बारा राशी आणि बुध

कुंडलीतील बुध ग्रहाचा कोप शांत करण्यासाठी हे व्रत करतात. जीवनातील सर्व प्रकारचे वैभव आणि सुख-संपत्ती प्राप्त करण्यासाठी या व्रताची कथा ऐकून  विधिवत व्रत करावे.

बारा राशी आणि बुध

१. मेष.

२. वृषभ.

३. मिथुन.

४. कर्क.

५. सिंह.

६. कन्या

७. तूळ

८. वृश्चिक

९. धनू

१०. मकर

११. कुंभ आणि

१२. मीन अशा बारा राशी आहेत.

१) प्रथम म्हणजे तनुस्थानी

यात बुध ग्रह - ३, ६, ७ व ११ या राशींपैकी एखाद्या राशीत असेल तर ती व्यक्ती बुद्धिमान व बोलण्यात चतुर असते. आठव्या राशीत बुध असल्यास त्याला औषधाचे व रसायनाचे ज्ञान असते. मात्र शनीसह बुध असेल तर वाईट फळ मिळेल. यासाठी अगोदर स्थानांची नावे देतो; ती अशी -

१ - तनु,

२- धन

३- सहज

४ - सुख

५ - सुत विद्या

६ - रिपु (शत्रु)

७ - जाया

८ - मृत्यु

९ - भाग्य

१० - कर्म

११ - आय

१२ - व्यय.

२) द्वितीय म्हणजे धन व कुटुंब स्थान

यात बुध असल्यास वयाच्या ३२ व्या वर्षापासून भरभराट होते.

३) तृतीय म्हणजे सहजस्थान

यात बुध असल्यास बंधुभगिनी, पराक्रम, कर्तृत्व, दर्जा, प्रवास यांची स्थिती कळते. ही व्यक्ती आपले विचार दुसर्‍यास सांगत नाही. ४ व १२ या राशींत शनीसुद्धा बुध असल्यास ही व्यक्ती अस्थिर चित्ताची व भित्री असते.

४) चतुर्थ स्थान म्हणजेच सुखस्थान

यावरून माता, शेतीवाडी, घरदार यांचा विचार करतात. ३ व ६ या राशींत बुध असल्यास आयुष्याचा उत्तरार्ध सुखात जातो आणि अशा व्यक्तीची स्मरणशक्ती तीव्र असते.

५) पंचम म्हणजे सुत आणि विद्यास्थान

यात बुध असल्यास अशा व्यक्तीचे डोळे सुंदर असतात. ही व्यक्ती उपासना चांगली करते. मंत्रतंत्राची याला आवड असते. सरकारी नोकरी मिळते, असे फळ बुध देतो.

मात्र पंचमातील बुध शनीने युक्त असल्यास एकच संतती हयात राहते. पंचमातील बुध मातेचा नाश करतो.

६) सहावे स्थान म्हणजे रिपू किंवा शत्रुस्थान

यात बुध असल्यास नोकरीत त्रास होतो. पण लेखनकला व मुद्रणकला यांपासून त्याचा चांगला फायदा होतो.

७) सातवे स्थान म्हणजे जायास्थान

जायास्थान म्हणजे पत्‍नीचा विचार करण्याचे स्थान. कोर्ट-दरबाराचे स्थान. यातील बुध चांगली स्त्री मिळवून देतो. पण बुधाचा अस्त असल्यास लग्न उशिरा होते. कोणत्याही विषयावर हा मनुष्य लेख लिहू शकेल.

८) आठवे स्थान म्हणजे मृत्युस्थान

हे अचानक धनलाभाचे स्थान. याने भागीदारीत धंदा करू नये. बुध जर शत्रूराशीत असला तर त्या व्यक्तीचा अधःपात व स्त्रीच्या बाबतीत केलेल्या कृत्यामुळे वाईट कीर्ती होते.

९) नवम स्थान म्हणजेच भाग्य किंवा दैवस्थान

यात बुध असल्यास याची धार्मिक मते संस्कृतीचा आग्रह धरणारी असतात. पण हाच बुध पापग्रहाने युक्त असेल तर व्यक्ती नास्तिक बनते.

१०) दशम स्थान म्हणजे कर्मस्थान

यातील बुध शनीसंबंधित असल्यास ही व्यक्ती खोटे कागदपत्र तयार करते, लाच खाते.

११) एकादश स्थान म्हणजेच आयस्थान किंवा लाभस्थान

यात बुध असल्यास या व्यक्तीचा हेवा करणारे लोक फार असतात आणि यांचे मित्रही टिकून केलेल्या पत्रव्यवहारामुळे गैरसमज होतो.

१२) बारावे स्थान म्हणजे व्ययस्थान

खर्चाचे स्थान. यात बुध असल्यास या व्यक्तीबद्दल वाईट अफवा पसरतात. याची वर्तमानपत्रांतून निंदानालस्ती होते. दुसर्‍यांकडून वारंवार ही व्यक्ती फसते.

 

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP