मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निराकारी व एकतारी भजनीपदे|आत्मज्ञानी पदे| पद ७ आत्मज्ञानी पदे गण १ ला गौळण पद १ पद २ पद ३ पद ४ पद ५ पद ६ पद ७ पद ८ पद ९ पद १० आत्मज्ञानी भजनी पदे - पद ७ महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे. Tags : bhajanekatarimarathipadएकतारीपदभजनमराठी पद ७ Translation - भाषांतर क्षणभंगुर संसार घडीची कायापुर वस्ती । नाम किराना अमोल्य वस्तु भरा महाग वस्ती ॥धृ०॥लक्ष चौर्यांयशी योनी हिंडत किती भटकत फिरसी । वृक्षांमाजी वीस लक्ष योनी ऊन वारा झुरशी ॥दहालक्ष पक्षी गिरीकंदरी चार सरसी । नवलक्ष जलचरें अकरा लक्ष कीटक धरिसी । तीन लक्ष अच्येस्थळी चार लक्ष मानव असती ॥१॥लक्ष चौर्यांयशी योनी हिंडता जीव पातकांत गरळ । दर योनी कोटी फेरी बसली मग जिवासी सरळ । म्हणून नाम किराना भरावा हा मार्ग सरळ । दिवस आहे तोंवर करा सौदा नका फोडु परळ । दिवस गेलेवर पडेल फांसा यमाची तस्ती ॥२॥ज्याचे त्याचेपाशी असून गवसेना ना कळता फसला । कां भटकत हिंडता बाहेर आंत उंदीर घुसला ॥ब्रह्म साधुनी परब्रह्म होणे आत्मबोध ठरला । गुरुवाचून कधि कळेना आत्मज्ञान भासला ॥काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकारास दे तस्ती ॥३॥सत्राचीवे जीवन घ्यावे उलटी वाहे भद्रा । परब्रह्म अविनाश दसवे द्वारी ओंकार बीज रुद्रा । व्यक्ता अव्यक्तासी भेटावे लावुनियां मुद्रा । रामनाम तारक मंत्र घे माम पदरा । गुरु भीमराव कवि गणपति खेळे आत्मज्ञानी कुस्ती ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP