हनुमान जयंती - मारुतीची रामनिष्ठा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


राम राज्यावरी बैसतां, हा दास । सदा सेवी त्यास, सोडीनाच ॥१॥
जेथे राम तेथे मारुती हा उभा । सूर्याची ते प्रभा सूर्या जैशी ॥२॥
सदा सर्वकाळ रामाचे संनिध । प्राण अनुबंध राघवाचा ॥३॥
कदापी तो रामा मुळी विसंबेना । मुळीच चळेना रामापासून ॥४॥
विषय त्याचा राम, राम हे जीवन । राम अमृतपान तयालागी ॥५॥
राम हे विश्रान्ति राम हे समाधि । सदा ऐक्य साधी रामाठायी ॥६॥
रामाविण अन्य नाहीच प्रत्यय । बनला दुर्जय रामरुप ॥७॥
देह भिन्न जरी अवधाचि राम । सदा पूर्णकाम वसतसे ॥८॥
ब्रह्मचारी असे, असे योगनिष्ठ, । सकलां वरिष्ठ तोचि जाणा ॥९।
विनायक म्हणे त्याचा जन्मदिन । कीर्तिते गाऊन साजरा करुं ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP