मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसद्गुरुलीलामृत|पूर्वार्ध|अध्याय चवथा| समास तिसरा अध्याय चवथा समास पहिला समास दुसरा समास तिसरा समास चवथा अध्याय चवथा - समास तिसरा श्रीसद्गुरुलीलामृत Tags : pothisanskritपोथीसंस्कृत समास तिसरा Translation - भाषांतर श्री गणेशायनम: । श्रीसद्गुरु सीतारामचंद्रायनम: । श्रीरामसमर्थ । एळेगावी पावले । ग्रामस्थांसि पुसिलें । तुकाराम साधू भले । कोठें भेटतील मजलागीं ॥१॥कोणी म्हणती नसे ठावा । कोणी म्हणती रानीं पहांवा । वेडा तुका कांसया व्हावा । म्हणती कोणी ॥२॥कोणी म्हणती साधूभले । तुमचें भाग्य उदेलें । दर्शना चित्त वेधलें । दिसतसे कोमल वयीं ॥३॥कोठेंतरी आडरानीं । अथवा ओढयाचे ठिकाणीं । बैसले असतील शोधोनी । काढी बापा ॥४॥असातील कंकणें हातांत । श्वान बालकांसवें खेळत । चिलीम करी वागवित क। असतील पहा ॥५॥भूमीसी शेज जयासी । आकाश प्रावर्णे परिधानासी । मस्तकीं टोपडें घालिती हर्षी । बालका ऐसे ॥६॥सर्वज्ञ परी बाह्य वेडा । दिसेल तुम्हांसी तुकडा । देह मलीन उघडा । वागविती नित्य ॥७॥ खूणगांठ बांधोनि । बाळ निघाला तेथोनी । सत्वर शोधिलें जयांनी परमहंस ॥८॥दुरूनि ध्यान पाहिलें । तंव अष्टभाव दाटले । मग देहासी लोटिलें । सदगुरुचरणीं ॥९॥कंठ सद्गदित झाला । प्रेम पान्हा नयना आला । सर्वांगीं रोम थरारिला । कृपाकटाक्षें ॥१०॥सहस्त्र बाण सोडले जरी ल्क। न मरे वासना असुरी । कृपाकटाक्षे एकसरीं । सकुंटबें निमाली ॥११॥दशेंद्रियां सहित मन । सोडोनी बाह्य विषयस्फुरण । सद्गुरूपदांसी आकलन । कराया धावलें ॥१२॥परी झालें विपरित । गुरुपदी व लीन होत । आपलेपण विसरोनि जात । उर्मीची धांव खुंटली ॥१३॥जैसे मीन चहुदिशीं । ग्रासू धांवली गळासी । तंव ते गळच गुंतविती तयासी । बाह्यगती रोधोनी ॥१४॥तैशीं इंद्रियें लीन झाली । गुरुपदीं गुंतोनी गेलीं । विषयग्रहणीं खुंटली । गती ज्यांची ॥१५॥चंचलत्व मनाचें गेलें । अनन्यें चरण वंदिले । हस्त जोडोनि उभे ठेले । दृष्टीं नम्र जाहली ॥१६॥तुकाराम आनंद मूर्ती । ज्ञान दृष्टीनें पाहती । जाणोनि अंतरबाह्यस्थिती । कार्यकर्ता सिध्दपुरुष ॥१७॥लोक व्यवहार कार्ण । ध्यानी आणोनिया जाण । मौन धरिलें आपण । तुकाईनें ॥१८॥बाळ बोले जीं महाराज । वेदशास्त्रांचे बीज । शिकावें ऐसें कथिलें मज । कुलगुरूंनीं ॥१९॥वेदशास्त्रें तीं अपाएर । अल्पायुषी न पडे पार । भवसिंधु दुर्गम थोर । उंतरावा कसा ॥२०॥सप्रेम बोले तुकाई । गुरुकृपा होता पाही । अज्ञेय नुरे स्वल्पही । ज्ञानरुप होईल ॥२१॥सहज बोलोनि उत्तरा । चटका लाविला अंतरा । सिध्दांच्या लीला अवधारा । कैशा असती ॥२२॥गणपती करी विनवणी । अनुग्रहप्रसाद द्यावा झणी । जेणें भेटेल चक्रपाणी । भवगजपंचानन ॥२३॥अधिकारी ऐसे जाणोनी । राममंत्र दिधला त्यांनी । गुरुपरंपरा कथोनी । समाधान केलें ॥२४॥तू परंपरा ऐसी । आदिनारायण मूळाशी । तो उपदेशी श्रीविष्णूशी । विष्णू उपदेशी हंसातें ॥२५॥हंसा शिष्य ब्रह्मदेव । वशिष्ट ब्रह्मापासाव । ते उपदेशिती रामराव । एक पत्नी एक वाणी ॥२६॥रामें उपदेशिले रामदास । रामदास उपदेशिती कल्याणास । कल्याणें बाळकृष्णास । कृपाप्रसाद अर्पिला ॥२७॥चिंतामणी जाहले तेथूनी । रामकृष्णही वदती कोणी । तुकारामा भगवद्भजनीं । रामकृष्णें लाविले ॥२८॥तया पासोनि ब्रह्मचैतन्य । सद्गुरु बोधिले आनंदधन । परंपरा करितां श्रवण । रामभक्ती जडतसे ॥२९॥रामदास सामर्थ्य समर्थ । होवोनि ठेले विख्यात । समर्थ सांप्रदाय ऐसें वदत । तैपासोनि ॥३०॥त्रयोदशाक्षरी रामनाम । वेदशास्त्राहोनिं परम । जेणें पावती विश्राम । साधकजन ॥३१॥जे वंदिलें शिवानीं । तेथें मानवा कोण गणी । सदभावें ठेवितां ध्यानीं । रामभेटी होतसे ॥३२॥साह्य करी हनुमंत । दुष्टनिंदकां निवारित । भजनीं सदाप्रेम देत । आशिर्वाद संताचा ॥३३॥अनंत जन्मींचें भाग्य । असतां घडे हा योग । नातरी संसृतीचा भोग । सुटेना कीं ॥३४॥असो ऐसा अनुग्रह झाला । गणपती ह्रदयीं बिंबला । बहुतांचे उपयोगा आला । भवसिंधू तराया ॥३५॥पुन्हां धरिलें मौन । रानीवनीं करिती भ्रमण । गणपती सोडिना चरण । सदा सन्निध वास करी ॥३६॥देहाची कींव सांडिलीं । गुरुसेवा आदरिली । चरणीं वृत्ती लिगडली । लोहचुंबका सारखी ॥३७॥गुरुसेवा अति गहन । गहन तितुकी सधन । देहाचें करोनि उपकरण । मन मुरडिलें सेवेकडे ॥३८॥एकेदिनीं मिळे अन्न । एके दिनीं उपोषण । तृष्णा क्षुधा हें बंधन । तोडिलें मर्त्य लोकिचें ॥३९॥वस्त्रप्रावर्ण आकाश । तृण भूमी शय्येस । ज्ञानज्योतीचा प्रकाश । कष्ट न वाटे ॥४०॥जिकडे गुरु धांवती । तिकडे धांवावे शीघ्र गरी । झाडोनि ठेविती क्षिती । बैसावया कारणें ॥४१॥गुरु बैसलियावरी । प्रेम भरें चरण चुरी । मौन्य धरिलें बाहेरी । अंतरी ध्यान श्रीगुरुचें ॥४२॥श्रीगुरु हेचि पंचप्राण । गुरुआज्ञा वेदवचन । तयावाचोन आन स्थान । न देखे तिळभरी ॥४३॥गुरुहोन आन दैवत क। न देखे त्रिभुवनांत । धन्य धन्य गुरुपूत । देव धांगती दर्शना ॥४४॥इंद्रियें सोडिली विषयगुंती । गुरुसेवेकडे धांवतई । सेवेवाचोनि व्यावृत्ती । गोड न वाटें ॥४५॥कमल एक भुंगे अनेक । सर्वत्र धांवती तात्कालिक । इंद्रियभ्रमर वेगें अधिक । धांवती गुरुपदाब्जीं ॥४६॥मन चंचल अनिवार । परी रिघालें सगुदरुघर । चंचलस्थिती गेली दूर । ठाईच उन्मन झालें ॥४७॥चित्त चिंती गुरुवर । बुध्दि स्थीर झाली चतुर । गेला समूळ अहंकार । परम लीनता बाणली ॥४८॥वासना इच्छी चरणरज । तृष्णा धरी सद्गुरुकाज । अनन्यपण सहजी सहज । गुरुपदीं जाहलें ॥४९॥क्वचित्काळीं सेवा घेती । कचितू झिरकारोनी देती । दुरुत्तरें बोलोनि पाहती । निष्ठा सतू शिष्याची ॥५०॥क्वचित् वैभवा वानावें । क्वचित् तृणतुल्य करावें । हर्ष विषादाचे गोवे । घालिती अनेक ॥५१॥परी मान ना अपमान । लोभग्रस्त नोहे मन । गुरुपदीं गेलें रंगोन । दुजे रिधाया ठाव नाहीं ॥५३॥धक्के चपटे मारिती । अहंभूता निवारिती । सद्गुरू सतशिष्याप्रती । स्थापिती निजपदावरी ॥५३॥अनंत सुकृतांची ठेव । असतां सदगुरुपदी भाव । दुर्लभ दुर्लभ आडभाव । ठाईठाई पडतसे ॥५४॥सद्गुरु वचनीं अढळ विश्वास । तोचि साक्षात ब्रह्मरस । गुरुपूत म्हणावे तयास । त्रिलोक्य वंद्य ॥५५॥गुरुवचनीं विकल्पधरी । तो जाण अनाधिकारी । चौर्यांशी लक्ष फेरी । चुकणार नाहीं ॥५६॥असो सदगुरुसेवा गहन । गणपती करी रात्रंदिन । देवादिकां दुर्लभस्थान । उपभोगी जो ॥५७॥तुकाराम परमहंस । दुर्गमस्थळीं वनीं वास । सेवा कठिण बहुवस । विचारा मनीं ॥५८॥ऐसे तुकाराम संत । परमहंस विरक्त । अनन्यपणें भगवदभक्त । नि:संदेही ॥५९॥लोकीं वागती वेडयापरी । वेडा तुका म्हणती सारी । भाविकां नवसा सत्वरी । पावती नित्य ॥६०॥बहुत लोक दर्शना येती । कोणासवें न बोलती । बोलिल्या अर्थ व्युत्पत्ती । प्राकृता न कळेची ॥६१॥कोठेंही फिरत असावें । श्वान बालकासीव खेळावें क। कोठेंही खावें जेवावें । बंधन नाहीं ॥६२॥नानापरीचे नवस । नागरीक करिती आया । म्हणती मजला पुत्र झालिया । तुक्या करवीं कान टोंचूं ॥६४॥कोणाची मुलें न वांचतीं । ते नाककान टोचविती । काकुलतेनें शरण येती । पुत्र वांचूदे आपुला ॥६५॥व्याधिग्रस्त कितीएक । मानसीक कामना अनेक । पुरवोनि दाविती कौतुक । चमत्कृती जगामाजी ॥६६॥इति श्रीसद गुरुलीलामृते चतुर्थो्ध्यायांतर्गत तृतीयसमास: । ओंवीसंख्या ॥६६॥॥ श्रीसदगुरूनाथार्पणमस्तु ॥॥ श्रीराम समर्थ ॥ N/A References : N/A Last Updated : October 22, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP