मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८८ वा| आरंभ अध्याय ८८ वा आरंभ श्लोक १ ते ५ विशेष श्लोक १ ते २ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ८८ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । जगदात्मया जगद्गुरो । निजजनजनका कल्पतरो । तव पद स्मरणें भव हा हरो । मानस मुरो तव वेधें ॥१॥म्हणोनि सद्गुरो सुखनिधाना । प्रणतवरदा प्रबोधगहना । नमन साष्टांग तुझिया चर्णा । संसृतिशमना मुहुर्मुहु ॥२॥करितां तव चरणांचें स्मरण । होय देहत्रया विस्मरण । सबाह्य दाटे सच्चिद्घन । ब्रह्म परिपूर्ण अभेदें ॥३॥तेव्हां नम्यनमक हा भाव । नुरविसी देऊनि स्वगौरव । त्रिपुटी ग्रासूनि सुखानुभव । साक्षित्वभाव अभिविलयें ॥४॥ऐसा नैसर्गिक अगाध महिमा । सहसा न वदवेचि निगमा । परंतु स्फुरवी अनन्य प्रेमा । गुणगणगरिमा प्रणतांसी ॥५॥बहुधा वदती युगानुयुगीं । अजस्र चालती स्तवनमार्गीं । होवूनि तव पदीं अनुरागी । न करिती वावुगी भवचिन्ता ॥६॥अनंतयुगीं अनंत मूर्ति । तारक जड जीवां भवावर्तीं । सच्चित्सुखमय धरूनि आर्ती । निरसूनि कीर्ति प्रकाशिती ॥७॥एका उद्धरिलें प्रबोधामृतें । एक ते भाविक चरणतीर्थें । मौळ स्पर्शोनि पद्महस्तें । कितिएकांतें तारिलें ॥८॥एकां सदयावलोकें पाहिलें । ते तत्काळ चि कृतार्थ झाले । एकीं हृदया माजी द्भ्याइलें । ते ही चुकले भवभया ॥९॥एकां अनुदिनीं नामस्मरणें । एक ते चिद्रूपचिन्तनें । एक परिचर्येच्या गुणें । समानपणें उद्धरिले ॥१०॥ऐसी अनेक शुभ पवित्रें । मोक्षप्रदें श्रवणमात्रें । साकल्यें न वदती वेदशास्त्रें । पुराणें पवित्रें यथामति ॥११॥द्वापारान्तीं सगुण विग्रह । कृष्णनामक भवापह । घेऊनि तारिला जीवसमूह । चरित सुखावह प्रकटिलें ॥१२॥उद्धवार्जुनादि अनन्य शरण । केले चिन्मात्रबोधें पूर्ण । उरले जे कां मादृश दीन । कळिकाळीन भवग्रस्त ॥१३॥तयांचिये करुणे स्तव । प्रकटावया पूर्णानुभव । श्रीमत्कृष्णदयार्णव । नामें स्वयमेव प्रस्तुत ॥१४॥पूर्ण दयेनें अवतरून । केलें अपार जगदुद्धरण । विशेष तारिले भाविकजन । गुह्यज्ञानप्रबोधनें ॥१५॥भक्ति ज्ञान आणि विराग । कर्मधर्मादिसन्मार्गयोग । जनीं प्रकटिला अभंग । यथासाङ्ग आचरणें ॥१६॥दिवसेंदिवस बुद्धिहीन । प्राणी होती कलिकालीन । न कळे वेद शास्त्र पुराण । कळवळून तयांस्तव ॥१७॥दशमस्कंधाचें व्याख्यान । देशभाषाकृतटीकाग्रथन । ज्या माजी सांठविला संपूर्ण । अर्थ गहन श्रुतींचा ॥१८॥अगाध गुरुचरित्रमहिमान । तेथ अनन्य वक्ता समर्थ कोण । म्हणोनि प्रकटिलें आपुले आपण । अबळां कारणें सुभाषितें ॥१९॥इत्यादि अनेक सवतारकार्य । संपादूनि स्वविग्रहवर्य । उपसंहरिला देऊनि धैर्य । शेषान्वयग्रथनार्थ ॥२०॥मी तो केवळ अकोविद । अनधीत विशेषें मतिमंद । न कळे काव्यरचनाछंद । आज्ञार्थ सिद्ध स्वयें कीजे ॥२१॥तुमची अभिनव न कळे लीला । उदकावरी तारिल्या शिळा । समुद्रीं हुताशन ठेविला । अनळीं सलिला प्रकटिलें ॥२२॥शून्यीं सृजिला प्रभंजन । प्रभंजनीं हुताशन । न पढवूनि चतुरानन । वेदप्रेरणा त्या केलें ॥२३॥ऐसिया देखूनि महिमाना । न होय चित्तीं असंभावना । प्रकटूनियां सतास्फुरणा । काय एक रचना न कराल ॥२४॥असो ये विषयीं विज्ञप्ती । करणें न लगे चरणा प्रती । लेखनी न प्रार्थीं लेखनार्थीं । लेखका निश्चिती कदापिही ॥२५॥किंवा वाद्यें प्रार्थनापूर्वक । सहसा न विनविती वादक । ते आपुलियासाठीं बहुतेक । चातुर्य सम्यक प्रकटिती ॥२६॥तेंवि अंतर्यामित्वें बोलवणें । हें इष्टचि समर्था कारणें । म्हणोनि ग्रंथसमाप्ती कारणें । संदेह धरणें मज नाहीं ॥२७॥ऐसे ऐकोनि श्रोते सज्जन । म्हणती हें कैसें येथ भाषण । हा अभिप्राय विशद करून । आम्हां संपूर्ण कथावा ॥२८॥तरी ऐकावें श्रोतीं सकळीं । जे कां अळिसम गुरुपदकमळीं । हे जगदुद्धारार्थ नव्हाळी । ग्रंथरूपें केली गुरुवरें ॥२९॥शायशी अध्याय पर्यंत । निरूपिलें श्रीकृष्णचरित । पुढें सत्यायशीवा प्राप्त । जेथ वेदस्तुत परमात्मा ॥३०॥तो तेवीस श्रुत्युक्त श्लोक । पर्यंत वाखाणिला सम्यक । तंव पुरला अवघ्र अंक । अवतारात्मक प्रभूचा ॥३१॥यथोक्त केलें विधिपाळणा । यास्तव काळातिक्रमणा । न करूनि सायुज्यसदना । प्रत्युद्गमना आदरिलें ॥३२॥तेव्हां समीप स्वभक्तमेळा । होता त्या माजी अनन्यशीळा । मज आज्ञासंकेत केला । ग्रंथ राहिला करावया ॥३३॥सोळा शतें वासष्टी अब्दें । शालिवाहनपरिमितशब्दें । क्रमितां रौद्रवत्सरीं मोदें । मार्गशीर्षें शुभमासीं ॥३४॥शुक्लपंचमीगुरुवासरीं । ब्राह्मीं मुहर्तीं शुभावसरीं । प्रतिष्ठानीं गोदातीरीं । स्वधाम निर्धारीं स्वीकेलें ॥३५॥त्या वरी सगुणवियोगें खेद । करूनि जाहलों मतिमंद । द्विमासां नंतर पुन्हां विशद । स्वप्नीं अनुवाद हा केला ॥३६॥मज संबोखूनि बहुता परी । म्हणती असो तुज अंतरीं । प्रज्ञा स्फुरेल शंका न धरीं । ग्रंथ पुढारीं चालवणें ॥३७॥ऐसी सद्गुरूची समर्थ आज्ञा । विशेष संमत् सकळां सुज्ञा । येर्हवीं सामर्थ्य मज अल्पज्ञा । कैंचें प्रज्ञारहितासी ॥३८॥आतां भरंवसा मज निश्चित । कीं दूरस्थ चंद्रमा गगनांत । स्वकान्ति प्रकटित अमृत । असे विदित सर्वांसी ॥३९॥कीं सूर्यकान्ति दिवाकर । अंतरें प्रसवे ज्योति प्रखर । मा हृदयस्थ सद्गुरु भ्रमहर । स्व उद्गार न स्फुरवी ॥४०॥पूर्वीं स्वमुखें ओवीप्रबंध । वदोनि सद्गुरु नित्यबोध । लेखनक्रियेसी पैं विशुद्ध । मज करूनि विशद करविलें ॥४१॥आतां अंतर्यामित्वें वक्ता । श्रीस्वामिराजचि तत्वता । येथ मीपणाचिया अर्था । ठाव सर्वथा नसेचि कीं ॥४२॥माझ्या मीपणाचा ग्रास । तैंचि केला जी निःशेष । जैं ठेविलें पद्महस्तास । कृपाविशेष करूनियां ॥४३॥नामरूपेंसीं पालटिलें । आपुलें नाम मज ठेविलें । उत्तमश्लोकसंज्ञाथिलें । प्रेम दिधलें निजभजनीं ॥४४॥म्हणोनि येथ परिहार करणें । न लगेचि विविधा बोलनें । तुम्ही संत सर्वज्ञपणें । अभेदलक्षणें जाणतसां ॥४५॥तरी सप्ताशीति अध्याय पहिले । यथानुक्रेमें समर्थिलें । यावरी व्याख्यान उपाइलें । अष्टाशीतितमाचें ॥४६॥ये अध्यायीं निरूपण । हरिभक्त कैवल्य पावे पूर्ण । याहूनि अर्वाद्गेवता जाण । तद्भक्त संपन्न भोगसुखें ॥४७॥शिवादिदेवतान्तरें भजती । ते भोग्यवैभवचि पावती । तयासि दुर्लभ मोक्षावाप्ती । हे संशयनिवृत्ती मुनि करी ॥४८॥येथ अष्टम एकादशिनी । पूर्णता पावेल निरूपणीं । श्रोतीं सावध ऐकिजे श्रवणीं । इतुकी विनवणी सेवेसी ॥४९॥तुमचें अवधानजीवन । पावतांचि वक्तृत्ववन । लसलसीत होवोनि पूर्ण । नित्यनूतन फळेल ॥५०॥पूर्वाध्यायीं श्रुत्यर्थभूत । शेवटील श्लोक शुक समर्थ । नृपासि कथिता झाला तेथ । अभिप्राय तथ्य हा कथिला ॥५१॥की भयनिवर्तक श्रीधर । जो परमात्मा परात्पर । स्वभक्ता मोक्षद निरंतर । हें ऐकोनि सादर परीक्षिति ॥५२॥आशंकोनि मुनी कारनें । प्रश्न करी अतिनम्रपणें । म्हणे स्वामी हें निरूपणें । स्फुटव्याख्यानें मज लागीं ॥५३॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP