संत तुकडोजी श्लोक

जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते .



या वाचुनी नच मार्ग दुसरा, आजच्या काळी दिसे।
ही प्रार्थना देवादिकी, श्रीविष्णुसी केली असे॥
प्रत्येक जीवा दुःख हे आता नको जगपावन।
उठ आर्यपुत्रा! झडकरी, कर सामुदायिक प्रार्थना ॥


जव राक्षसी वृत्ती बळावे गर्जूनी भूमिवरी |
तव दे निसर्गा चलना त्या दैवीशक्ति श्रीहरि ||
तुकड्या म्हणे परिवर्तना गुरुदेव तैसा जाहला |
गुरुदेव सेवामंडळा हा जन्म भारती लाभला ||

किती पंथ झाले भिन्नसे, अणि राष्ट्रही झाले तसे।
हे धर्म झाले भिन्नसे, जरि तत्त्व गमती एकसे ॥
शेजार धर्महि संपला, आता तरी धरि सोय ना।
उठ आर्य पुत्र झडकरी कर सामुदायिक प्रार्थना

मी सांगतो गुज आपुले, भजने तुम्ही बहु ऐकिली |
सत्कार्य प्रभुचे घ्या करी, जी वेळ आता पातली ||
विश्वस्थ माझ्या बंधुनो! करितो तुम्हा प्रस्तावना |
उठ आर्यपुत्रा ! झडकरी, कर सामुदायिक प्रार्थना ||

शिरी घाली भगवी टोपी आणि हो सज्ज धर्मालागोनी |
 ही त्याग कांबळ खांदी  घे, जाई प्रचारासी झणी ||
हा पाठ सक्रिय साजिरा, संबोधुनी शिकवी जना |
उपकार सेवा साधण्या कर सामुदायिक प्रार्थना ||

देवादिदेवहि मानती अवतार गुरुसी पूजती |
 पंथादि अणि धर्मादिही गुरुदेव हा सन्मानिती |
नच व्यक्ति, श्रीगुरुशक्ति ही गुरुदेवमंडळ स्थापना |
उठ आर्वपुत्रा ! झडकरी, कर सामुदायिक प्रार्थना ।

एकांगि वाहति पंथ हे किति संप्रदायहि भारती ।
हे सकल देवा वर्णीती परि एक ना यांची मती ॥
हे वर्म घेऊनीया करी सर्वास सुख द्याया भला ।
गुरुदेव  सेवा मंडळ हा जन्म भारती लाभला ॥

संशोधुनी, पंथासही, वा योजने संबोधिले ।
कोणी समन्वय घेईना , भिन्नत्व जेणे पावले ॥।
म्हणुनीच सर्वां घेउनी हा मार्ग निर्मळ साधला ।
गुरुदेव सेवामंडळा हा जन्म भारति लाभला ||

गुरुदेव नानक संत हे संबोधिती त्या काळला
केला त्यांनी यत्न हा, तो ग्रंथ-साहब वाढला ॥
गमली तशी वेळा अता ही स्फूर्ति स्फुरण्या आजला ।
गुरुदेव सेवामंडळा हा जन्म भारति लाभला ||
१०
जव राक्षसी वृत्ती बळावे गर्जूनी भूमिवरी |
तव दे निसर्गा चलना त्या दैवीशक्ति श्रीहरि ||
तुकड्या म्हणे परिवर्तना गुरुदेव तैसा जाहला |
गुरुदेव सेवामंडळा हा जन्म भारती लाभला ||
११
या प्रार्थनेच्या मंदिरातूनी येत वायु मंदसा |
वाटे फूलाया नवकळ्या तो डोलवी त्या मधुरसा ||
त्या विकसता जणू बोलती – गुरुदेव हृदयी जावुया |
गुरुदेव सेवामंडळा दे जन्म भारत भूमि या ||
१२
हृदयावरी ती मालिका जणु वैजयंती शोभली |
अजी भाग्य आले शिखरी या पुष्पेही बोलू लागली ||
जरी राहिलो हृदयीं शोभुया, पडलो तरी चरणीच या |
साधेल पुजा दोहीची वा धन्य! म्हणतील कोणी या ||

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP