ऋध्दिपुरवर्णन - प्रकरण ३६ ते ४१

महानुभाव पंथातील थोर संत नारायण व्यास बहाळिये यांनी ऋध्दिपुरवर्णन काव्याची रचना केली.


प्रकरण ३६ : आरोगणास्थान, ओव्या १५

चौकाचेनि बरवेपणें : दृष्टीसी मांडिले धरणें : उपवासू जाला मी म्हणें : यालागी ॥४९०॥
कीं राउळी आरोगण : पुर्वी चोकी वाढण : ते रंगमाळिका सूचिताये खूणा : वर्तमानी ॥४९१॥
कीं आरुवारें करें : वीचीत्रा धातुची सपूरें : वोडवीजति लीगभद्रें : नवीं नवीं ॥४९२॥
की आरोगीता परमानंदु : उलिंगीये लाहाति प्रसादु : तेणें सळें लींगभद्रां अस्वादु : उपजतु असे ॥४९३॥
रचीली चंद्रसूर्याची मंडळें : ठांइं ठांइं तारांगणें सोहोज्वळें : की भीतरि भरलेनि ब्रह्मगोळें : सेविजे आरोगणस्थान ॥४९४॥
भंवतए हांसळियाचें ठसे : नीळिमां नीर्वाळिले पूसे : सूरंगा चांचूचे ठकार कैसे : जैसे बोलती काइ ॥४९५॥
कीं मागां सूकाचां बोलीं : चरीत्रें रुपासि आलीं : तिये देखौनि चीत्रस्तीतें जालीं : तेथे बोल कैचे ॥४९६॥
उपमास्लेषवर्णकें : जरि गुंतला राहे चौके : तरि स्थानमहिमां टीके : वरि बैसवावा असे ॥४९७॥
जेथ नीरसां परगुणें : नीत्यतृप्ता आरोगणें : व्यापकीं बसणें : जीये स्थानी ॥४९८॥
जेथ नीर्वेवा मूख : आनंदासि भुक : आत्मरमणा कीं सूख : रससेवने ॥४९९॥
ईश्वरी स्वसूखा अनुभुती : रससेवना केउती : परि अन्न ब्रह्म हे सृती : बोलोनि गेली ॥५००॥
दंतोष्टसंपकी : न लगे रसनेची नखी: तीये ब्रह्मी नपूसकीं : देवासि आवडि कैसी ॥५०१॥
वसवित कपाटें : डोंगरा देईजेति झटे : परि या विवराचिये वाटे : जाणिवे रीगावा नाहीं ॥५०२॥
आसो हें ह्मणिजताये तें आन : देखौनि आरोगणस्थान : केलें साष्टांगीं नमन : भावें भरौनिया ॥५०३॥
म्हणे माझिया स्वामिचें : आरोगणस्थान श्रीप्रभूचें : सेवितां जीवू मूचे : रांकडेपणे ॥५०४॥

प्रकरण ३७ : भोजनपक्वान्न वर्णन, ओव्या ३९

सोरठां उर्णपटीं : पूढां मांचळी चौपटी : वरि प्रतेष्टीलां ताटीं : वोगरिति नाना रसू ॥५०५॥
देवा करितां आरोगण : काइ पूर्णचंद्रें लाधले खण : तैसे ताटाचे चोखाळपण : विस्मीत देखा ॥५०६॥
सपूरे सोजिएचें चोखट : फेडुनि सदळ कांठ : तें कनकवर्ण वेंठ : वाढिजति मांडयाचे ॥५०७॥
नीजकींकराचिये भुके : जें वंचिलें वंचके : तें पक्वान पोळी भणौनि जवळीके : करुं नये ॥५०८॥
दोहीं मुनैसरिसे सतार : जैसें अमृताचे अंकूर : तेवि मध्यें राजान्नाचे वोगर : वोगरीजती ॥५०९॥
परहातें स्थापीला : सोष्णू न र्‍हाये दाटिला : आंगे घेतु असे उफाळा : सीगेवरी ॥५१०॥
आकृती आणि परिमळें : जीतीले मोगरयाचे कळे : भक्तुचि परि राऊळें : सेविजतु आहे ॥५११॥
पुर्णचंद्राचेनि पाडें : वाढिजति सीख्रणीचे वडे : रुची छीद्रांचे परि आवडे : सर्वज्ञासी ॥५१२॥
दृष्टि चंचळ परि एकसरें : जयामाजि वावरे : बरवा गुंतली की न मोहरे : कांहीं केलिई ॥५१३॥
मीटमीट स्वर्ग देवां : पाताळीं पीउषाचा ठेवा : तळौनि काढीला हावां आमृतरुप ॥५१४॥
मोकळी मोतियें जाति पसरीं : भणौनि पाइसें आळिलीया सरळवेयाचिया खीरी : वरि पंचाधारगोरी : आळंगी चोखाळपणें ॥५१५॥
द्वीपपंक्तीची रचना : हारा हांसे रसना : तुम्हां उभयेता लाग लागों दे ना : सेवितां मीं ॥५१६॥
पूर्णचंद्राचां आनुकारीं : चोखाळपणें भजीजे इडरीं : परि तेया कळकू अंतरी : या नीष्कळंका ॥५१७॥
सूप्रभा स्नेहवसें : भीतरि पूर्णत्व असे : वाढितां उदंबर सरिसे : पुरिकांसी ॥५१८॥
कीं ब्रह्यण्य देवापुढें : ब्रह्मपुरीसी मांडे : कीं कवंच लेइली कोडें : मीसें पुरिकांचेनि ॥५१९॥
कापुरगोरी चोखट : छीद्रांची परि नव्हे चविनट : त्रीएंच नामधारी बरवंट : ब्रह्मपूरीसीं ॥५२०॥
गोक्षीरधामधवळें : भीतरु भरला साकरा गुळें : की देवाचीये सन्निधी आमृतफळें : पावतीं जालीं ॥५२१॥
ताट तेंचि गगन : वटका पूर्णचंद्राचें मान : भणौनि आमृतफळें तारांगणा : सारिखीं दीसती ॥५२२॥
नखिवे मालतीया सळिवें : इत्यादि वळिवट बरवें : ताटी वाढिति सदैवें : सेवकजनें ॥५२३॥
सोलिवां तीळाचे तीळोवें : गोडी मीसळौनि सेवे : ते मोदक आरोगितां देवें : गुळ थोडा म्हणिजे ॥५२४॥
बहुतां छीद्राचिया : की सरिया रुपयाचिया : त्या वाढिजति कूरवडीया : प्रपटेंसीं ॥५२५॥
स्यामें पीतवर्णे : वाणीयां जींतलें सोनें; भणौनि वालांची तुकें हीनें : तें तेथ बोलों न येती ॥५२६॥
जैसी माणुकुलीं पीळिलीं : तैसेयां गौघ्रुतां पात्रें पुरलीं : सद्यस्तप्तें परि नीवालीं : देवाचां ठांइं ॥५२७॥
नाना रुची केलीं उपेणी : की पाचिप्रभेचीं ठाणीं : कीं माधुर्यावरि सांघणी : आन्यरसाची ॥५२८॥
आरोगणेचा अवस्वरु : तुरीवीण मांडे ना गजरु : भणौनि आग्रहें सर्वेस्वरु : अनु धाडिती ॥५२९॥
दोही वीभागीं कूसूंबीरी पत्रसाकेम : परि स्नेहभर्जिकें : आभावी मागिजति वृतांके : सर्वज्ञरायें ॥५३०॥
ऐसीं पक्वानें राजयोग्यें : जे राउळांसि भोग्यें : तरि कदनें आभाग्यें : म्हणो आणि काइ ॥५३१॥
समबूधि ईश्वरी : म्हणाल जवळी एकें कां दुरी : भणौनि कानवलें ठेंटरीं भास्करी : मागिजति बळें ॥५३२॥
जंत्रीचेनि रसना झाजरें : लागलेया न मने भीतरें : की तयालागि सोधिजती घरें : धान्यवंतांचीं ॥५३३॥
रसपाकाचीया आवडी : ते तेंचि नीजकीकिर वाढी : तरि नांव एक खोडी : ठेविजे कां ॥५३४॥
दधि दुधें तक्रें : काढिया कालणें वीचीत्रे : नीजदृष्टी केली पवीत्रें : प्रसादालागी ॥५३५॥
जेथ रुची नाही थोडी : जे अन्यरसातें मोडी : आत्मरमणा गोडी :उपजवीत आहे ॥५३६॥
परि तीये सामसाके सदैवें : मज पांतां परतीजे सेवे : बावनें रुपवेधाचें मूळस्वभावें : भणौनि साच म्हणों ॥५३७॥
नीदौशे नीर्मळें : जाण सरोवरीचेनि जळें : गुळळा कीजे राउळें : आरोगणा अंतीं ॥५३८॥
चंदनें श्रीकर उलळिले : वरि उष्णोदकें प्रक्षाळिलें : सवेंचि नीर्मळांचळें दाटिले : सेवकजनीं ॥५३९॥
नेलवती चेउलें चोळीं : सपुरा फोडी कर्पूरादि परिमळीं : घोळिलीया श्रीमूखकमळीं : वोळगवीजती ॥५४०॥
कापूरवेलीची चोखडीं : उजळिलीं परिवडीं : तेही सकर्पूरीं वीडी : वीराजत श्रीमूख ॥५४१॥
जेथ लवंद्ग जातिफळ एळा : कातगोळिया सूपरिमळा : त्या परतलेया तांबोळा : हात वोडवीति नीजकींकिर ॥५४२॥
स्मरतां तें आरोगण : सूरस जालें अंतःकरण : तवं पुढां देखिलें सलक्षेण : देवाचें नीजस्थान ॥५४३॥

प्रकरण ३८ मंचकवर्णन, ओव्या ५

असा सेवटीं एकीकडे : आनंते हा (र) पति ब्रह्मांडें : तो देवो चक्रव्रती पहुडे : जिये मंचकीं ॥५४४॥
मज पाहातां मंचकू : जैसा सप्तरुसिचा चौकू : वरि उंचावता त्रीकू : तरि प्रभुस्वरुप म्हणतों ॥५४५॥
आगम ठाउवें जेथें : सामवेदादि गातें : सूधसत्वाचेनि पाटसूतें : विणिला जो ॥५४६॥
सूध शांभवेधाचीये खोळे : विस्वकार्पांसीं उजळे : तया स्तरणावरि पासवडा निर्मळे : ब्रह्मविद्येचा ॥५४७॥
जो सकळ साधना आवघडु : आगमनीगमा गुढू : तो आत्मरमणु करी पहुडु : जयावरी ॥५४८॥

प्रकरण ३९ : श्रीमूर्तिवर्णन

कव्हणें एकि वेळीं नीजप्रवृत्ति : पद्‍मासनीं आरुढू जीवपती: ते आपादमस्तक श्रीमूर्ती : वानावेया मति कैंची ॥५४९॥
आनंदरंगाचा बोझा : उपमावर्गु न ये सेजा : तो मोसू श्रीचरणपंकजा : जवळि दिसे ॥५५०॥
कीं पुर्णपश्चीम दीसा : संध्याराग मांडला सरिसा : तोही उपंढरु ऐसा : मज वाटत आसे ॥५५१॥
इंद्रगोप धुतले पाउसें : पद्मरागीं जडत्व असे : जावडें देखौनि न मूसे : कूंकूमपणें ॥५५२॥
आगाधत्व देखौनि आधिकें : वोळगे आलीं सामूद्रिकें : तियें पदस्तें जालीं कवतीके : श्रीचरणयुगें ॥५५३॥
मन लागौनि (नि) बुधीचिये कासे : श्रीचरण वानावेयाचेनि मिषें : आतां प्रमइं खतलें न सूसे : मागुतें नीगावेया ॥५५४॥
नीजप्रवृत्तीचेनि वोलें : चैतन्यीं डीर नीगाले : तैसें नखांचेनि मीषें फुले : श्रीआंगुळि कीं ॥५५५॥
कीं आंगिका अंगुष्टद्वयाजवळें : गर्भीचेया लावण्या आठांगुळें : भणौनि पुर्णचंद्र बैसविले जवळे : सहपंक्ती ॥५५६॥
समिप वनस्फुरा : म्हणों मूक्तक्षेत्रींचा धुरा : जेथें मार्गु नीगे पूढारा : मूमूक्षुसी ॥५५७॥
समसां गुल्फांचा उंचवटा : श्रीप्रभुचेया पायेवटा : पांतां न लगे ताठा : शतत्रई ॥५५८॥
नीजपदीचेनि वोलें : सोनें पीका अलें : तें एकवंकीं सांसींनलें : श्रीचरणक्षेत्रीं ॥५५९॥
नुपणितां रासि थोरी : माप करुनि वैखरीं : कण एकूसि साटवि ये हृदयेंअंबारी : परमार्थीये ॥५६०॥
सरळीया जानु : मीं बरवेपणें नेणी वानू : उंचपणें देति मानु : जंघाद्वये ॥५६१॥
जघनजानुचीये संधी : मध्यें कूंठलीया बूधी : चाकीं भ्रमतां आर्थसीधी : न पवतीचि ॥५६२॥
वरि समस उरु : जेथ काम न ल्हाए क्रिडा करुं : उपवास जालाहि जागरु : नाहीं तया ॥५६३॥
कीं नसतां संसारा : पुरुषार्थ तीसरा : लपौनि राहिला माजि वोस्तरा : जघनद्वइं ॥५६४॥
कटिप्रदेशू सांवळा : वरि वेढिला पाटोळा : जो पाहो न सरे डोळां : ब्रह्मविद्येचां ॥५६५॥
परब्रह्मा उदाशा : घालितां काश : सूंदर्ये आनौती वास : पाहों नेदी ॥५६६॥
नाभि सखोल सूंदरा : ना तो मायापुरीचा भंवंरा : दाटित असे भीतरा : तरतयातें ॥५६७॥
नाना मार्गीचीं सेंबी : नागवीलेयाचीं केलीं उभीं : तेथ जीवदेवतांचां बोंबी : कवण वांचे ॥५६८॥
उदैजत पराबींबीं : कळिकोळिगा राहिला कोंभी : तेथ प्रभुत्वें म्हणिजताये नाभी : अमळत्रयातें ॥५६९॥
त्या नाभिमंडळा आगाधा : समवेत ब्रह्में पेलिलें दोंद : तेथ भीतरि भरलेया अनंदा : सामावणूक सायासें ॥५७०॥
प्रेमीया भक्तांचिया वाटा : गीवसीतां लपे कैवल्याचां आव्हांटां : तो अभये आला पोटा : श्रीप्रभुचया ॥५७१॥
भीतरि सूखा आविटा : श्रीमूर्तीमंडपाचा दारवठा : जतनेसि आडकीलें कपाट : तैसें नीट वक्षेस्थळ ॥५७२॥
हृदयीचेनि वोलें : सूखा अंकूर नीगाले : तैसें स्तोम मीरवले : रोषमीषें ॥५७३॥
कीं भीतरि औदार्ये ( असे ) : तेथ लोवंसपण काइसें : भणौनि बाहिर नीनीलें तेणे मीषें : हो काज ॥५७४॥
कीं नाभिमंडळापासाव : रोमराजिची बरव : तो उर्ध एतायें खेवा : साजात्येंसी ॥५७५॥
आतां उंच समस्थळ : म्हणो स्कंदयुगळ : पुढां भुजादंड सरळ : उदार ते ॥५७६॥
नरदेहधारी : अवतरिजे अवतारी : परि कृमीतें ब्रह्मविंदां करी : ऐसा श्रीप्रभुचि होए ॥५७७॥
आणिका शस्त्री शापी : आलणीं सूरापीं : श्रीप्रभुचां करपूष्पीं : कैवल्यफल ॥५७८॥
कर्मवसें जीव साधारण : पावताति सर्व गात्रें प्रमाण : ते परदैवांचे वानितां सगुण : मज बोलवेना ॥५७९॥
परि नव्हे सूहावी : मज अज्ञानाची वाचा बरवीं : कीं माउली काइ न बोलवी : बाळकाकरवीं ॥५८०॥
भीतरु भरला अटा : आदिसंखाचेया सेवटा : तो श्रीप्रभुचेया कंठा : केवि उपमा पावे ॥५८१॥
भीतरु नसतां रंकू : लोकप्रसीध वाजवित संकु : तो परमार्थनाएका : उपमूं केवि कंठेंसीं ॥५८२॥
आनंदाअमृतलींगावरी : श्रीमूर्त्तिप्रसाद छत्री : परि जाणीवेचा कळसू वरी : ठेविला जैसा ॥५८३॥
चौघां मीळौनि पांचवा : तया हरीचंदनेसीं करी चढावा : तें बावनें वो  (ळ) गवीजे देवदेवा : प्रतिदीनी ॥५८४॥
तें श्रीकंथीं चर्चीत पातळ : वोळगवीजे शांखळेसिसी माळ : जें परिमळाचें वेलाउळ : सारग्राहीकांसी ॥५८५॥
सोनें परीणमलें सांखळें : की साडपन्हरें जालें कडिवळें : भणौनि अंगिकरीळें राउळें : आंगाजवळी ॥५८६॥
लींगत्रया अतीतु : अवक्रिये अनंतु : तें परब्रह्म आलें पुरुषार्था : स्मश्रूकूर्चमीसें ॥५८७॥
जैसीया जंत्रीं काढीलीया : इंद्रनीळांचीया सरिया : तैसे वेलावत दोंदावरिया : कूर्च नाभिचूंबित ॥५८८॥
दंतोष्ट रसना : नरलोक वाकसाधना : परि परेंपासाव ब्रह्मभुवना : यावया श्रीमूखचि एक ॥५८९॥
ब्रह्मविद्ये झगटली : परा चांचरली : तैसी वेंभळ बोली : जीये श्रीमूखीची ॥५९०॥
नीजसन्निधीवीण : जीव पावताति मरण : भणौनि प्रथम पूरस्कारीति या खुणा : मज पांतां ॥५९१॥
आतां कैसा म्हणों नासावसू : जो सर्व आवएवांचा कळसू प्राणनाथेंवीण उदासू : घालीति जेथें ॥५९२॥
म्हणे तें जगाचें जीवन : भणौनि पातले सन्निधान : कीं तया वावरावेया भुवन : रचिलें जैसें ॥५९३॥
कपोळांचें वर्तुळपण : म्हणौ ज्ञानप्रेमाचे दर्पण : जैसें नीजबळ (र) वेपण : पाहावेया ॥५९४॥
नेत्रांचेनि बरवेपणें : परि नाहीं आपणपें देखणें : तें श्रीप्रभुचेनि दर्शनें : मोडियेलें ॥५९५॥
मज पाहाता ते डोळे : जीवी दाखाविति सूखाचे सोहळे : अवलोकूनि परममंगळें : पाववीते जे ॥५९६॥
जे वस्तु शब्दातीतु नीर्गुण : तया अंगिकृत उभये श्रवण : आर्ता बोलांची साटवण : करावेया ॥५९७॥
नीकरें प्रतीली कस्तुरी : श्रीप्रभुचे कान भरी : परि पालटु नाहीं ईश्वरी : क्षेणही भरी : ॥५९८॥
भ्रुभंग वक्रपणें : म्हणो नीस्कामाची कोदंडें नीर्गुणें : जेथ संधान नाही करणें : समळ लक्षी ॥५९९॥
सृष्टी आदी सेवट : करितीये अज्ञेचें मूळपीठ : तैसें भ्रुभंग वंकट : मीरवताती ॥६००॥
वीसाळा भाळाचळाचा वहिवटीं : भणौनि प्रकृति सटी : न लेहेचि अक्षेरावळी गोमटी : सानकूळतेची ॥६०१॥
चैतन्य देवता वरीष्टी : मांडली श्रीप्रभुसीं ललाटी : उदास परब्रह्म सेवटी जाणौनियां ॥६०२॥
आसो हें तीये भाळी बरवंट : मृगनाभिचा मळिवट : वरि टीळा क्षेवविला चोखट : सूढाळां मोतियांचा ॥६०३॥
कीं तीयें मोतियें नीर्गुणें : देवो गुणातीतु वस्तु मी म्हणें : भणौनि जवळिक करणें : साजात्येंसी ॥६०४॥
आतां श्रीचरणीचेनि तीर्थबोलें :वरिल सूख पाहाळीं गेलें : तैसे केशकळापु मीरवले : श्रीमूगटीचे ॥६०५॥
कीं दीनत्व नाहीं ईश्वरी : भणौनि रात्रि आंधारीं : श्रीमूखचंद्रा भेण पाठिमोरी : जाली जैसी ॥६०६॥
हीने स्थानी जालें जन्म : परि जवादि सूगंध नीरुपम : तें मागिल लोपावया वर्म : लपे केशकपाळीं ॥६०७॥
दशे येउनि सेवटीं : परिमळाची हे कूटी : तेहीं सूमनीं पुजा श्रीमूगटीं : प्रसाद होआवेया ॥६०८॥
आसो हें मज हाचि आध्यासू : जो वानावा श्रीचीदमेसू : काइ कैवल्यकनकाचा कसू : भरे कसवटीयेवीण ॥६०९॥
कीं मूंकीं जडें : घालिति सारस्वताचे धडे : खद्योततेजें काइ उजियेडे : ब्रह्मगोळु ॥६१०॥
मज कृपणाचीये वाणी : सूरसां बोलांची सीराणी : तो मीं केवि सांधे काहाणी : कैवल्यअमृताची ॥६११॥

प्रकरण ४० : ईश्वरविरहपुरुषलक्षण, ओव्या २६

म्हणाल हेंचि वेर्‍हीं नेतां : तरि मागिलेंसी अन्वयो कथा :एवंवीधि श्रीप्रभुवीण देखें रीता : मंचकू तो ॥६१२॥
भीतरि नाहीं प्रेमाची वोल : तया केवि बो (ल) वति वीयोगीचे बोल : जे आर्तीयांचीए सभे न ल्हाति मोल : गौरवाचे ॥६१३॥
वीयोगघणाचा घावो गाढा : लागलेया म्हैसवाथरा जाए तढा : तयाही पासाव मज नीबरडा : उपमा वज्रकठिण ॥६१४॥
रोगिया जाय मरौनु : परि रसू करि गुणु : तैसें कांही एक स्मर्ण : बोलैन मीं ॥३१५॥
जी राउळेंवीण मंचकु : म्हणौ चौपांइं सेकु : की तो भाट भणौनि सूत असे नोक : जीवीतासी ॥६१६॥
बीजें करितां प्रभुराजा : आपणयां सांगातु नाही दुजा : भणौनि सांडौनि गेलेति सेजा : नीज ठावो ॥६१७॥
दडवांदडवीं धांवतां : उत्कंठा आलेया बहुतां : कां जी ठेविला रीता : श्रीराजमठू हा ॥६१८॥
तो हा राजमठू नव्हे : जेथ कैवल्यवस्तु सांटवे : परमार्ग वाहाति सदैवें : जयालागीं ॥६१९॥
एक पुरुषत्रइ साधे भीतरु : एकु नावेंचि उचथोरु : राजमठू कां ठेविला नीराधारु : नीजसन्निधिवीण ॥६२०॥
गुणीं श्रवणा सोहळे : वाचे नाम मंगळे : एकले चडफडिति डोळे : दर्शनेंवीण ॥६२१॥
मन जालें पांगुळ : बूधि न देखे डोळां : अहंकारें सांडिलें सळ : वीयोग देखौनिया ॥६२२॥
कर्म इंद्रियें जेणें आधारें : तो एकला प्राण एरझारें : देहभाव जाले पाठिमोरे : जीये स्थानीं ॥६२३॥
तो वीरहाग्र खरा : भणौनि ह्र्दयें मूसे भीतरा : आट नव्हेचि जीवभांगारा : सकीड भणौनिया ॥६२४॥
जर्‍हीं लागला तावो : तर्‍हीं घडीतां न धरी आवो : भणौनि आळंकाराचा वीपावो : श्रीचरणीचयां ॥६२५॥
कीं बूडतां भवार्णवीं : वरि एतां उपाडथावीं : तेविचि काकूळती दावी : कृपावंता पुढां ॥६२६॥
तेविचि पाहे पाराकडे : तवं कव्हणीचि न देखे पुढें : असो असों धावा फोकरी तोंडें : अनाथ भणौनि ॥६२७॥
कीं कणवा घालुनि उडी : पावविला संतथडी : तेव्हळीं अस जाळी फुडी : जीयावेयाची ॥६२८॥
म्हणाल सोडिला नीढाळु : तरि तुमचा स्वामि कैसा कृपाळु : माझां बोलीं येत असे आळु : नीष्टुरपणाचा ॥६२९॥
साचचि तुटलेया कणवा : तुम्हीं लटिकें न झाकवा : परि प्रबंध संपतां न दिसे बरवा : दुखीं की करीतां ॥६३०॥
आणि राउळिची कृपा : प्रसीध आली असे रुपा : तरि इतुलें सौभाग्य कां पां : न भोगावें मीयाम ॥६३१॥
चोर साधुत्वें नटे : लटका साचें वेठे : तैसें नीवृताचीये पेठे : बोल माझे ॥६३२॥
कळसा आला प्रबंधु : म्हणों तुमचाचि प्रसादु : श्रोत्र पावति आनंदु : श्रवणमात्रें ॥६३३॥
हे श्रीऋद्धिपुरवर्णन : जे आभ्यासीति करुनि मनन : तयासि कैवल्याचें साधन : दुरि नव्हे ॥६३४॥
जरि आधिष्टीलेति परदैवें : तरि एणें वागवैभवें : नांदातां म्यां देखावें : आपुलां डोळां ॥६३५॥
एथचेया नामधारकां : वीज्ञापन परीवारियां मार्गिकां : जें जन्माचेनि लाहें आभ्यासकां : श्रीऋद्धिपुरवर्णन ॥६३६॥
आर्थप्रमइ उणें : मज कृपाणाचे बोलणें : परि आधिष्टावें नाराएणु म्हणे : श्रोतयातें ॥६३७॥

प्रकरण ४१ : ग्रंथान्तीं मंगलाचरण, ओव्या ७

जय जय परात्परतरा : जय अनमीतचरीत्रा : जय परमपथगोत्रा : आदिपुरुषा ॥६३८॥
जय जय सूखसूकाळा : जय परममंगळा : जय उदारलीळा : करुणानीधी ॥६३९॥
जय जय सदा आनंदरुपा : जय उदारा सकृपा : जय आनमीत बंधु मायेबापा : प्रीति पावो ॥६४०॥
जय जय अव्यक्ता नीर्गुणा : जय अमृतगणा : वरद होये नाराएणा : अनाथासी ॥६४१॥
एवं ऋध्दिपुरवर्णन संपूर्ण ॥०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 28, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP