मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८८ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ८८ वा आरंभ श्लोक १ ते ५ विशेष श्लोक १ ते २ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ८८ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर दशास्यवाणयोस्तुष्टः स्तुवतोर्बन्दिनोरिव । ऐश्वर्यमतुलं दत्वा तत आप सुसङ्ककटम् ॥१६॥दशवदन जो रावण । आणि बळीचा पुत्र बाण । त्या वरी तोषला पंचानन । अल्प तद्गुण देखोनी ॥३९५॥बंदी जैसे नृपा प्रति । तत्प्रतापकथनें स्तविती । तेंवि स्त्विते झाले सकाममति । उदारस्थिति उमेश्वर ॥९६॥सुस्वरसप्तस्वरीं गायनें । तालबद्धवाद्यस्वनें । गद्यपद्यादि काव्यग्रथनें । स्तविलें रावणें सप्रेमें ॥९७॥तेंविच बाणासुरें सहस्रकरें । युगपत पंचशतवाद्यनिकरें । कळाकौशल्यें वादरभरें । रमविले स्वसुरें गीतनृत्यें ॥९८॥यापरि दशास्य बाणासुर । स्तविते झाले निष्ठापर । त्यां वरी संतुष्ट मृडानीवर । आनंद फार होत्साता ॥९९॥तुलनारहित उत्कटैश्वर्य । त्यांसि देऊनि वरदवर्य । पश्चात संकट अनीस्तीर्य । पावला अनुपाय धूर्जटि ॥४००॥इतुकें वृकासुराचें ध्वनित । बोलिला संक्षेपें विधिसुत । कीं प्रसन्न होवोनियां त्वरित । पावला अद्भुत संकट ॥१॥तत आप सुसंकटं । या मूळवाक्याचा अर्थ प्रकट । कथिजेल तो ऐकिजे स्पष्ट । ध्वनीतें उपदिष्ट जया परी ॥२॥रावणें कैलासभुवन । अंगप्रतापें उत्पाटन । करितां झालें कंपायमान । तैं भयोद्विग्न पार्वती ॥३॥भीरू स्त्री स्वबावें गौरी । कवळी शंकरास भयभारीं । तेव्हां घाबरा त्रिपुरारी । क्षोभला अंतरी सक्रोधें ॥४॥आणि बाणासुरें पुररक्षण । याचिलें उद्धटपणें जाण । यास्तव सांडूनि कैलासभुवन । केलें अवास्थान तन्नगरा ॥४०५॥त्यानंतरें तो उन्मत्त पूर्ण । म्हणे मजसीं करीं समराङ्गण । मम भुजांचें कंडूशमन । तुज वीण आन करूं न शके ॥६॥ऐसें उफराटें संकट । प्रसन्न होवोनि नीलकंठ । पावला त्याचें फळ उद्भट । झालें प्रकट तयासी ॥७॥दाशरथिहस्तें दशानन । ऐश्वर्यें सहित ससंतान । क्षय पावला निपटून । जाणती जन प्रसिद्ध हें ॥८॥आणि कंडूयमन बाणभुज । श्रीकृष्णचक्रें भंगले सहज । ऐश्वर्यच्युत अति सलज्ज । झाला वाज स्वजीविता ॥९॥पूर्वीं सविस्तर या निरूपणा । शुकें कथिलें मात्स्यीरमणा । असो नारदें बीजरूपें जाणा । केली सूचना असुरातें ॥४१०॥एवं शिवतुष्टीचें फळ । आणि ध्वनितें विषादमूळ । परिणामेंसीं कथिलें मुकुल । नारदें उतावेळ वृकासुरा ॥११॥परंतु अदीर्घदर्शी असुर । स्वार्थसाधक कामप्रचुर । उताविळा प्रमादपर । ऐकूनि सादर तात्पर्य ॥१२॥कीं आराधितां सत्वर तुष्ट । स्वभक्तां होय नीलकंठ । ऐश्वर्य देतसे यथेष्ट । ऐसा उपदिष्ट नारदें ॥१३॥इत्यादिष्टस्तमसुर उपाधावत्स्वगात्रतः । केदार आत्मक्रव्येण जुह्वानोऽग्निमुखं हरम् ॥१७॥मग तो वृकासुर कृतनिश्चय । पाहूनि सुक्षेत्र पुण्यमय । साधनपुष्कर प्रफुल्ल होय । निवाससूर्यें जेथींच्या ॥१४॥ऐसें कोणतें क्षेत्र पुससी । राया परीक्षिति राजर्षी । तें सविस्तर तुज पासीं । उमजे ऐसी गोष्टी वदों ॥४१५॥पर्वतां माजी पुण्यरूप । जेंवि वृक्षां माजी सुरपादप । जेथ वसती सुरर्षि अमूप । स्मरणें पाप विध्वंसी ॥१६॥तया सिताद्रिसन्निध । बरदिकाश्रम अत्यंत शुद्ध । जेथ अनृतादि दोष विरुद्ध । नसती वंध्यापुत्रवत् ॥१७॥जैसें परिससान्निध्यें लोह । पाल्टे तत्काळ हेम होय । कीं अमृतसेवनें निःसंदेह । अमरत्व देह लाहतसे ॥१८॥तेंवि साधकांचे सिद्ध । जेथ वसतिमात्रें विशुद्ध । अभुक होतीच प्रसिद्ध । हा निश्चय प्रबुद्ध जाणती ॥१९॥तें हरिहरात्मक पुण्यक्षेत्र । तपस्विनिषेवित परमपवित्र । तेथ ज्योतिलिङ्ग केदार । भजका उदार वरदानें ॥४२०॥तये केदारीं सुदृढमन । तया हरातें विवेकहीन । भजता झाला स्वगात्रें करून । व्हावया पूर्ण मनोरथ ॥२१॥कवण्या प्रकारें म्हणसी भजला । निष्ठापूर्वक शंकराला । तरी तमस्वभावें आपणाला । घोरक्लेशा घेऊनियां ॥२२॥आदिपुरुषाचें मुख पावक । तया माजी हवितां सम्यक । संतृप देवता सकळिक । हें वर्म चोख जाणोनी ॥२३॥स्थंडिल करूनि वृकासुर । तेथ स्थापिला झाला वैश्वानर । आसनीं बैसूनि एकाग्र । हवी सादर स्वमांसें ॥२४॥आपुल्या देहाचें जें मांस । तेंचि हविर्द्रव्य कल्पूनि सुरस । शस्त्रें छेदूनि अवदानास । टाकी गिरीशोद्देशें ॥४२५॥ऐसा कृशानमुखाप्रति । स्वमांसगोळे होमितां कुमति । सप्त दिवस क्रमिले निगुती । वर्तलें अंतीं तें ऐका ॥२६॥देवोपलब्धिमप्रपय निर्वेदात्सप्तमेऽहनि शिरोऽवृश्चत्स्वधितिना तत्तीर्थक्लिन्नमूर्द्धजम् ॥१८॥महादेवाची उपलब्धि । न पवूनियां स्वकृतसिद्धि । क्लेशी जाला तमोनिधि । पुरली अवधि धैर्याची ॥२७॥सरली देहाची कव्यसामग्री । तत्कृतनें वेदना भारी । होतां कासावीस अंतरीं । उबगला सुसारि स्वजीविता ॥२८॥मग त्रासूनि सप्तदिनान्तीं । वक्र च्छुरिका उभयहस्तीं । धरूनि छेदावयास शिराप्रति । आत्मघातीं प्रवर्तला ॥२९॥हिमाद्रीचें अतिशयें शीत । जेथ भानूचें तेज इन्दुवत । केदारतीर्थीं स्नान नित्य । करितां बहुत शीताकुळ ॥४३०॥मस्तकींचें सलंब केश । तत्तीर्थमजनें आर्द्राशेष । तेणें क्लिन्नमूर्धज शीर्ष । झालें बहुवस असुराचें ॥३१॥ऐसिया मस्तकाचें लवन । करूनि शिवातें जीवितार्पण । करितां आततायिपणें पूर्ण । कळवळी सघृण उमेश्वर ॥३२॥तदा महाकारुणिकः स धूर्जटिर्यथा वयं चाग्निरिवोत्थितोऽलनात् ।निगृह्य दोर्भ्यां भुजयोर्न्यवारयत्तत्स्पर्शनाद्भूय उपस्कृताकृतिः ॥१९॥तेव्हां तो महाकारुणिक । धूर्जटि कैलासनायक । हुताग्नीहूनि तात्काळिक । उठिला सम्यक मूर्तिमंत ॥३३॥तेजःपुञ्ज अग्निसमान । दिक्संख्यहस्त पंचायन । उमेसहित सुप्रसन्न । प्रकटला पूर्ण वरदानी ॥३४॥राया आपण जैसे मानस । कोणी दुःखित दुःखस्वभाव । अपघात करितां स्वयमेव । पाहूनि मोह निवारूं ॥४३५॥तयापरी करुणाधाम । शंभु देखोनि स्वभक्तश्रम । हस्तीं धरूनि तद्भुजनयुग्म । निवारी परम कृपाळु ॥३६॥तंव तो वृकासुर मांसच्छेदें । आणि देवानुपलब्धिखेदें । मुमुर्शु विकळ बहळतोदें । स्फूर्तिरोधें मूर्च्छित ॥३७॥नवल ईश्वर महिमा विचित्र । होतांचि तत्करस्पर्शमात्र । पुन्हा पूर्ववत शकुनिपुत्र । उपस्कृतगात्र जाहला ॥३८॥पुष्टमांसक पिहितत्वक । शिवस्पर्शनास्तव सम्यक । उपस्कृताकृति दिव्यदृक । किम्बहुना अधिक पूर्वींहुनी ॥३९॥लब्धस्मृति पूर्णाकृति । झाला असतां तयाप्रति । भक्तवत्सल उमापति । बोलिला मूर्तिमंत हर ॥४४०॥तमाह चाङ्गालमल्म वृणीष्व मे यथाऽभिकामं वितरामि ते वरम् । प्रीयेय तोयेन नृणां प्रपद्यतामहो त्वयात्माभृशमर्द्यते वृथा ॥२०॥पुरे पुरे गा भक्तोत्तमा । तव भक्तीची झाली सीमा । इत्का कष्टसी तूं कां मा । तवेष्टकामा पुरवीन ॥४१॥जैसें तुझें अपेक्षित । अलेस प्रियतम अंतर्गत । तैसेंच वरीं मज निश्चित । संकोचरहित सुशब्दें ॥४२॥तुजलागीं तया बराप्रति । मी देईन गा भक्तपति । तेणें निरसे तुझी आर्ति । सुखविश्रांन्ति पावसी ॥४३॥मज कारणें अनन्यशरण । अर्पूनि काया वाचा मन । जे नर होती मद्भावपूर्ण । निरभिमान विवेकी ॥४४॥मत्प्राप्तीस्तव श्रम । करणें न लगती अनुत्तम । एक दृढतर पाहिजे प्रेम । स्मरतां नाम मी जवळी ॥४४५॥ते मज सद्भावें अर्पिती तोय । तरी त्या जळेंचि करूनि प्रिय । तयाचिये होय मी सदय । अमृतप्राय सप्रेमें ॥४६॥प्रेमाथिलें केवळ जळ । भक्त अर्पिती सप्रेमळ । तेणें प्रसन्न मी उतावीळ । न लगे काळ दीर्घतर ॥४७॥ऐसें असतां दैत्यनाथा । अतिशयेंसीं तुवां वृथा । आत्मा पीडिजे सर्वथा । दुर्धर व्यथा करूनियां ॥४८॥असो झालें तें मूर्खपणें । आतां वरीं मज कारणें । स्वेच्छा प्रार्थीं स्ववचनें । परिहरी जेणें श्रम अवघा ॥४९॥ऐसी शिवाची प्रसन्न वाणी । वृक ऐकोनि अविवेकखाणी । मागता झाला वर निदानीं । तो परिसें कर्णीं नृपनाथा ॥४५०॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP