मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६७ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ६७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २७ अध्याय ६७ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर राजोवाच - भूयोऽहं श्रोतुमिच्छामि रामस्याद्भुतकर्मणः । अनंतस्याप्रमेयस्य यदन्यत्कृतवान्प्रभुः ॥१॥राजा म्हणे जी योगपति । प्रश्न वांछी माझी मति । अद्भुत बळरामाची ख्याति । वाटे पुढती परिसावी ॥२१॥जो कां अनंत अप्रमेय । त्याचें चरित्र आणिक काय । असेल तें तूं कथिता होय । वाटे प्रिय मम श्रवणां ॥२२॥हें ऐकूनि म्हणे योगीन्द्र । परीक्षिति तूं पूर्णचंद्र । प्रश्नकिरणीं मतिसार । ओसंडतसे पैं माझा ॥२३॥आतां होवोनि सावधान । कृतप्रश्नाचें निरूपण । करी चरित्रें संकर्षण । तीं तूं श्रवण करीं राया ॥२४॥श्रीशुक उवाच । नरकस्य सखा कश्चित्द्विविदो नाम वानरः । सुग्रीवसचिवः सोऽथ भ्राता मैंदस्य वीर्यवान् ॥२॥सम्यक् कालिन्दीकर्षण । करितां झाला संकर्षण । तयापुढें प्रताप आन । द्विविदहननादि कथावा ॥२५॥तंव पौण्ड्रकें द्वारके दूत । धाडुनि समरंगा अच्युत । निमंत्रिला ते कथा समस्त । काशीदहनान्त निरूपिली ॥२६॥पुढती संकर्षणाचें यश । पुसता झाला कुरुनरेश । सप्रेम देखूनि शुकमानस । सादर विशेष निरूपणीं ॥२७॥ज्याच्या प्रतापा नाहीं अंत । यालागीं नामें तो अनंत । प्रमाप्रमेयप्रमाणातीत । अप्रमेय यास्तव तो ॥२८॥तयाचें चरित्र ऐकें राया । श्रीशुक म्हणे कौरववर्या । द्विविदवानरें रोहिणीतनया । धर्षितां प्रळया पावला ॥२९॥द्विविदवानर म्हणसी कोण । सुग्रीवनृपाचा प्रधान । साधकबाधकोपायप्रवीण । राजमंत्रज्ञ नृपचक्रीं ॥३०॥कपियूथप मैन्दनामा । तद्बंधु हा नृपोत्तमा । राक्षसकदनीं प्रतापगरिमा । प्लवंगमांमाजी श्रेष्ठ ॥३१॥म्हणसी रामदळींचा वीर । तरी तो असावा निर्जर । विष्णुपक्षीं असतां वैर । करी कां वानर कृष्णेंसीं ॥३२॥तरी त्या वैरासि हेतु राया । ऐकें सादर होवोनियां । द्विविदा आणि भूमितनया । सख्य होतें सुस्निग्ध ॥३३॥स्वधामा गेलिया रामचंद्र । सवें गेले थोर थोर । मागें राहिले जे वानर । ते ते कान्तारपति झाले ॥३४॥मेरुहिमाचळकान्तारीं । द्विविदवानर क्रीडा करी । प्राग्जोतिषपुरान्तरीं । नरकासुर नांदतसे ॥३५॥भौमासुराचें नाम नरक । द्विविदा तया परम सख्य । एकें वीण अंध एक । स्नेहाधिक्यास्तव होती ॥३६॥कृष्णें मारिला नरकासुर । मित्रकैपक्षें वानर । क्षोभूनि हरीसीं चाळी वैर । तेंही xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxसख्युः सोऽपचितिं कुर्वन्वानरो राष्ट्रविप्लवम् । पुरग्रामाकरान्धोषानदहद्वह्निमुत्सृजन् ॥३॥आपुल्या सख्याचा घ्यवया सूड । वानरें अहंकार धरिला दृडः । अद्भुत करूनियां कैवाड । पीडा उदंड करी जनां ॥३८॥उपप्लवें भंगी देश । पुरें पट्टणें ग्राम घोष । जाळी चेतवूनि हुताश । म्हणे कृष्णास जा सांगा ॥३९॥कृष्णें मारिला भौमासुर । द्विविदनामा मी त्याचा मित्र । करीन मित्राचा प्रतिकार । देश समग्र भंगूनी ॥४०॥देश जाळूनि ऐसिया हाका । मारूनि स्वनाम प्रकटी लोकां । याहूनि चंडविघ्नें देखा । करी तें ऐका श्लोकोक्त ॥४१॥क्वचित्स शैलानुत्पाट्य तैर्देशान्समचूर्णयत् । आनर्तान्सुतरामेव यशस्ते मित्रहा हरिः ॥४॥भौमासुराचा घातक । मित्रहंता तो यदुनायक । त्याचे देशींचे जाची लोक । दुःखें अनेक देऊनी ॥४२॥पर्वत उपडूनि महाथोर । नगरां पुरांवरी प्रहार । पर्वतप्रहारें प्राणी समग्र । करी चकचूर राष्ट्राचा ॥४३॥विशेष आनर्तदेशाच्या ठायीं । मित्रहंता राहतो पाहीं । म्हणोनि प्रचंडपर्वतघायीं । देश सपायीं चूर्ण करी ॥४४॥क्वचित्समुद्रमध्यस्थो दोर्भ्यामुत्सृज्य तज्जलम् । देशान्नागायुतप्राणो वेलाकुलानमज्जयत् ॥५॥उषामंडळ सौराष्ट्रदेश । प्राची सरस्वती प्रभास । समुद्रतीरींच्या पुरग्रामास । बुडवी निःशेष जळवर्षें ॥४५॥दहा सहस्र गजांचें बळ । जळीं राहोनि उपसी जळ । मुसळप्राय जयकल्लोळ । वर्षतां सकळ जन बुडती ॥४६॥पुरें पट्टणें ग्रामें नगरें । दुर्गम दुर्गें क्षेत्रें थोरें । घोष पल्लिका अग्रहारें । बुडवी निकरें जळलोटें ॥४७॥उडवी सागरजळ अंबरीं । तें वर्षतां मुसळधारीं । देशा होय महामारी । बुडती सागरीं वाहूनी ॥४८॥समुद्रापासूनि कांहीं दूर । राहती थोर थोर मुनिवर । त्यांतें त्रासी परमक्रूर । तोही प्रकार अवधारीं ॥४९॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP