सुरज्ञान ज्योतिष सांगतो विजेचा पवन । जो असेल चतुर ज्ञानी जाणेल खूण ॥धृ०
इडा पिंगळा सुषुम्ना मुखी नाड्या या तीन । सोळा मात्रा ब्रह्मांडी अवघा खेळ त्यापासून ॥
पंचतत्त्वें भाक सांगती वायुरुपाने । दहावे द्वारी निरंजन करिती नाडी गमन ।
चाल ॥
इडा वामअंगी दक्षिण सुरीं पिंगळाबाई । सुषुम्ना तत्समान चाले दो ठायीं ।
इडा नाडीमध्यें शुभ कर्म कां राही । मंत्र पिंगळेंत कुबुदीरीत करा लढाई ॥
सुषुम्नेंत भजावी स्वर आत्मबीज खूण । सहा चार आठजणींचे तोडा भांडण । सुर० ॥१॥
प्रत्येक नाडीमध्यें पंचतत्त्वें वाही । कोण तत्त्व कसें ओळखावें करा चतुराई ॥
चार आंगळे अग्नितत्त्व आकाश ते ठायीं । अष्ट आंगळें वायुतत्त्व चाले घाई घाई ॥
चाल ॥
बारा बोटें पृथ्वीचा धांवा घेतो पवन । आपतत्त्व सोळा बोटें घ्या समजून ॥
पांचांत शुभ अशुभ सत्य सांगेन । आकाश तेज वायु कठिण असे तीन ।
आपतत्त्व पृथ्वी शुभतत्त्व दोन । दत्ताची भाक यासि खोटें म्हणेल कोण । सुर० ॥२॥
उजवे सुरांत तत्त्वासि ग्रह ऐका कोण कोण । तेजा मंगळ ग्रह घे समजून ॥
वायूवरी राहू बैसे जाऊन । पृथ्वीचा रवी आपावर शनीचे स्थान ।
चाल ।
आता वाम सुराचे ग्रह ठेवा ध्यानांत । पृथ्वीचा चंद्र आपाचा बुड गुणवंत ॥
वायूचा बृहस्पति जाणती पंडित । अग्नीचा शुक्र ग्रह शुभ सर्वांत ॥
अशा रीती सुरांत ग्रह करावी छान । गालव मुनी धरी दत्ताचे चरण । सुर० ॥३॥
शुभतत्त्व धरुन पुरुषाचा उजवा सुर घेई । स्त्रीया डावा असतां पुत्र होई ॥
अस्तुरीचा उजवा पुरुषाचा डावा वाही । तयापासुनि होणार कन्या खोटे नाही ॥
चाल ॥
भोगितां जन्मती हिजडे धरा ध्यानांत । अशी रीत निघे शिवेश्वरु दयीत सोरुदत्त ।
वडगांव आंबली ठिकाणा नगर जिल्ह्यांत । सावतळ प्रसन्न गुरु भीमराव सांगे खूण ॥
गणपत आत्मज्ञानीचा फटका रामबाण ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP