चंपाषष्ठी - संसारात पारमार्थिक दृष्टीचे महत्व

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


मंगळवार ता. १०-१२-१९२९

दृष्टी परमार्थाची ठेवोनि संसारी । वागे जरी तरी सर्व सुख ॥१॥
अपुले ममत्व अर्पित देवासी । देई धनीपणासी दत्तात्रेया ॥२॥
संसार दत्ताचा सर्व घरदार । आपण चाकर मानी जरी ॥३॥
तरी इहपर लाभेल तो सुख । मग तया दु:ख शिवेनाच ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP