तत्तद्रंथेषु लघु: पृथुर्मध्यमश्चेति बहुविधो मालासंस्कारो लिखितो द्दश्यते । तत्र सुगमतया बालानां सुसाध्य: प्रयोग: च० दीपिकायां तंत्रचिंतामणौ च - ‘कुशोदकै: प्चगव्यैर्मालां प्रक्षालयेत्सुधी: । अश्वत्थपत्रनवके मालां संस्थापयेदथ । मातृकास्तत्र विन्यस्य सद्योजातादिपंचभि: । अभिमंत्र्य ततो मंत्रैर्मालां सम्यक् प्रपूजयेत् ।’
इति ।
अथ प्रयोग :--- आचम्येत्यादि नूतनघटिताया मालाया: पूजाजपानुष्ठानार्हतासिद्धयर्थं मालासंस्कारं करिष्ये इति संकल्प्य कुशोदकेन पंचगव्यैश्च मालां प्रक्षाल्य अश्वत्थपत्रनवके संस्थाप्य तस्यामेकपंचाशन् मातृका न्यस्य सद्योजातादिपंचमंत्रैरभिमंत्र्य (सद्योजातं. वामदेवाय, अधोरेभ्योअ, तत्पुरुषाय, ईशान:) ॐ र्हीं सिद्धयै नम: । इति पंचाक्षरेण माला मंत्रेण संपूज्य ॐ गं, इति गाणपतं बीजमुच्चार्य मालां प्रार्थयेत् । तदेवं - ॐ गं, अवघं क्रुरु माले त्वां गृहणमि दक्षिणे करे । जपकाले तु सततं प्रसीद मम सिद्धये ॥
इति । केचन सद्योजातादि पंचोपचारसमर्पणमिच्छंति । एवं संस्कृतां मालां जपार्थं नित्यं धारयेत । प्रतिदिनं जपकाले मालां सुगोपितामुद्घाटय पूर्वोक्तपंचाक्षरेण मंत्रेण (ॐ र्हीं सिद्धयै नम:) मालां संपूज्य ॐ गं अविघं कुरु इति मंत्रेण संप्रार्थ्य मस्तकोपरि धृत्वा ‘र्हीं सिद्धयै नम:’ इति नत्वा ॐ महामाले महामाये सर्वशक्तिस्वरूपिणि ।
चतुर्वर्गस्त्वयि न्यस्त: माले त्वं सिद्धिदा भव ॥
इति दक्षिणकरे आदाय वस्त्रेणाच्छाद्य जपेत् । तदुक्तं वृद्धमनुना - ‘वस्त्रेणाच्छाद्य करं दक्षिणं य: सदा जपेत् । तस्य स्यात्सफलं जाप्यं तद्धीनमफलं स्मृतम् ॥’ इति । दक्षकरेण मालामादाय हृदयस्थकर; सन् देवतां मंत्रार्थं वा चिंतयन् जपेदिति कल्पद्रमे ॥ मेरुलंघने दोषमाह गौतम :--- ‘मेरोश्च मेरुपर्यंतं परिवर्त्य पुन: पुन: । जपे न लंघयेन्मेरुं लंघिते न फलं भवेदिति । गणयेज्जपमन्यग्रो न फलं गणनां विना । जपोत्तरं मालां पुन: ‘ॐ हीं सिद्धयै नम:’ इति नत्वा देवं नत्वा इष्टमंत्रस्य पूर्ववत् षडंगन्यासं विधाय - मालां
गोपयित्वा - गुहयातिगुहयगोप्त्री त्वं गृहाणास्मत्कृतं जपम् । सिद्धिर्भवतु मे देवि त्वत्प्रसादान्महेश्वरि ॥ इति भावनया देवस्य देव्या वा वामहस्ते जलं क्षिपेत् इति ॥ इति मालासंस्कारादिविधि: ॥
अर्थ :--- त्या त्या शास्त्रीय गंथामध्यें लहान, मोठा, मध्यम, इत्यादि अनेक प्रकारचा मालासंकार सांगितला आहे. त्यांत सुगम सामान्य मनुष्यांना आचरण्यास सोपा असा प्रयोग चं० दीपिकेंत आहे तो देतो. आचमनादि देशकालनिर्देंश करून ‘श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं नूतनघटिताया मालाया: पूजाजपाद्यनुष्ठानार्हतासिद्धयर्थं तत्संस्कारं करिष्ये’ असा संकल्प करुन कुशोदक व पंचगांनीं (समंत्रक करून) यांनीं मालाप्रक्षालन करावें. नंतर पिंपळाच्या नऊ पानांवर ठेवून अ पासून क्श-पर्यंत मातृका म्हणजे वर्ण ॐ अं, आं, इं, ईं, उं, ऊं इत्यादि क्षं - पर्यंत यांचा मालेवर न्यास करावा.
नंतर सद्योजातादि म्हणजे सद्योजातं, वामदेवाय, अघोरेभ्यो, तत्पुरुषाय, ईशान:, या पांच मंत्रांनीं अभिमंत्रण करून ॐ हीं सिद्धयै नम: या मालापंचाक्षरमंत्रानें गंधादि पंचोपचार मालेवर समर्पण करावे. नंतर ‘ॐ गं’ या गाणपत बीजाचा उच्चार करून मालेची प्रार्थना करावी. ती अशी ‘ॐ गं अविघं कुरु माले त्वं गृहणमि दक्षिणे करे । जपकाले तु सततं प्रसीद मम सिद्धये’ ॥इति ।
कोणी सद्योजातादि पंचमंत्रांनीं पंचोपचार समर्पण करावे असें म्हणतात. याप्रमाणें संस्कारानें संस्कृत केलेली मालाच जपार्थ नित्य धारण करावी. प्रत्येक दिवशीं जपाचे वेळीं सुरक्षित गोमुखी वा पेटी यांत ठेवलेली माला घ्यावी. ‘ॐ हीं सिद्धयै नम:’ म्हणून पूजन नमन करुन ‘ॐ गं अविघं कुरु माले त्वं’ या पूर्वोक्त मंत्रानें प्रार्थना करून मस्तकावर धारण करुन पुन: हातांत घेऊन ‘मां माले’ या मंत्रानें उजव्या हातांत घेऊन वस्त्रानें आच्छादित करूनजप करावा. हात हृदयीं ठेवून देवतास्वरूप अथवा मंत्रार्थाचें चिंतन करीत श्रद्धापूर्वक दक्षतेनें जप करावा. जप करतांना मेरूचें उल्लंधन करूं नये, माळ परत फिरवून गणनारंभ करावा. जपानंतर पंचाक्षरमंत्रानें नमन करुन देवताप्रणाम करून
षडंगन्यास करावा. ‘गुहयातिगुहय’ या मंत्रानें देवतेच्या वामहस्तावर उदक देऊन जप समर्पण करावा. याप्रमाणें मालासंस्कारविधि करावा.