मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|ऋध्दिपुरवर्णन| प्रकरण ३१ ते ३५ ऋध्दिपुरवर्णन प्रकरण १ ते ५ प्रकरण ६ ते १० प्रकरण ११ ते १५ प्रकरण १६ ते २० प्रकरण २१ ते २५ प्रकरण २६ ते ३० प्रकरण ३१ ते ३५ प्रकरण ३६ ते ४१ ऋध्दिपुरवर्णन - प्रकरण ३१ ते ३५ महानुभाव पंथातील थोर संत नारायण व्यास बहाळिये यांनी ऋध्दिपुरवर्णन काव्याची रचना केली. Tags : ऋध्दिपुरवर्णनकाव्यमराठीमहानुभाव प्रकरण ३१ ते ३५ Translation - भाषांतर प्रकरण ३१ : भीतभंग वर्णन, ओव्या १४ तवं भीतभंगीं चहूंकडे : वानिलगा वस्त्राचे वोसाडे : जी पाहताम पुरवीती कोडें : दृष्टीचीं ॥४२३॥कीं झळंबाचेनि मीषें : आनुरागें रातला असे : मठ जेवि भुवनेषें : सांडिलेयां ॥४२४॥कीं देवो स्वरुपें नीर्गुण : भणौनि वस्त्रांचीया खुणा : मागें लागलेया गुणा : जाला वीसांवा तो ॥४२५॥ना तया राजमठा : सदैवीं आणिला दुखवटा : भणौनि पांगरवीला सवकटा : मीसें झळंबाचेनि ॥४२६॥वस्त्रें बाहें पांगुरता : तरि हा स्लेसू घडता : परि देवाचा तो आंत धडौता : बाहीर दीनु दिसे ॥४२७॥ऐसी भींतभंगा नीहटीई : सपोतें मांजीटीं : वस्त्रे वोळगवीलीं श्रूष्टी : नीरुपमें ॥४२८॥सूसाइलीं नखवी एकें : कव्हणा साध्यातें नाटकें : तें रसभावीं रुपरेखे : कवण जाणे ॥४२९॥अस्वगजनरवाणी : मध्ये ठांईं ठांइं पेखणी : ठसे पाहातां रुपति आंतष्करणी : स्वभावपणें ॥४३०॥तलंगीसी कमळें : चारा वांटिति मराळें : नारीकूंजाची दीकूळीं : राजवल्लभें ॥४३१॥ऐसी तीयें वस्त्रे वाणी : आपुलीं ठेविली कृपीणी : आगसीकें वेढूं म्हणौनी : गोसावीयाची ॥४३२॥न लगतां काळाचे पांसे : एक सदैवं आहाति ऐसे : जे राऊळीं घालीति ठसे : आपूलेया जोडीलेयांचे ॥४३३॥परि ब्रह्मयांचेनि सळें : झणी उठीति कव्हणी वेळे : कां जें आमृतश्रावीये डोळे : माझीया स्वामिचे ॥४३४॥जवळि प्रपंचू ना ठसे : द्वापरीं प्रकटलीं गोपवछें : तेवी श्रीप्रभुचेनि कृपावसें : जीति पां ॥४३५॥ऐसे भावभ्रमीत बोले : चीत तेथौनि नीगालें : तवं पूढां उभे देखीलें : स्थबद्वयें ॥४३६॥प्रकरण ३२ : देवळामधील खांबवर्णन, ओव्या ३ कैसे परोपकारी भले : जे देवाचेया संबंधा गेले : जयावरि आसे उभलें : आसेष तें ॥४३७॥परि ते भारु कैसे : देवाचेनि कृपावसे : दोन्ही मांडले सरिसे : चौरसू भणौनि ॥४३८॥जो परात्परु : जेहेंसी क्रीडा करी ईश्वरु : भणौनि साष्टांगीं नमस्कारु : करुनियां ॥४३९॥प्रकरण ३३ : नृसिंहवर्णन, ओव्या १० तेविचि पाहातां रचना : धृति नाहीं मना : तवं पूढा देखीलें सींहासन : भीतभंगेंसी ॥४४०॥वेढिली पातळें : वस्त्रे स्वेतें सोहजळें : सर्वागें बाहाकाति परिमळें : सुकडीचेनी ॥४४१॥वीकराळा वदनावरी : भाळीं बावनयाचीया भोरी : मूगट आछादले विखूरी : सतपत्रांचीया ॥४४२॥तया देवाचेया सन्निधीं : भणौनि पातले उपाधी : की कणव करुणानीधी : उरवीली तेहीं ॥४४३॥आपुलेनि नखें एकें : जो हीरण्यातें जींके : तोचि राउळीचीया जवळीके : नीःकामू सदा ॥४४४॥संपूर्ण सींहू ना नरु : देवताआंगी वेभचारु : वरि अवतरावेया दातारु : स्थान केला ॥४४५॥तया आनन्या देवाचें : सान्निधान कैचें : परि साहे केलें भाक्ताचें : भणौनि पढियेति ते ॥४४६॥भक्तातें दुरि धरी : आंगेसी वैरी : या आपराधा गोसावी जरी : कोपति पां ॥४४७॥भणौनि परिहारा मीसें : बोलावेया पसरीली मूखें : अंतर नीष्कपट चोखें : दावीति जैसें ॥४४८॥असो हे नरकेसरी : साष्टांगें नमस्कारी : तवं देखे हस्तांतरीं : स्थान एक ॥४४९॥प्रकरण ३४ : ओटावर्णन, ओव्या ६परहातें वाढविला : भणौनि गजप्रमाण रचला : तो उच वोटा देखीला : नीतळ नीटू ॥४५०॥कैसा साधला आवो : जो भक्तीचा नीजठावो : भणौनि वेळोवेळां देवोरावो : गीवसूं येति ॥४५१॥तो पुलींग परसया : जेथ मूळ बांधलें अबैया : तो वोटा आवडे वनमाळीया : सदाफळू ॥४५२॥तेथ सूमनत्वें वासु आगळा : परि सेवा एइल फळा : भणौनि साकर घालीजे आळां : सर्वज्ञरायें ॥४५३॥जगजिवनाचीया आवडी : पंचधारकरी परिवडी : भणौनि प्रेमाचां डीरीं खोडी : सांसीनली जेथ ॥४५४॥ऐसीया वीशेष स्थाना : साष्टांगी केलें नमन : तवं दक्षेणें देखे मर्दना : भुमी एकि ॥४५५॥प्रकरण ३५ : मर्दनास्थान, ओव्या ३४ सदैवी आपुलां हातीं : जेथ चौके भरिले नीगुतीं : जे बरवेपणें घेउनि बैसती : दृष्टीतें ॥४५६॥रेखिली परिकरें : सपुरें सर्वतोभद्रें : जेथची कुसरी नेत्रें : परिषवे ना ॥४५७॥नागबंधा पैलिकडे : सूरेख संख चोखडे : गर्भी रचीलीं उदंडें : अष्टदळें ॥४५८॥हरित पीत काळी : बाहुल्यें स्वेत रांगवळी : चौकावरि जीवाळीं : नवरत्नांचीं ॥४५९॥चौक नव्हेति साच : पृथवी दाटले रोमांच : रजीं उज्रंभु सत्वाचा : हें देवाचेनी ॥४६०॥सूखदानि सूल्लभु : नीष्कामाचा वल्लभु : तो फावला श्रीप्रभु : जीये सदैवेसी ॥४६१॥तीया आपुलेनि कूपात्रपणें : प्रूथवीया आछादिलें मी म्हणें : चौके नव्हे लाजिरवाणे : दाखवी जैसें ॥४६२॥की सेवीतां चराचरा : माझा स्वामि गोडिरा : भणौनि धावतु आली वसुंधरा : मीसें चौकोचेनि ॥४६३॥तैसी चौकरचना : मंडन केलें स्थाना : म्हणे एथ होए मर्दन : स्वामि माझेया ॥४६४॥जेथ बूधीचा विटाळु : नाहीं मनासि आतळु : कहीं न स्पर्शे संचळु : नीजवाणिचा ॥४६५॥जें विवेकाचे देखणीं : सूखाचें विसवणें : आमृता गोडिरपणें :अभिळासू जया ॥४६६॥मया (हा) तेजाचा उजियेडु : जो आकासाचा पवाडु : सत्यासि साचपणें गुढू : पदार्थ जो ॥४६७॥जो आगांधांसि आगाधु : सीधांसि असाध्यु : ज्ञानासि प्रतिबोधु : जाणता जो ॥४६८॥आपुलेनि गोडिरेपणें : जया स्वरुपस्वरुपीं रमणें : तो की मानितु असे मादनें : कृपावसें ॥४६९॥आपण वीस्वबिजाचा रासी : हॄदई सांटवला जयांसी : भणौनि काइ मळवटयासी : तेंचि नावं ।\४७०॥जर्ही नानावीध दळीं : भवितां सर्वकाळीं : कस्तूरियेचा परिमळीं : काई विशेषू दीसे ॥४७२॥दीपकाचेनि बंबाळे: दिवसू केवि उजळी : विजण्दयाचेनि मळयानिळें : काइ चांदिणें स ( सै ) त्य होए ॥४७३॥भणौनि फळौलेयाचिया योग्यता : महिमा ए सारस्वता : विषइं परमार्था : काई बिक चढें ॥४७४॥बाराखडियेचा अक्षेरीं : काइ स्लाग्यता आति आघोध्वरी : कळसोदकें समुद्री : काइ भरितें ये ॥४७५॥तैसें नीर्मळा नीर्दोसा : केवळा स्वयंसूखा : सूखोपचारीं देखा : काइ तोख आती ॥४७६॥वरि भवभुजंगाची दाटी : जियेचेनि संकेतें उठी : ते माउली जीवूसृष्टी : वरि लोभापरु ॥४७७॥ते नीराकारातें आणी आकारा : नीष्कामा दावी संसारा : उदासातें जोजारा : आंतु घाली ॥४७८॥आमूर्तातें मूर्ति लेववी : संपूर्णा चाड उपजवीं : कूटस्तातें हिंडवीं : माउली ते ॥४७९॥ते आनुर्वाच्याते बोलवी : अव्येक्तातें दाखवीं : नीर्गुणा उपजवीं : गुण गोडिसे ॥४८०॥आनादीतें करी बाळु : सांता उपजवी खेळु : स्वयेंबोधा क्रीडावेळु : गमवीतु असे ॥४८१॥जो आगाधपणें उगला : घे सृतीसीं अबोला : तो आर्ती बोलावीला : सादु दे ॥४८२॥जयाचेनि नीत्यतृप्तपणें : एज्ञोपचारी लाजिरवाणें : तो न बोलवितां आरोगणी : बीजें करी ॥४८३॥काळाचेया मूगटावरी : जयाचीयें आज्ञेचि चाउरी : तो की भणितलें करी : आर्वाचिकाचें ॥४८४॥जयाचिये गाविंचा मार्गु : चूके साध्याचा वर्गु : तो द्यावेया आपवर्गु : धाम्वें घरोघरीं ॥४८५॥परि हे ते जाणी वर्म : ज्या अवतरविलें परब्रह्म : जीवांचे संसारश्रम : देखौनिया ॥४८६॥जिए माउलीयेवीण : आमचें सोच्यपण : तया दातारासि कवण : कवण उपजवी हे ॥४८७॥ सदा नीर्गुणा स्वरुपा : जरि जवळि नसती कृपा : तरि उदासा बापा : केवि होतें आपूलेपण ॥४८८॥कींबहुना यापरी : मर्दनास्थान नमस्कारी : तवं रंगमाळिका देखे कूसरी : आरोगणभूमी ॥४८९॥ N/A References : N/A Last Updated : November 28, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP