विभक्तिसंबधी अनुस्वार सप्तमी

व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


सप्तमी विभक्तीचे प्रत्यय

काल मी बाबाबरोबर बाजारांत गेलों होतों. रस्त्यांत धान्य व कापड पहात व भावांई चौकशी करीत भांड्य़ाचे दुकानीं आलों. तेथें आम्हीं एक परात विकत घेतली. बाबा म्हणतात, “ ही परात पूर्वीं दोन रुपयाम्स मिळाली असती; आतां तिला सात रुपये द्यावे लागले. ” वाटेत आम्हांला दौलत मिस्त्री भेटले. त्यांचे हातीं एक करवत होती. ती त्यांनी दहा रुपयांस घेतलीं. ते म्हणाले, “ हीच करवत लढाईपूर्वीं अडीच रुपयांस मिळे; पण आतां तिची किंमत दहा रुपयापर्यंत चढली आहे. ” तें ऐकून माझ्या ध्यानांत आलें कीं, हल्लीं सर्वत्र महागाई झाली आहे. मिस्त्री व आम्ही बोलत बोलत भाजीबाजारांत आलों. तेथें थोडा भाजीपाला व द्राक्षें घेतली. सर्व फळांत मला द्राक्षें फार आवडतात. थोड्या वेळानें आम्ही घरीं परत आलों.

या लिहिण्यांत सप्तमीचे प्रत्यय खालील शब्दांस लागले आहेत.

बाजार        त    बाजारांत,    बाजारामध्यें,        एकवचन.
रस्ता        त     रस्त्यांत,    रस्त्यामध्यें        एकवचन.
दुकान     ईं     दुकानीं,    दुकानामध्यें        एकवचन.
वाट         त    वाटेंत,        वाटेमध्ये,        एकवचन.
हात         ईं    हातीं,         हातांत,         एकवचन.
ध्यान        त     ध्यानांत,     ध्यानामध्यें,        एकवचन.
फळ        त    फळांत,    फळांमध्यें,         अनेकवचन.

सप्तमीचा त प्रत्यय लागलेल्या शब्दांत उपान्त्य अक्षरावर अनुस्वार आले आहेत. जसें - बाजारांत, रस्त्यांत, वाटेंत.
सप्तमीच्या ईं प्रत्ययांत शब्दांतील शेवटच्या अक्षरावर ( ईं प्रत्यययुक्त अक्षरावर ) अनुस्वार आहेत. जसें - दुकानीं, हातीं, घरीं.
सप्तमीचा आँ व ईं हे प्रत्यय बहुतकरून कवितेंत येतात. हें मागें सोदाहरण सांगितलें आहेत. पण क्कचित् ते गद्यांतही येतात. जसें - रामू शेतकरी आपली जमीन जाऊन मुलांना उपाशी रहाण्याची पाळी येऊं नये, म्हणून रामदयाळ शेटजींच्या पायां पडला ! पण रामदयाळ शेटजींना त्याची दया आले नाहीं. पायां - पायांवर, माथां - डोकीवर.
हे प्रत्यय लागून होणार्‍या शब्दांचीं गद्यांतील उदाहरणें वर दिलीं आहेतच. आतां पद्यांतील उदाहरणें पहा.
तारा नभीं जो चमके सुतेजें । ऐका म्हणे भाषण सर्व माझें.
नभ - आकाश, नभीं - आकाशांत, सप्तमी एकवचन.
१ पहात, बोलत, करीत हे शब्द पहा. बोल, कर या धातूंवरून बनले आहेत. दुकानीं कसे आलों ? धान्य व कापड पहात भावाची चौकशी करीत तसेंच बोलत घरीं आलों.  यावरून हे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात. ( त्यांची रीत दाखवितात ). राम बोलत बसला. यमू बोलत बसली. मुलें बोलत बसलीं. यावरून या धातुसाधित शब्दांना लिंगवचनांचा कोणताच विकार ( व्यय ) होत नाहींत; म्हणून तीं अव्ययें होत.
अशा शब्दांना धातुसाधित क्रियाविशेषण अव्ययें म्हणतात. त्यांवर अनुस्वार देऊं नये.
(२) परात, करवत हे शब्द मूळ नामें होत. यांतील ‘ त ’ सप्तमीचा प्रत्यय नाहीं; म्हणून अशा शब्दांवर अनुस्वार देऊं नये. उदा. दऊत, सरबत, इ.
(३) म्हणतात, आवडतात हे शब्द क्रियापदें होत. यांतील ‘ त ’ सप्तमी विभक्तीचा प्रत्यय नाहीं. म्हणून अशा क्रियापदांवर अनुस्वार देऊं नये. उदा. देतात, घेतात, इ.
यावरून लक्षांत येईल कीं, शब्दाच्या शेवटचें अक्षर त असल्यास तो शब्द मूळनाम, धातुसाधित अव्यय; परत, अर्थात् यासारखा अव्यय; क्रियापद आहे कीं, त्यास सप्तमीचा ‘ त ’ प्रत्यय लागल्यामुळें त्याचा त्यामध्यें असा अर्थ होतो, हें नीट पहावें.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP