सद्गुरु करा पुरा ब्रह्म माधुनियां घ्यावे संन्यास । नका भटकत फिरुं बाहेर ज्याच्या त्याच्यापासी ब्रह्म असे ॥ध्रृ०॥
एकवीस स्वर्गी कडासन घाला विवेक पादुका निजध्यास । विश्वविभूती नऊ द्वार सयली दशवे द्वारी टाळी सरस ॥
पंचतत्त्वांची झोळी कुंडली चित्त टोपीला लक्ष घोंस । अनुहात सिंगी नाद ध्वनी ज्ञान तुवां वैराग्य भासे ॥१॥
नाम रुद्राक्षें मन चिमटा भक्ति कफनी घालून अंगास । निर्गुण गंगा अनुभवपंथ प्रेम समाधानि चित्तास ।
वैराग्य शंख सोहं शब्द नादध्वनी गर्जली कैलास । इडा पिंगळा सुषुम्ना समाधि मंत्र बोला ब्रह्मघोष ॥२॥
छत्तीस गुण आसन घालून कोंडून धरा दश इंद्रियांस । अठरा अक्षरी मंत्र जपून सात वेळां करा घोष ॥
अलक्ष्य मुद्रा लावून बसा आत्मा न्यावा कैलासास । शुषुम्नांत पवन खेळेल मुरेल दशवे द्वारांत ॥३॥
सत्रावींचे जीवन प्यावे अमर करावें जीवास । परब्रह्मासी जाऊन मिळावें मग काळाचा होय नाश ॥
अशा रीतिचा संन्यास घ्याल मग जाल शिवपदास । गुरु भीमराज कवि गणपति भजे सवतळ राजास ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP