोगेश्वरी महात्म्य ॥
सांगते जोगेश्वरीचे महात्म्य महान । सकल सुखाचे निधान ।
करावे अनुदिन त्याचे पठन । एक चित्ते वा करावे श्रवण ॥४९॥
जो करील असे पठन । देईल माता एक दिन त्यास दर्शन ।
पुत्र पौत्र तेजस्वी संतान । न संपेल कधी त्याचे धन ॥५०॥
जोगेश्वरीची प्रतिमा ज्याचे घरी । धन्य धन्य तो प्राणी संसारी ।
तयाच्या पुण्या नाही सरी । मातेस करावे नमन ॥५१॥
रोज जो जोगेश्वरीस नमस्कारी । त्यासी देखोनी मृत्यू पळे दूरी ।
संकटे होती घाबरी । पाहूनि भक्तासी त्या ॥५२॥
जे जोगेश्वरी मातेस पूजीती । त्यांची राहे निर्मळ मती ।
लाभती त्यास सार्या शक्ति । सत्य हे जाणावे ॥५३॥
नित्य करावे जोगेश्वरी पूजन । होईल आयुष्य सुखी संपन्न ।
दर्शने वाटते धन्य धन्य । आयुष्याचे हो सार्थक ॥५४॥
जोगेश्वरीचा वाचती जे पाठ । सुखाने भर जीवन काठोकाठ ।
रोग, मृत्यु दाविती पाठ । त्या जीवास दुःख कुठले ? ॥५५॥
जे ऐकती जोगेश्वरीचे महिमान । त्यांचे पाशी सुखाचे अक्षयी निधान ।
संकटे होती हैराण । जोगेश्वरी माता महान ॥५६॥
जे जोगेश्वरीची करिती आरती । तया घरची न सरे संपत्ती ।
न ये त्यांचेवरी आपत्ती । महीमा असे मातेचा ॥५७॥
जे जोगेश्वरीस विनवीती । मनो भावे अति सेवा करिती ।
प्रतिमे जवळ बसोनि प्रार्थिती । ते प्रिय होती देवीस ॥५८॥
जे जोगेश्वरीची निंदा करिती । भ्रमिष्ट हो त्यांची जाणा मती ।
मृत्युस ते सवे बोलाविती । जाणा हे त्रिवार सत्य ॥५९॥
श्रध्दा ठेवूनि देवीवरी सत्य । जी जोगेश्वरीस भजते नित्य ।
तिचे होईल सुंदर, बुध्दिवान अपत्य । भाग्यवती ती खरी ॥६०॥
ज्या नारी जोगेश्वरी पूजन करिती । त्या सदा सौभाग्यवती होती ।
मिळे पुत्र, पौत्र संपत्ती । जोगेश्वरी दर्शने ॥६१॥
जी नारी भाव धरोनी प्रातःकाळी । जोगेश्वरीस वाहे फूल वा पाकळी ।
ती भाग्यवती हो आगळी । श्रध्दा ठेवा अंतरी ॥६२॥
ज्या जोगेश्वरी पूजा चुकती । पुढील जन्मी सौभाग्य न पावती ।
नर्काकडे जाई त्यांची गती । कटु सत्य हे जाणा ॥६३॥
भावे जोगेश्वरी प्रदक्षिणा करिती । ते देवीचे आवडते भक्त निश्चीती ।
निर्मल सदा राहे त्यांची मती । धन्य धन्य ते भक्त ॥६४॥
जोगेश्वरी पूजन ज्या नारी करिती । चिरंजीव तयांची हो संतती ।
अखंड सौभाग्य तयासी । सत्य हे जाणा ॥६५॥
जे करीती जोगेश्वरी भक्ती । तयासी नाही जन्म मरण अंती ।
राहती मातेच्या नित्य चरणी । चिरंजीव ते जाणावे ॥६६॥
जोगेश्वरी मंदिर माहेर । माऊली जोगेश्वरी थोर ।
सांभाळी मायेने हळुवार । महिमा तिचा महान ॥६७॥
जे प्राणी घालिती जोगेश्वरीस दंडवत । शांती नांदे त्यांचे सदैव घरात ।
श्रध्दा पाहिजे मात्र ह्रुदयात । ना संशय ठेवा मनी ॥६८॥
उणे बोले जो जोगेश्वरीस । त्याचा करी ती निर्वंश ।
नर्कात त्याचा असे प्रवेश । कठोर हे तत्व जाणा ॥६९॥
जोगेश्वरी नाव उच्चारीती निशीदिनी । त्यास मिळती सौख्य शांतीच्या खाणी ।
तारीते संकटातूनि जोगेश्वरी जननी । कृपाळू माता अशी ॥७०॥
स्त्री पुरुष दोघे जण । करिती जोगेश्वरीचे पूजन ।
त्यांचे जाई वांझ पण । हे जाणावे सत्य ॥७१॥
त्रैलोक्य असे जोगेश्वरीजवळ । तीर्थांचे पावन जळ सकळ ।
पूजा मातेस ठेऊनि मन निर्मळ । भाग्यासी नाही उणे ॥७२॥
जोगेश्वरी निर्गुण निराकार । तिला नसे आकार ।
पण जाहली साकार मंदिरी । भक्ता साठी पुण्यनगरी ॥७३॥
जैसी वैशाखात साऊली । तैसी असे जोगेश्वरी माऊली ।
उध्दरला तो प्राणी ज्यास पावली । सत्य हे जाणा ॥७४॥
कल्पतरुची छाया जोगेश्वरी । जाणते भक्ताची इच्छा अंतरी ।
जणू माता भेटे सासरी । प्रेम तसे तिचे ॥७५॥
स्मरण मातेचे सदा करावे । अखंड नाम जपत जावे ।
जोगेश्वरी स्मरणे पावावे । मनी समाधान ॥७६॥
सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंद रुप असता ।
जोगेश्वरी स्मरणा विण सर्वथा । भक्तानी राहूच नये ॥७७॥
संपत्ती अथवा येता विपत्ती । जैसी येईल काळगती ।
जोगेश्वरी नामस्मरणाची स्थिती । सांडूच नये कदापि ॥७८॥
वैभव सामर्थ्य आणि सत्ता । उत्कट भाग्य अति भोगिता ।
जोगेश्वरी नामे संकटे नासती । जोगेश्वरी नामे विघ्ने निवारती ।
महापापी उध्दरती । नामाचा महिमा असे मोठा ॥८०॥
सर्वास जोगेश्वरी नामाचा अधिकार । जोगेश्वरी नामी नाही लहान थोर ।
जोगेश्वरी नामे बहुत जनाचा उध्दार । जोगेश्वरी विना काही नाही ॥८१॥
जोगेश्वरी ही अक्षरे चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी ।
तो परम पावन संसारी । होऊनि इतराते तारी ॥८२॥
बाळपणी तरुणकाळी । कठीण काळी वृध्दापकाळी । सर्वकाळी अंतकाळी ।
नामस्मरण जोगेश्वरीचे असावे ॥८३॥
जोगेश्वरी नामे अनेक भक्त तरले । नाना अपघातापासून सुटले ।
संकटातून कित्येक वाचले । जोगेश्वरी नामे झाले पावन ॥८४॥
जोगेश्वरी मातेसी ओळखावे । जीवन सार्थकाचि करावे ।
दुःख दुसर्याचे जाणावे । परपीडेवर नसावे अंतःकरण ॥८५॥
असे ऐसे जोगेश्वरी महात्म्य महान । करी सावित्री समग्र ते निरुपण ।
म्हणे होते सार्थक पूर्ण जीवन । करिता श्रध्देने याचे पठण ॥८६॥
माता जोगेश्वरी असे थोर । सांभाळ करी तुमचा हळुवार ।
घ्या वसा तिचा तुम्ही वर्षभर । व्हाल दुःखातून अहो पार ॥८७॥
घेतला वसा टाकू नये । गर्व कोणता करु नये ।
चांगले कृत्य सोडू नये । सुख दुःख समान मानावे ॥८८॥
पहाटे करुनि स्नान, व्हावे पवित्र । पूजावी जोगेश्वरी समोर ठेऊनि चित्र ।
विसरावे सारे गात्र अन् गात्र । उपवास करावा दिनभरी ॥८९॥
वहावीत एक्याऐंशी फुले प्रतिमेवरी । "श्री जोगेश्वरी भगवती" मंत्र हा नवाक्षरी ।
म्हणूनि श्रध्देने स्मरावी जोगेश्वरी । पाठ वाचावा भाव ठेऊनि अंतरी ॥९०॥
व्रत हे श्रध्देने वर्षभरी करावे । उद्यापनी सवाष्णीस जेऊ घालावे ।
गरीबास यथाशक्ति दान वाटावे । बांगडया बारा अन् सवाष्णीस ॥९१॥
केल्याने हे जोगेश्वरी मातेचे व्रत । प्रसन्न होईल प्राचीन ग्रामदैवत ।
पूर्ण करील तुमचे सकल मनोरथ । बाधतील ना संकटे व्यथा ॥९२॥
ऐकूनि हे सर्व ऐश्वर्याने आचरिले व्रत । वर्षभरी करी सारे श्रध्देने नियमीत ।
तो काय घडला चमत्कार नाही सांगत असत्य । पति तिचा प्रकटला हो पुन्हा जिवंत ॥९३॥
वेड कन्येचे हळूहळू विरत जाई । आले परत परदेशातून पुत्र, जावई ।
न्हावू लागली ऐश्वर्या पुन्हा वैभवी । जोगेश्वरी मातेची होता कृपा तिचेवरी ॥९४॥
हा पाठ करिता श्रवण पठन । सकळ संकटे जाती निरसून ।
दुःख दारिद्रय अति भीषण । न ये कधी भक्तावरी ॥९५॥
करा जोगेश्वरी प्रतिमेस पूजन । नेईल माता भव सागर तरुन ।
आनंदाने बहरेल सारे जीवन । श्रध्दा पाहिजे मात्र अंतरी ॥९६॥
पूजा श्री जोगेश्वरी माता नित्य । नका होऊ कधी भय क्रान्त ।
सरेल जीवनातील भ्रान्त । भक्तांची कैवारी माता ॥९७॥
नका होऊ मनी हिंपूटी । घाला मातेच्या चरणास मिठी ॥
वाचविल तीच तुम्हास संकटी । आदि माया जोगेश्वरी ॥९८॥
जोगेश्वरी माता सौभाग्य दायिनी । वर दायिनी कनवाळू जननी ।
सामर्थ्य महान तिच्या असे स्तवनी । मुक्त व्हाल दुःखातूनि ॥९९॥
जोगेश्वरीने विश्व सारे कोंदले । मूल तत्व हे ज्यानी जाणिले ।
जीवन त्याना कळले । ब्रह्मांडाचे रहस्य उलगडले ॥१००॥
जीवन-वैभव सारे क्षण भंगुर । भासे सत्य, परि असे नश्वर ।
श्री जोगेश्वरीचा एकच आधार, तत्त्व हे ठसवा अंतरी ॥१०१॥