Home Dictionary Latest Desktop Q'n'A Terms Contact About बहिणाबाई चौधरी| देव अजब गारोडी - धरत्रीच्या कुशीमधीं बीय... बहिणाबाईंची गाणी बहिणाबाई अशिक्षीत असूनही त्यांच्या गाण्यांतून जीवनातील अनमोल तत्वज्ञान समजते Bahinabai has specifically acknowledged Tukaram as her Guru and that he initiated her has been clearly expressed in all her Abhangas. Tags : bahinabai chaudharisongsopandevगाणीबहिणाबाई चौधरीसोपानदेव देव अजब गारोडी धरत्रीच्या कुशीमधीं बीयबियानं निजलीं वर्हे पसरली माटी जशी शाल पांघरली बीय टरारे भुईत सर्वे कोंब आले वर्हे गह्यरलं शेत जसं आंगावरतीं शहारे ऊन वार्याशीं खेयतां एका एका कोंबांतून पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनीं जसे करती कारोन्या होऊं दे रे आबादानी दिसामासा व्हये वाढ रोप झाली आतां मोठी आला पिकाले बहार झाली शेतामधी दाटी कसे वार्यानं डोलती दाने आले गाडी गाडी दैव गेलं रे उघडी देव अजब गारोडी ! Translation - भाषांतर N/A References : N/A Last Updated : 2012-08-19T00:48:08.4200000