पद २६ वें
राईएवढें पांखरुं । दादा त्रिभुवनी त्याचा थारा । धृ० ।
नर आणि नारी त्याबा । पांखराचा चारा । पिंडी आणि ब्रह्मांडी ॥
त्याचा अनुभव तुम्ही करा । त्याचा अनुभव घेतां चुकेल चौर्‍याशींचा फेरा ॥
राईएवढें० ॥१॥
एकवीस स्वर्गावरती त्याबा । पांखरांची उंची । डोळ्यांतील बाहुली त्याबा ॥
पांखराची नीची । सप्त हे सागर । पाखरूं घेऊन गेलें चोंची । राई० ॥२॥
पिंड आणि ब्रह्मांड । मच्छिंद्रनाथाने दाविलें । त्याच्या अनुग्रहें गोरक्षानें ओळखिलें ॥
तयाच्या प्रसादें नाम्याशिष्याने गाईलें । राईएवढें पांखरुं । दा० ॥३॥

पद २७ वें
माझें नवलाचें पांखरुं । कसें मी मारुं । धृ ॥
एका सकाळचे प्रहरी पांखरुं आलें माझें दारी ॥
पांच रंग आंगावरी । चला सई धरु ।  १ ॥
पांखरुं रतीहून लहान । उडतां गर्जे त्रिभुवन ।
त्याची कैचें जन्ममरण । धरावा धीरुं ।  २ ॥
अपार रंग त्या पांखराचे । मजला देणें सद्गुरुचें ॥
गोपाळनाथ पूर्ण कृपेचें । फळलें तारु ॥
माझें नवलाचे पांखरु । कसे मी मारुं ॥३॥

पद २८ वें
गांवावरी एक बाभळ । खाली शेंडा वरती मूळ ॥
खाली कळस वर देऊळ । गत आहे न्यारी ॥१॥
तमाशा संताघरीं निर्गुणपुरीं । धृ० ।
फुलाआधीं गुंफिला तुरा । याचा अर्थ करीं चतुरा ॥
कोण सद्गुरुघरचा पुरा । असेल चतुरा ।
खोविल शिरीं । तमाशा संताघरी ॥२॥
घोडा रोंवून बांधिला खुंट । नगार्‍यावर चढविला उंट ॥
कोण सद्गुरुचा पुतळा असेल बळीवंत । अर्थ विचारीं ॥
तमाशा संताघरी ॥३॥
दिवा वार्‍य़ा घालितसे शेव । ह्याचा घ्याहो तुम्ही अनुभव ।
तुका वैकुंठी राव । गत आहे न्यारी ।
तमाशा सं० ॥४॥

पद २९ वें
है कोय ऐसा मुरशद मौला । घरमें खुदा बतावेगा । है को० ॥धृ०
पंचतनके दरगा भीतर । दिलत कथा बिछावेगा ।
मनमुकामे मुजे बिठाकर । बिस्मिला कलमा पढावेगा । है को० ॥१॥
अरषकुरषदीधारजो । राम रहिममें दिखावेगा ।
चवदा तबकके अंदर सुलाके, मेरे तय झुल झुलावेगा । है० ॥
बवन दरफके मायनें बताके । भेदभरमकुं मिटावेगा ।
उसके अंतर मुझ लेजाके, किताब के बनाय शिकावेगा । है० ॥३॥
कहे कमाल कबीरका बालक । मनकिताब सुनावेगा ॥
मेरा चेरा मुझे बताके, नूरनबी मिलावेगा । है० कोय० ॥४॥

पद ३० वें
सांग बा मारुती । कीं मजला कधिं भेटेल रघुपती । कीं मजला० ॥धृ०
साधुसि छळिलें मज फळ आलें । बनीं राक्षस गर्जती । कीं म० ॥१॥
बिनअपराधी वचनिं निरंतर । छळिला उर्मिलापती । कीं० म० ॥२॥
एकाजनार्दनीं आश्रय तुमचा । दे साधुसंगती । कीं म० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP