पद ३६ वें
तें रुप पहावें गे बाई पहावें गे । तरीच जन्मा यावेंगे ॥धृ०
चिंतिति हरिहरतें रुप नारद । अलक्ष अगोचर ।
तेथे मन हे न्यावेगें बाई न्यावेंगे । ते रुप प० ॥१॥
उलट पलट करी त्रिकुट शिखरपर । अमृत झरझर वाहे निरंतर ॥
योगबळानें प्यावेंगे बाई प्यावेंगे । तरीच जन्मा यावे० ॥२॥
झांझाझंगाट वाजे अवघड । नाद भडाभड होती कडाकड ॥
अनुहत त्याचें बाई नांवगे बाई नावगे । तरीच जन्मा यावे० ॥३॥
निजानंदे आनंदे । नारायणें श्रीरंगुनी जावेंगे । तरीच जन्मा यावें०
ते रुप पहावेंगे बाई० ॥४॥

पद ३७ वें
आम्हीनमुं त्याला त्या बा नमुं त्याला । उपाधि नाहीं । ज्याला । धृ० ।
संशय उरला नाहीं । अवघा ब्रह्मचि झाला पाहीं ।  आम्ही नमुं त्याला बा न० ॥१॥
स्वयंभु मुळीचा आहे । द्वैतपणासी गिळूनि राही । आम्ही न० ॥२॥
समूळ अवघे हरिले । सगुण जयासि कळलें । आम्ही न० ॥३॥
रंगनाथ गुरु पाहे । त्याचा अनुभव दुसरा नोहे । आम्ही नमुं त्याला० ॥४॥

पद ३८ वें
म्हणुनि हरि भजिजे हरि भजिजे । पदोपदी शिव स्मरिजे ॥धृ०
दाटत कंप कफानें । नाना देहीं उठति तुफानें । म्हणोनि हरि० ॥१॥
आंगडी पडशी शालदुशाला । अंति लेता होय कशाला । म्हणोनि० ॥२॥
कंठीं कुडक्या मुद्या । आवधीं संपत्ती जाइल उद्यां । म्हणोनि० ॥३॥
जेव्हां देहासि लागेल उचकी । तेव्हां स्त्रीसुत पैसे उचकी । म्हणोनि० ॥४॥
अमृत अनुभवी भरला । म्हणवुनियां चरणीं जडला । म्हणोनि० ॥५॥

पद ३९ वें
श्रीहरिचे उपकार । आठवूं किती श्रीहरिचे उपकार ॥धृ०
भक्त मनोरथ पूर्ण कराया । रुप घरी साकार । आठवूं० ॥१॥
अघटित घडवूनी आत्मत्वाचा । देत असे साकार । आठवूं० ॥२॥
अमृत म्हणे घ्या नाम तयाचें । होईल जयजयकार । आठवूं० ॥३॥

पद ४० वें
डोळा उघडेना । उघडेना । पश्चाताप घडेना ॥धृ०
अहंममता करणें । नाना योनीं जन्मुनि मारणे । डोळा० ॥१॥
चिदचिद्‍ग्रंथि सुटेना । क्षणभर विषयीं चित्त विटेना । डोळा० ॥२॥
निजानंदी रंगेना । निश्चळ निर्मळ भवभंगेना । डोळा० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP