मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|हनुमान जयंती.| मारुती प्रशंसा हनुमान जयंती. विषय मारुती प्रशंसा मारुतीची राममयता मारुती-चरित्र-सार मारुतीची रामनिष्ठा हनुमान जयंती - मारुती प्रशंसा श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन मारुती प्रशंसा Translation - भाषांतर रविवार ता. १३-४-१९३०अशक्य ऐसे काही नाही मारुतीला । नित्य विजयाला संपादीत ॥१॥दुर्गमही स्थळी तयासी प्रवेश । बळाचा हा ईश अनुपम ॥२॥अंजनीचा सुत पुत्र पवनाचा । सेवक रामाचा जगी ख्यात ॥३॥मंत्री सुग्रीवाचा मुख्य वानरांचा । काळ राक्षसांचा कपिवर ॥४॥सदा राम गाई सदा राम सेवी । महती वदावी काय त्याची ॥५॥विनायक म्हणे धन्य वज्रदेही । पावे लवलाही प्रार्थितांची ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP