श्रीदासबोध दशम १८: समास २ रा

श्रीदासबोध दशम १८: समास २ रा

नेणपणें जालें तें जालें । जालें तें होऊन गेलें ।

जाणतेंपणे वर्तलें । पाहिजे नेमस्त ॥१॥

जाणत्याची संगती धरावी । जाणत्याची सेवा करावी ।

जाणत्याची सद्‍बुद्धी घ्यावी । हळु हळु ॥२॥

जाणत्यापासी लेहो शिकावें । जाणत्यापाशी वाचू शिकावें ।

जाणत्यापासीं पुसावें । सकळ कांहीं ॥३॥

जाणत्यास करावा उपकार । जाणत्यास झिजवावें शरीर ।

जाणत्याचा पहावा विचार । कैसा आहे ॥४॥

जाणत्याचें संगतीनें भजावें । जानत्याचे संगतीनें झिंजावें ।

जाणत्याचा संगतीनें रिझावें । विवरविवरों ॥५॥

जाणत्यासी गावें गाणें । जाणत्यापासी वाजवणॆं ।

नाना आलाप शिकणॆं । जाणत्यापासी ॥६॥

जाणत्याचें कासेसी लागावें । जाणत्याचे औषध घ्यावें ।

जाणतां सांगेल तें करावें । औषध आधी ॥७॥

जाणत्यापासी परीक्षा सिकणे । जाणत्यापासी तालिम करणें ।

जाणत्यापासी पोहणें । अभ्यासावें ॥८॥

जाणता बोलेल तैसें बोलावें । जाणता सांगेल तैसे चालावें ।

जाणत्याचें ध्यान घ्यावें । नान प्रकारीं ॥९॥

जाणत्याच्या कथा सिकव्या । जाणत्याच्या युक्ति समजाव्या ।

जाणत्याच्या गोष्टी विवराव्या । सकळ कांहीं ॥१०॥

जाणत्याचें पेंच जाणावे । जाणत्याचें पीळ उकलावे ।

जाणता राखेल तैसे राखावे । लोक राजी ॥११॥

जाणत्यांचे जाणावे प्रसंगी । जानत्याचें घ्यावे रंग ।

जाणत्याचें स्फूर्तीचे तरंग । अभ्यासावे ॥१२॥

जाणत्याचा साक्षेप घ्यावा । जाणत्याचा तर्क जाणावा।

जाणत्याचा उल्लेख समजावा । न बोलतांचि ॥१३॥

जाणत्याचें धूर्तपण । जाणत्याचें राजकारण ।

जाणत्याचें निरुपण । ऎकत जावें ॥१४॥

जाणत्याची कवित्वें सिकवी । गद्यें पद्ये ओळखावी ।

माधुर्यवचने समजावी । अंतर्यामीं ॥१५॥

जाणत्याचें पहावे प्रबंद । जाणत्याचे वचन भेद ।

जाणत्याचे नाना संवाद । बरे शोधवे ॥१६॥

जाणत्याची तीक्षणता । जाणत्याची सहिष्णुता ।

जाणत्याची उदारता । समजोन घ्यावी ॥१७॥

जाणत्याची नाना कल्पना । जाणत्याची दीर्घ सुचना ।

जाणत्याची विवंचना । समजोन घ्यावी ॥१८॥

जाणत्याचा काळ सार्थक । जाणत्याचा अध्यात्मविवेक ।

जाणत्याचें गुण अनेक । आघवे च घ्यावें ॥१९॥

जाणत्याचा भक्तिमार्ग । जानत्याचा वैराग्य योग ।

जाणत्याचा अवघ्या प्रसंग । समजोन घ्यावा ॥२०॥

जाणत्याचें पहावें ज्ञान । जानत्याचें सिकवें ध्यान ।

जाणत्याचे सूक्ष्म चिन्ह । समजोन घ्यावे ॥२१॥

जाणत्याचें अलिप्तपण । जाणत्याचें विदेह लक्षण ।

जाणत्याचें ब्रह्म विवरण । समजोन घ्यावें ॥२२॥

जाणता एक अंतरात्मा । त्याचा काय सांगावा महिमा ।

विद्याकला गुणसीमा । कोणें करावी ॥२३॥

परमेश्‍वराचे गुणानुवाद । अखंड करावा संवाद ।

तेणें करितां आनंद । उदंड होतो ॥२४॥

परमेश्‍वराचे निर्मिलें तें । अखंड दॄष्टीस पडसें ।

विवरविवरों समजावें तें । विवेक जनीं ॥२५॥

जितुकें कांही निर्माण जालें । तितुके जगदेश्र्वरें निर्मिलें ।

निर्माळ वेगळें केलें । पाहिजे आधी ॥२६॥

जो निर्माळ करितो जना । परि पाहों जातां दिसेना ।

विवेक बळें अनुमाना । आणीत जावा ॥२७॥

त्याचें अखंड लागतां ध्यान । कृपाळुपणें देतो आशन ।

सर्वकाळ संभाषण । तदांशेंचि करावे ॥२८॥

ध्यान धरीना तो अभक्त । ध्यान धरील तो भक्त ।

संसारापासुनी मुक्ता । भक्तांस करी ॥२९॥

उपासनेचे शेवटी । देवा भक्ता अखंड भेटी ।

अनुभवी जाणॆल गोष्टी । प्रत्ययाची ॥३०॥

॥ इति श्रीदासबोध गुरुशिष्यसंवादे सर्वज्ञसंगानिरुपण नाम ॥

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP