शिवरात्र - शिवनर्तन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


नृत्यकाळी

कैलासासी शिव उमेसह बैसले । निजानन्दे भले योगिराज ॥१॥
शिवरात्र दिन बहु आनंदाचा । समय मध्यरात्रिचा मंगल की ॥२॥
आज उपवास सकळ गणांसी । करिती भजनासी शंकराच्या ॥३॥
ज्ञानवल्ली प्याले सकळही गण । शंकर आपण प्याले बहु ॥४॥
सकळांसी आला कैफ़ त्या वल्लीचा । देहावरी साचा कोणी नसे ॥५॥
गणपति मृदुंग वाजवी धरी ताल । गण ते सकळ भजन करिती ॥६॥
शिव अंकावरी बैसली पार्वती । जागृत एकटी कैलासांत ॥७॥
कैफ़ येवोनियां सकळ झाले दंग । चढलासे रंग नृत्यालागी ॥८॥
शिवाभोवती फ़ेर धरिताती गण । नाही जागेपण कोणासीही ॥९॥
ऐसा आनंदाचा समय कैलासींचा । अनुभव साचा येथ आला ॥१०॥
म्हणुनि भजन करुं, नाचूं, लाज सोडूं । शिवासंगे बागडूं आनंदाने ॥११॥
गण म्हणति भजन शिवहर ऐसे । तेच घेऊ पिसे नाचावया ॥१२॥
विनायक म्हणे रंगी रंगोनिया । तन्मयता ह्रदया जोडूं आतां ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP