शिवरात्र - शिवस्वरुप वर्णन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


चतुर्थ पुजनोत्तर

आयुर्वर्धनार्थ करिती शिवसेवा । अपमृत्यु जीवां बाधेनाची ॥१॥
शिवाविण नाही यम-भय त्राता । कोणी कालहर्ता नाही नाही ॥२॥
रुद्र्र-मंत्र जप करितां यमासीं । भय उपजे त्यासी बाधेनाच ॥३॥
काय तो मशक करिल बापुडा । पडत थोकडा शिवापुढे ॥४॥
मस्तकासि गंगा, भाळी तो चंद्र्मा । अंकी असे उमा ज्याच्या सदा ॥५॥
नंदीवरी बैसे भक्तां पावतसे । सदा रक्षतसे निजदास ॥६॥
भक्त रक्षणासी शक्ति तोच देतो । भक्तांसी रक्षितो सदाशिव ॥७॥
ध्यानी मनी जनी सदा सदाशिव । भक्तांवरी भाव त्याचा असे ॥८॥
इतरां तो आहे प्रचण्ड कोपन । आहे विघ्वंसन पापीयांसी ॥९॥
नरुरुण्डमाला गळां शोभताती । आंगासि विभूति चिताभस्म ॥१०॥
कटी व्याघ्रचर्म सदा त्याच्या असे । यम लपतसे त्याच्या मागे ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : January 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP